प्रकरण 15-
कांही नैसर्गिक चमत्कारिक घटना
(Some Natural Phenomena)
तुम्ही काय शिकलात
• काही पदार्थांवर दुसरे पदार्थ घासल्यानंतर विद्युतप्रभार निर्माण होऊ शकतो.
• प्रभार दोन प्रकारचे आहेत- धन प्रभार आणि ऋण प्रभार.
• सजातीय प्रभार एकमेकांपासून दूर जातात आणि विजातीय प्रभार एकमेकांना आकर्षित करतात.
• घर्षणाने निर्माण झालेल्या प्रभारांना स्थितिक प्रभार म्हणतात.
• जेव्हाप्रभाराचे स्थलांतर होते. तेव्हा ते विद्युतधारा निर्माण करतात.
• पदार्थ विद्युत प्रभारित आहे का नाही हे पहाण्यासाठी विद्युतदर्शीचा उपयोग करतात.
• ज्या क्रियेत प्रभारित पदार्थाकडून पृथ्वीकडे (जमिनीत) प्रभारीच्या निघून जाण्याची क्रिया आकाशात वीज निर्मितीस कारणीभूत ठरते.
• ढग आणि पृथ्वी किंवा विविध ढगांमधील विद्युत प्रभारांच्या निघून जाण्याची क्रिया आकाशात वीज निर्मितीस कारणीभूत ठरते.
• वीजेच्या पडण्याने जीवीत व वित्तहानी होते. • तडीत रक्षक वीजेपासून इमारतीचे रक्षण करतो.
• पृथ्वीची अचानक होणारी हालचाल म्हणजे भूकंप होय.
• भूकंपाचे भाकित (अंदाज बांधणे) करणे अशक्य आहे.
• भूकवचाया सीमेवर भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. या सीमांना फॉल्ट झोन (भूकंप प्रवण क्षेत्र) म्हणतात.
• भूकंपाची विध्वंसक उर्जा रिक्टर स्केलवर मोजली जाते भूकंपाच्या विध्वंसक ऊर्जेची तीव्रता 7 किंवा त्यापेक्षा जास्त रिक्टर स्केल वर असेल तर जीवित हानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते.
• भूकंपापासून आपल्या स्वतःला वाचविण्यासाठी आपण आवश्यक ती सर्व काळजी घ्यायल हवी.
अभ्यास
प्रश्न 1 व 2 मध्ये योग्य पर्याय निवडा.
1. घर्षणाने खालीलपैकी कोण सहज प्रभारित होत नाही.
(a) प्लॅस्टिकची पट्टी
(b) तांब्याचा दांडा
(c) फुगवलेला फुगा
(d) लोकरीचे कापड
उत्तर – (b) तांब्याचा दांडा
2. कोचेचा दांडा रेशमाच्या कापडावर घासला तर दांडा.
(a) आणि कापड या दोघांवर धन प्रभार निर्माण होतो.
(b) वर धन विद्युत प्रभार आणि कापडावर ऋण विद्युत
प्रभार निर्माण होतो.
(c) आणि कापड या दोहोंवर ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो.
(d) ऋण प्रभारित होतो तर कापड धन विद्युत प्रभारित होते.
उत्तर – (b) वर धन विद्युत प्रभार आणि कापडावर ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो.
3. सत्य असेल तर T आणि असत्य असेल तर F असे खालील उदाहरणांपुढे लिहा.
(a) सजातीय प्रभार एकमेकांना आकर्षित करतात. (T / F)
उत्तर – F
(b) प्रभारीत काचेचा दांडा प्रभारित प्लॅस्टिकच्या स्ट्रॉला आकर्षित करतो. (T / F)
उत्तर – T
(c) वीज वाहक इमारतींचे वीज पडण्यापासून रक्षण करीत नाही. (T/F)
उत्तर – F
(d) भूकंपाचे भाकित भूकंप होण्यापूर्वी करणे शक्य आहे. (T / F)
उत्तर – F
4. काही वेळेस
हिवाळ्यात स्वेटर अंगातून काढताना तड तड असा आवाज होतो. स्पष्टीकरण द्या.
उत्तर – हिवाळ्यामध्ये आपली त्वचा कोरडी
बनते.स्वेटर लोकरी पासून बनलेली असते.जेंव्हा लोकर आपल्या कोरड्या त्वचेला घासते
त्यावेळी घर्षणाने प्रभार निर्माण होतो.तडतड असा आवाज होतो.
5. विद्युत प्रभारित वस्तुला हाताने स्पर्श केल्यास ती तिचा प्रभार घालवते याचे स्पष्टीकरण करा.
उत्तर – आपले शरीर विद्युतचे वहन करू शकते.जेव्हा आपण विद्युतभारित वस्तूंना स्पर्श करतो तेव्हा तिचा प्रभार जमिनीमधून
आपल्या शरीरात येतो.
6. ज्या स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते त्या स्केलचे नाव लिहा. या स्केलवर भूकंपाची तीव्रता 3 आहे. ती सिस्मोग्राफवर नोंदविली जाईल? या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल?
उत्तर – भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजतात.स्केलवर भूकंपाची तीव्रता 3 असेल तर जास्त नुकसान होणार नाही.
7. वीज पडताना स्वतःचे रक्षण करण्यासाठी 3 मापदंड सूचवा.
उत्तर – वीज कोसळताना प्रथम ढगांचा गडगडाट ऐकू येतो तेव्हा आपण सुरक्षित जागा शोधली पाहिजे. वाहत्या पाण्याच्या संपर्कात येऊ नये. घरामध्ये असाल तर इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर टाळा. घर किंवा इमारत ही सुरक्षित जागा आहे
8. एका प्रभारित फुग्याला दुसरा प्रभारित फुगा दूर का लोटतो आणि प्रभाररहित फुग्याला दुसरा प्रभारित फुगा आकर्षित का करतो याचे स्पष्टीकरण द्या.
उत्तर – एका प्रभारित फुग्याला दुसरा प्रभारित फुगा दूर लोटतो.कारण दोन्ही फुग्यावर समान प्रभार आहे. सजातीय प्रभार नेहमी एकमेकांपासून दूर जातात. दुसऱ्या वेळेत प्रभार रहित फुगा दुसरा प्रभारित फुगा आकर्षित करतो.कारण आता या फुग्यांवर भिन्न भिन्न प्रभार आहे.विजातीय प्रभार एकमेकांना आकर्षित करतात.
9. प्रभारित
वस्तू शोधण्याकरता उपयोगात येणाऱ्या उपकरणाचे आकृतीसह वर्णन करा.
उत्तर –
पेपर क्लिप मार्फत ॲल्युमिनियमच्या पातळ पट्ट्याना प्रभारीत रिफिलवरील एकच प्रभार मिळतो.त्यामुळे सारख्या प्रभारानी भारीत अल्युमिनियमच्या पातळ पट्ट्या एकमेकांना प्रतिकर्षित करतात.त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढते.अशा प्रकारच्या उपकरणांचा उपयोग पदार्थ विद्युत प्रभाराने भारित आहे
किंवा नाही हे पाहण्याकरीता करतात.या उपकरणाला विद्युतदर्शी म्हणतात.
10. भारतात ज्या 3 राज्यांमध्ये भूकंपाची
शक्यता अधिक आहे त्यांची नावे लिहा.
उत्तर – जम्मू-काश्मीर
हिमाचल प्रदेश
गुजरात
मध्य हिमालय
11. समजा तुम्ही तुमच्या घराबाहेर आहात आणि भूकंप झाला, तर तुम्ही कोणती दक्षता घ्याल?
उत्तर – आपल्या जागी असेल तर जमिनीवर पडून जर गाडी वर असेल र मोकळ्या जागी गाडी लावा.
12. हवामान खात्याने ठराविक दिवशी वादळ होईल याची सूचना दिली. समजा तुम्ही त्या दिवशी
घराबाहेर असाल तर तुम्ही सोबत छत्री घ्याल का? स्पष्टीकरण द्या.
वादळ होताना धातूची छत्री घेणे योग्य नाही.कारण धातू विद्युतचे सुवाहक आहेत.त्यामुळे विजेचा धक्का बसू शकतो.
Discharge- प्रभार रहित
Earth’s Plate- पृथ्वीच्या कवचाचे भाग
Earthquake- भूकंप
Electroscope – विद्युतदर्शी
Lightning- आकाशातील वीज
Lightning Conductor- तडित रक्षक
Negative Chargeऋण प्रभार
Positive Charge धन प्रभार
Richter Scale – रीस्टर स्केल
Seismograph – • सिस्मोग्राफ
Thunder – गडगडाट
Pdf make
Pdf make
Save kase karyache