मराठी
वर्णमाला
वर्ण – मुखावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात.
अक्षर – मुखावाटे बोलतांना आपले
मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो.ज्या सांकेतिक
चिन्हांनी आपण ध्वनी लिहून ठेवतो त्यांना अक्षर म्हणतात.
मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनींच्या खुणांना
अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे न संपणारे किंवा नष्ट न पावणारे.
उदा. कमल,नमन
मुळाक्षरे / वर्णमाला
मराठी भाषेत एकूण 48
मूलध्वनी आहेत.म्हणजे वर्ण असून या वर्णाच्या मालिकेला वर्णमाला असेही म्हणतात. ही
वर्णमाला म्हणजेच ‘मुळाक्षरे‘ होय.
मराठी वर्णमालेतील वर्ण
किंवा मुळाक्षरे खालीलप्रमाणे..
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः,
क, ख, ग, घ, ङ
च, छ, ज, झ, ञ
ट, ठ, ड, ढ, ण
त, थ, द, ध, न
प, फ, ब, भ, म
य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ.
वरील 48 वर्णांचे तीन प्रकार
पडतात.
1. स्वर 2. स्वरादी 3.व्यंजन
1.स्वर :ज्या वर्णांचा उच्चार सहज व
स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो त्यांना
स्वर असे म्हणतात.
मराठीमध्ये
एकूण स्वर 12 आहेत.
अ, इ, उ, ऋ ऱ्हस्व स्वर.
आ, ई, ऊ दीर्घस्वर.
ए, ऐ, ओ, औ संयुक्त
स्वर.
2.स्वरादी – ज्या स्वरांचा उच्चार करतान आधी स्वर
येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
मराठीत एकूण 2 स्वरादी
आहेत.
अं अनुस्वार.
अ: विसर्ग.
3.व्यंजन : ज्या वर्णांचा उचार पूर्ण करण्यास स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना व्यंजन
असे म्हणतात.
मराठी एकूण 34 व्यंजने
आहेत.
वर्गीय व्यंजने. (क, च, ट, त, प )
क्, ख्, ग्, घ्, ङ्
च, छ्, ज्, झ, ञ,
ट्, ठ्, ड्, द्, ण्.
त्, थ, द्, ध्, न्,
प्. फ्, ब, भ्,म.
अवर्गीय व्यंजने
– य्, र्, ल, व् ष्,स्,ह्,ळ्.
‘क्ष‘,
‘ज्ञ‘ ही संयुक्त व्यंजने आहेत.
प्रश्न :
1. वर्गीय व्यंजने कोणती ते सांगा.
उत्तर – क्, ख्, ग्, घ्, ङ्
च, छ्, ज्, झ, ञ,
ट्, ठ्, ड्, द्, ण्.
त्, थ, द्, धू, न्,
प्. फ्, ब, भ्,म्.
2. अवर्गीय व्यंजने कोणती
ते सांगा.
उत्तर – य्, र्, ल, व् ष्.स्. ह्,ळ्
3. संयुक्त व्यंजने कोणती?
उत्तर – ‘क्ष‘, ‘ज्ञ‘ ही संयुक्त व्यंजने आहेत.
अल्पप्राण | महाप्राण | अल्पप्राण | महाप्राण | अनुनासिक |
क | ख | ग | घ | ङ |
च | छ | ज | झ | ञ |
ट | ठ | ड | ढ | ण |
त | थ | द | ध | न |
प | फ | ब | भ | म |
रिकाम्या जागी योग्य ‘वर्ण‘ लिहून शब्द पूर्ण करा.
र व त (प, क) – करवत
भ जी ( ट , क ) – भटजी
खालील स्वरांपासून सुरु होणारे शब्द लिहा.
आ, इ, ए, ऐ, ऊ
उत्तर –
आई
इमारत
एकूण
ऐकून
ऊस
स्वाध्याय
1.वर्ण म्हणजे काय ?
उत्तर – मुखावाटे निघणाऱ्या मूल
ध्वनींना वर्ण असे म्हणतात.
2.अल्पप्राण व महाप्राण ध्वनींची यादी करा.
अल्पप्राण | महाप्राण | अल्पप्राण | महाप्राण | अनुनासिक |
क | ख | ग | घ | ङ |
च | छ | ज | झ | ञ |
ट | ठ | ड | ढ | ण |
त | थ | द | ध | न |
प | फ | ब | भ | म |
3. वर्गीय व्यंजनांचा तक्ता करा.
उत्तर – क्, ख्, ग्, घ्, ङ्
च, छ्, ज्, झ, ञ,
ट्, ठ्, ड्, द्, ण्.
त्, थ, द्, धू, न्,
प्. फ्, ब, भ्,म्.
4. अवर्गीय व्यंजनांचा तक्ता तयार करा.
उत्तर – य्, र्, ल, व् ष्.स्. ह्,ळ्