6.भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध
1. भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध या साली झाले.
A. 1858
B. 1947
C. 1857
D. 1945
2. कानपुर बंडाचे नेतृत्व यांनी केले.
A. राणी लक्ष्मीबाई
B. नानासाहेब
C. दुसरा बहादुरशहा
D. मंगल पांडे
3.या मोगल राजाला सम्राट म्हणून घोषित करण्यात आले.
A. शहा आलम
B. दुसरा बहादुरशहा
C. टिपू सुलतान
D. सिराज उद्दौला
4.डलहौसीने हे धोरण अमलात आणले.
A. खालसा धोरण
B. लष्करी धोरण
C. सामाजिक
D. सहाय्यक सैन्य
5. 1857 च्या बंडाचा खालीलपैकी एक परिणाम होय.
A. दत्तक वारस नामंजूर कायदा अस्तित्वात आला.
B. खालसा धोरणामुळे इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली.
C. भारतातील राज्य कारभार राज्य सचिवांकडे सोपविण्यात आला.
D. सती बंदी कायदा अस्तित्वात आला.
6. इंग्लंडच्या राणीने जाहीर केलेल्या घोषणेला असेही म्हटले जाते.
A. भारताचा स्वातंत्र्यदिन
B. भारताचा मॅगना चार्टा
C. इंग्लंडचा स्वातंत्र्यदिन
D. यापैकी नाही
7. ब्रिटिश इतिहासकारांनी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाला असे म्हटले आहे.
A. शिपायांचे बंड
B. भारतीय स्वातंत्र्याचे बंड
C. दक्षिण भारताचे बंड
D. उत्तर भारताचे बंड
8. कंपनी सरकारने या बंदुका वापरण्यास सुरुवात केली.
A. रॉयल एनफिल्ड
B. काडतुसांच्या बंदुका
C. लांब पल्ल्याच्या बंदुका
D. यापैकी नाही
9. काडतुसे दातांनी सोडण्यास विरोध केलेला सैनिक हा होय.
A. नानासाहेब
B. तात्या टोपे
C. मंगल पांडे
D. राणी लक्ष्मीबाई
10. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा परिणाम हा झाला.
A. भारतीय सैनिकांचा पगार वाढला.
B. भारतीय कामगार श्रीमंत बनले.
C. इंग्रज गरीब बनले.
D. भारतीय कामगार बेकार झाले.
11. ब्रिटिशांची न्यायालयीन भाषा ही ठेवली.
A. हिंदी
B. मराठी
C. तमिळ
D. इंग्रजी
12. 1857च्या बंडातील शूर स्त्री –
A. राणी लक्ष्मीबाई
B. अहिल्याबाई होळकर
C. कित्तूर राणी चन्नम्मा
D. यापैकी नाही
13. झाशीच्या राणीच्या मदतीला हा गेला.
A. नानासाहेब
B. मंगल पांडे
C. तात्या टोपे
D. दुसरा बहादुरशहा
14. 1857च्या बंडाची सुरुवात येथून झाली.
A. बराकपूर
B. दिल्ली
C. मीरत
D. मुंबई.
15. 1857च्या बंडात ब्रिटीशांबद्दल हे एक विधान चुकीचे आहे.
A. एकी
B. संघटितपणा
C. शिस्त
D. नेतृत्वाचा अभाव