10 POINTS PROGRAMME 2022-23 ( दहा अंशी कार्यक्रम २०२२-२३)

 


 

 

10 POINTS PROGRAMME 2022-23 ( दहा अंशी कार्यक्रम २०२२-२३)

 

दहा अंशी कार्यक्रमातील कृती
 1. अध्ययन पुनर्प्राप्ती /विद्याप्रवेश/सेतूबंध
2.
शालेय शैक्षणिक योजना
3.
भाषा मासोत्सव
4.
स्पष्ट वाचन, शुद्ध लेखन व सरळ
गणित

5.
विषय व्यासपीठ
 6. आठवड्याचा विज्ञान प्रयोग
7.
विशेष तासिका आणि सतत परिश्रम
8.
सहकाऱ्यांचे पाठ निरीक्षण
 9. पुस्तक परिचय
 10. रसप्रश्न

 

आभार – 

गोविंद पाटील (सर) & प्रकाश मदार (सर) (रेंज –
खानापूर)

 

  (सदर माहिती आपणास फक्त माहितीसाठी असून आवश्यक ते बदल करून याचा वापर  करावा.) 

 

                       


 

 

अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष २०२२-23

 

1. अध्ययन पुनर्प्राप्ती /विद्याप्रवेश / सेतूबंध

         Covid-19
मुळे मागील दोन शैक्षणिक
वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य
झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य
आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली
पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती (
ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ) हा उपक्रम आयोजित केला आहे.

                 मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे
झालेले शैक्षणिक नुकसान भरून
काढण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या पूर्ण वर्षात
चालू अभ्यासक्रमाला मदत करण्यासाठी आणि
16-05-2022 पासून सुरू होणाऱ्या या शैक्षणिक वर्षाचा पूर्ण वापर करण्यासाठी
अध्ययन पुनर्प्राप्ती  (लर्निंग रिकव्हरी प्रोग्राम)आयोजित केला आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात अध्ययन
पुनर्प्राप्ती
  उपक्रमासाठी
आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
अध्ययन
पुनर्प्राप्ती
(LEARNING RECOVERY) हा उपक्रम इयत्ता पहिली ते नववी साठी आयोजित करण्यात
आला आहे.
अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमांतर्गत
उपक्रमाची उद्धिष्टे
, रूपरेषा,विद्यार्थी स्वाध्यायपुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.

 
 

 

विद्याप्रवेश –

राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयाप्रमाणे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन
महिन्याच्या अथवा बारा आठवड्यांच्या ‘खेळता खेळता शिक’या तत्वांवर आधारित
‘विद्याप्रवेश’ शाळा सिद्धता कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली आहे.
 

Ø  कोविड सांक्रमिक घटनेमुळे शालेय
शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुलांचे शाळेमध्ये स्वागत करणे व अध्ययन प्रक्रियेशी
त्यांची पुनर्जोडणी करण्याची संधी इथे आपल्याला मिळत आहे.

Ø  सर्व मुलांना घरी आणि शाळेमध्ये
आनंदी,आपुलकीचे,सुरक्षित व अध्ययनपूरक वातावरण निर्माण करण्याच्या अगत्यतेमध्ये
विद्याप्रवेश मार्गदर्शक ठरते.
.

मुलांना तणावमुक्त वातावरणात शिकण्याची संधी देण्याबरोबरच दिव्यान्गांच्या
गरजा ओळखण्याकडेही येथे लक्ष देण्यात आले आहे. मुलांची मातृभाषा आणि घराच्या
भाषेचा स्वीकार करण्याबरोबरच अन्य भाषेच्या अध्ययनाला देखील संधी देण्यात आली आहे
तसेच सांकेतिक भाषेलाही महत्व दिले आहे.

नैदानिक अवलोकन

2022-23 या
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला (मे महिन्यात) सुमारे दोन आठवडे,पायाभूत
सामर्थ्ये  (FL) आणि मागील इयत्तातील अध्ययन सामर्थ्यांच्या
दृष्टीने
विद्यार्थ्यांचे वर्तमान स्तर स्पष्टपणे समजून घेण्यासाठी शाळांनी काही प्रकारचे
नैदानिक मूल्यांकन
करणे.

चालू शैक्षणिक वर्षात नैदानिक लिखित परीक्षा असणार नाही नैदानिक चर्चा
वाचन-लेखन यांच्या माध्यमातून पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रगती जाणून
घेणे.या नैदानिक अवलोकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे.या
कार्यामध्ये भाषा आणि गणित विषयांच्या मूलभूत अध्ययन निष्पत्तीवर आधारित अवलोकन
करण्यास जास्त प्राधान्य देणे.

मागील दोन वर्षातील झालेल्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन हस्तपुस्तिका तयार केल्या असून त्यांची पूर्वतयारी म्हणून
पहिल्या आठवड्यात अध्ययन
निष्पत्तीचे मूलभूत
पुनर्बलन कार्य
,विद्यार्थ्यांची मानसिक तयारी व भावनिक
सुरक्षितता हे कार्य करणे.

इयत्ता दहावीसाठी मागील शैक्षणिक वर्षातील सेतुबंध
कार्यक्रम
2022-23 वर्षांमध्ये आहे तसाच
सुरू ठेवावा.

 
 

 

2. शाळा शैक्षणिक योजना (School Academic Plan),
शाळा शैक्षणिक
योजना म्हणजे (
SAP) विद्यार्थ्यांची
अध्ययन प्रगती ठरविण्यासाठी सहाय्यक आणि त्याला पूरक अशा कृतीबाबत तयार केलेली
योजना होय.

ही योजना तयार
करत असताना
नमुना क्रमांक 1 ते 6 पर्यंत भरून फक्त भिंतीला टांगत ठेवण्यासाठीची एककालीन कृती (ONE TIME
ACTIVITY)
असा चुकीचा समज आपल्यात आहे.
2022-23 वर्षासाठीची शैक्षणिक क्रिया योजना तयार करावयासाठी खालील बाबींकडे लक्ष दिले
पाहिजे.
प्रत्येक
शाळेच्या गरजा या वेगवेगळ्या असू शकतात. त्यासाठी शाळेची गरज व विद्यार्थ्याच्या
शैक्षणिक प्रगतीला लक्षात ठेवून विद्यार्थी
, शिक्षक,शाळा सुधारणा व अभिवृद्धी समिती यांच्याशी चर्चा करून ठरविण्यात यावे.  (SAP) नमूने भरावयाच्या आधी शालेय शैक्षणिक ध्येय निश्चित
करावयास हवे
,
मुलभूत
सामर्थ्य ही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
2005 च्या अनुषंगाने तयार केलेली असल्याने त्याच्या बदललेल्या पाठ्यक्रमाशी तफावत
येवू शकते. त्यासाठी
K.S.Q.A.A.C ने निर्धारित
केलेल्या अध्ययन मानकांचा कनिष्ट पातळीवरील आरंभबिंदू म्हणून ठरविण्यात यावे.

(SAP) मधील नमूना 06 हा अतिशय मुख्य असतो.
उर्वरित नमूने आवश्यकतेनुसार वापरण्यात यावेत.

शाळेचे
मुख्याध्यापक व सर्व सहशिक्षकांनी मिळून आपल्या शाळेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी चे
स्वप्न

व त्यासाठीचे नियोजन याबाबत संपूर्ण नियोजन (SAP) मध्ये नमूद असावयास हवे.

 
 

 

 3. भाषिक मासोत्सव


जुलै महिन्यामध्ये या कृतीचे अनुष्ठाण होणे गरजेचे आहे
प्रथम, द्वितीय व तृतीय भाषेतील कृतीची यादी करून भाषिक
कौशल्यांच्या अभिवृद्धींसाठी अध्ययनपूरक कृती असाव्यात.


प्रथम भाषेसाठी कृती
– संभाषण सराव, श्रवण, भाषण, वाचन लेखन (भाषाकौशल्य) सराव,गाणी,
रसप्रश्न, चर्चासत्र, कथाकथन, नाटक, निबंध स्पर्धा इत्यादिंचा अंतर्भाव असणे गरजेचे.
द्वितीय
व तृतीय भाषेसाठी कृती

१० संबंधीत भाषेमधील वृतपत्रांचे परिपाठावेळी
(प्रार्थना) वाचन करून घेणे.

story telling
skits, drama, role playing १० निबंध स्पर्धा, चर्चास्पर्धांचे
आयोजन

संवाद व कवितांचा सराव घेणे.
तालसुरात कविता म्हणने.
रेडिओ, टी व्ही, प्रोजेक्टर, संगणक व इतर माध्यमाव्दारे या भाषांबाबत अभिरूची निर्माण करणे.

 
 

 

4. स्पष्ट वाचन, शुद्ध लेखन व सरळ गणित
स्पष्ट वाचन -:
दररोज प्रार्थनेला शालेय ग्रंथालयातील पुस्तकाचे वाचन करवून
घेणे.पुस्तक वाचनाचा उद्देश
मुलांचे वाचन कौशल्य वृद्धींगत व्हावे यादृष्टीने व्हावयास हवा.
विद्यार्थ्याला
त्याचे अनुभव आपल्या सहकार्यासोबत व्यक्त करण्यास सांगून शिक्षक विद्यार्थ्यांनी
त्याचे श्रवण करणे.

आठवड्याला एक
याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देवून त्याचा अभिप्राय
घेणे किंवा त्यावर चर्चा करणे.
प्रार्थनेच्या
वेळी वृतपत्रांमधील ठळक घडामोडींचे वाचन घेणे.

पाठ्यविषयाशी
संबंधीत रोज पाच नव्या शब्दांचा परिचय करवून देणे घेणे. व वाचन सराव
खेळाद्वारे विविध भाषिक
कृतिद्वारे (
pair & group activity) शब्दांचा डोंगर, भाषीक कोडे, म्हणी
वाक्यप्रचार
, शब्दवाचन वाक्यवाचनव इतर ज्ञानरचनावादी
कृर्तीद्वारे विविध भाषीक पैलूंशी संबंधीत सराव घेणे.

शुद्ध लेखन –:
धूळपाटी, खरपाटी, अक्षरांचे नमूने, कित्तावही, तळफलक अशा कृतीतून प्रारंभिक लेखन सराव करून घेणे.
विद्यार्थ्याचे
दैनंदिन अनुभव लिहिण्यास सांगून चुकल्यास त्याची दुरूस्ती करून घेणे व त्याचा वाचन
सराव घेणे.

प्रत्येक
आठवड्याला त्यान्/तीने वाचल्लेल्या पुस्तकातील प्रमुख अंश किंवा मुद्द्यांची टिपनं
काढावयास लावणे.

प्रतिदिन पाच
शब्दांचे अनुलेखन करावयास देणे व चुकल्यास त्याची दुरुस्ती करून घेणे.

प्रतिदिवशी शिकवलेल्या
पाठावर आधारित दोन वाक्ये लिखानाचा सराव देवून ते तपासून चुकांबाबत चर्चा करण्याबरोबरंच
स्पष्टता व त्यातील शुद्धलेखनाचा सराव
करणे.

 
 

 

सरळ गणित –:
लेखी
स्वरूपातील साधी बेरीज व वजाबाकीची उदाहरणे सोडवावयास देणे व त्याचा सराव करून
घेणे.

प्रतिदिन एका
पाढ्याचा (वैयक्तिक व गटात) उलट-सुलट सराव करवून घेणे.

वर्गातील फरशीवर
ज्ञानरचनावादी रकान्यांचे आरेखन करून त्याच्याशी संबंधीत साहित्याचा वापर करून गणिताच्या
मुलभूत क्रियांचा सराव करून घेणे.

विविध चलीत नमून्याद्वारे(Working Models) गणिताचे रंजकपणे अध्यापन करणे. शाळेतील संगणक व तंत्रस्नेही
साधनांचा वापर करून गणित विषयाची अभिरूची निर्माण
करणे.

अँड्रॉईड
मोबाईल संचामधील विविध गणितविषयक ॲप्स वापरून त्याव्दारे गणिताच्या
काही कृतींचा सराव करवून घेणे.
दैनंदिन जीवनाशी निगडीत व्यवहाराच्या दृष्टीने पूरक अशा कौशल्यांशी निगडीत
उदाहरणांचा सराव करून घेणे.
5. विषयाचे व्यासपीठ
विषयनिहाय शिक्षकांचे गटकार्य-
केंद्रपातळीवर शिक्षकांनी ते शिकवत असलेल्या

विषयाबाबत महिन्यातून एकदा एकत्र येवून चर्चा करणे अभिप्रेत
आहे किंवा शालेय पातळीवरही याबाबतचे उपक्रम राबविणे यात अभिप्रेत आहे. शालेय
स्तरावरील विविध विषयातील क्लिष्ट संकल्पना आणि त्याच्याशी संबंधीच चर्चा आपण
याकृतीत करा
7/9 आहे व त्याचबरोबर यामुळे एखाद्या
विषयाचे अध्ययन-अध्यापन परिणामकारक होण्यास
होते.
भाषेचे शिक्षक- शब्दसंग्रह करणे, वाक्यसराव, वाचन लेखन व सरळ गणित, संभाषण सराव व इतर भाषिक कृतींबाबत सराव करणे.
गणिताचे शिक्षक- गणितातील मुलभूत क्रिया, व्यावहारिक गणित, गणित कीट, क्लिष्ट संकल्पना आदींची चर्चा करणे.
विज्ञान शास्त्र- सरळ प्रयोग
मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण वाढीस लावणे दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर
याबाबत चर्चा करणे
, जागतिक पर्यावरणविषयक समस्यांबाबत
चर्चा करणे. उदा- वैश्विक उष्मिकरण इ. विज्ञानाच्या वापरामुळे मानवी जीवनात झालेले
बदल व परिणाम याबाबत चर्चा करणे.

सामाजिक शास्त्रे – इतिहास, राज्यशास्त्र, भूगोलशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र
नागरिकशात्र अशा व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत शास्त्रांशी संबंधीत चर्चा करणे
अभिप्रेत आहे.

 
 


6. साप्ताहिक विज्ञान
प्रयोग

1.
इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतेच्या इयत्तांशी निगडीत NCF-2005 KCF-2009 साध्या प्रयोगांची
यादी करणे.

2.
आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारनंतच्या
शेवटच्या तासाला प्रयोग घेण्यात यावा.

3. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग पहाता आला पाहिजे.
4.
प्रत्येक वेळेला केलेल्या प्रयोगाचे योग्य ते दाखले
ठेवणे.

5.
उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थी प्रयोगादरम्यान
सहभागी होवून त्याचे प्रत्यक्षरित्या त्यानी 
अवलोकन केले पाहिजे.

 
  


7. विशेष तासिका आणि सतत
परिश्रम

RTE 2009 अन्वये शिक्षकांना 45 तासिकांचा कालावधी
निर्धारित केलेला आहे. त्यानुसार

आम्ही 45 तासिकांच्या आधारे
शाळेतील शैक्षणिक कार्यनिर्वहण केले जाते.

शाळा
अवधीनंतरच्या वेळेत शाळेशी संबंधीत कृतींमध्ये शिक्षकांनी सहभागी व्हावे. शालेय

कालावधीच्या
नंतर व आधी विद्यार्थ्यांना अवांतर विषयाशी संबंधीत मार्गदर्शन व चर्चा करावी व •
समूपदेशन करावे.


विद्यार्थ्यांना दिलेले गृहकार्य त्यांच्यावर कोणतेही दडपण येणार नाही अशाप्रकारे
तपासून त्याचे

योग्य ते परिशीलन व मार्गदर्शन करावे.
विद्यार्थ्यांनी
मेहनतीने बनविलेले योजनाकार्य व त्याची व्यक्तीत्व विकासाची पार्श्वभूमी लक्षात

घेवून त्याची मांडणी, अभिव्यक्ती, संशोधनवृत्ती आदींचे परिशीलन करून योग्य त्या सुचना व शेरा
देणे.


अभ्यासक्रमाशी निगडीत क्षेत्रभेटीतून स्थानिक ग्राम पंचायत बँक
, उद्योगसमूह, पोस्ट ऑफिस, सेवासंस्था, ग्रंथालय, वस्तु संग्रहालय, दवाखाना अशा
सामाजिक सेवा संस्थाना भेटी देवून
त्याच्या स्वानुभवांना चालना द्यावी.

 
 


8. सहकार्यांचे
पाठनिरिक्षण

प्रत्येक
शिक्षकांनी आपल्या सहकार्याचा आठवड्यातून किमान एका पाठांचे निरिक्षण करावे.

विहित
नमून्यात पाठाचे निरिक्षण केल्यानंतर त्यातील अंशाबाबत चर्चा करून व योग्य ते

प्रत्याभरण द्यावे.

शाळेतील
मुख्याध्यापकांनीही त्यांच्या सहशिक्षकांचे पाठनिरिक्षण करावे..

पाठनिरिक्षण
करून त्याचे नमूने एका फाईलमध्ये ठेवावेत.

शिक्षकांनी
अध्यापन साधनांबरोबरंच इतर बर्याच क्लृप्त्यांचा वापर करून आपले
पाठ अध्यापन परिणामकारी बनवावे.

 
 


9. पुस्तक परिचय-:
जून व जुलै
महिन्यात पुस्तकाचा परिचय करून देणे
.
प्रत्येक
दिवशी प्रार्थनेला एका पुस्ताकाचा परिचय करवून देणे. ऑगस्ट महिन्यापासून वरच्या
वर्गातील मुलांना हे कार्य करण्यास द्यावे.

विद्यार्थ्याना
पुस्तक परिचय करून देतांना पुस्तकाचे नाव
, लेखकाचे नाव, पुस्तकातील मुख्यांश
व त्यातील विषय वस्तुविषयी मुलांना आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित
करावे. पुस्तकाच्या परिचयाविषयी सूचनाफलकावर टिपण लिहावे.

पुस्तक परिचय
करण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन द्यावे (निवेदन महत्वपूर्ण बाबी)

उच्चार व इतर संबंधीत वृतपत्रातील विविध
कात्रणे संग्रहित करून त्याचा एक अल्बम तयार करणे.

10. रसप्रश्न
प्रत्येक
शनिवारी
,
चालु घडामोडी तसेच पाठावर आधारित विषयावर आधारित (एका
विषयाशी
संबंधीत) रसप्रश्न तयार करावेत.
आठवड्यात
विचारलेले प्रश्न एका वहित नमूद करण्यात यावेत.

रसप्रश्न
कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थी सहभागी होईल याकडे शिक्षकांनी काटेकोरपणे लक्ष
द्यावे.

कोणत्या
विषयावर रसप्रश्न तयार करावयाचे आहेत त्याबाबत आधी मुलांशी चर्चा करण्यात यावी.

 

दहा अंशी कार्यक्रम माहिती PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE बटन वर स्पर्श करा..

 

 

10 POINTS PROGRAMME 2022-23 ( दहा अंशी कार्यक्रम २०२२-२३)

 
 
 

 

 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *