पाठ – 16 धाडसी दयानंद
नवीन शब्दांचे अर्थ
सवंगडी – मित्र
छंद – आवड
झोंबणे – झणाणणे, स्पर्श करणे
धूसर – कमी प्रकाश
अथांग – अंदाज येत नाही असा
सामील – सहभागी
भयभीत -घाबरलेला
गर्जना
– मोठा आवाज
अंधुक – थोडा थोडा प्रकाश अक्राळ विक्राळ लाटा प्रचंड मोठ्या लाटा
उदास – दुःखी
न्याहाळणे – पाहणे
क्षणार्धात – पटकन
ऊर – छाती
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. दयानंद कोणत्या भाषेत बोलायचा?
उत्तर – दयानंद मूकभाषेत बोलायचा.
२. दयानंदला खूप आनंद केव्हा व्हायचा?
उत्तर –समुद्र किनाऱ्यावर खेळताना व निळा समुद्र बघताना दयानंदला खूप आनंद व्हायचा.
३. दयानंदचा आवडता खजिना कोणता ?
उत्तर –लहान – मोठे,लाल – काळे,टोकदार आणि रंगीबेरंगी शंख शिंपले हा दयानंदचा आवडता खजिना होता.
४. समुद्रामध्ये कोण बुडत होता ?
उत्तर – समुद्रामध्ये छोटा पवन बुडत होता.
५. दयानंदला सर्वांनी शाबासकी का दिली?
उत्तर –दयानंदने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता समुद्रात बुडणाऱ्या पावनाला वाचवले म्हणून दयानंदला सर्वांनी शाबासकी दिली.
आ. नमुन्याप्रमाणे अनेकवचन लिहा.
लाट -लाटा
१. किल्ला – किल्ले
२. मासा- मासे
३. शिंपला – शिंपले
४. मूल – मुले
5.समुद्र – समुद्र
लक्षात ठेव – मुळ शब्दाचे अनेकवचन करताना बऱ्याचदा मूळ शब्दात बदल करावा लागतो.
इ. विरुद्ध अर्थाच्या जोड्या जुळवा.
‘अ‘ ‘ब‘
१. मुका – रात्र
२.
आवडता – बोलका
३.
काळा – मोठा
४.
लहान – नावडता
५.
दिवस – पांढरा
उत्तर – ‘अ‘ ‘ब‘
१. मुका – बोलका
२. आवडता – नावडता
३. काळा – पांढरा
४. लहान – मोठा
५. दिवस – रात्र
ई. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. समुद्रातून आपल्याला काय काय मिळते ?
उत्तर – समुद्रातून आपल्याला शंख,शिंपले,वाळू,मासे,पाणी,मीठ इत्यादी मिळतात.
२. तुझे छंद कोणते ?
उत्तर –
३. बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी तू काय करशील?
उत्तर –
उ. रिकाम्या जागी कंसात दिलेले शब्द योग्य रीतीने भर..
(धाडसाने, छंद, झोंबत, दंग, शाबासकी)
१. सर्वजण खेळण्यात दंग होते.
२. दयानंदला सर्वांनी शाबासकी दिली.
३. शंख-शिंपले जमा करणे हा त्याचा छंद होता.
४. गार वारा अंगाला झोंबत होता.
५. दयानंदच्या धाडसाने पवनचा प्राण वाचला.
ऊ. ध्वनिदर्शक शब्द सांग.
नमुना – पाणी पीतो – घटाघटा
१. केस उडतात – भुरभूर
२. झरा वाहतो – खळखळ
३. दार वाजते –
४. पानांची होते – सळसळ
५. पावसाची होते – रिपरिप/ रिमझिम
६. पंखांची होते – फडफडाट
ए. नमुन्याप्रमाणे जोडशब्द शोधून लिही. नमुना
– अक्राळ विक्राळ
१. अवती १. घडण
२. अंगत २. जंमत
३. आडवा ३. गमत
४. गंमत ४. उतार
५. केर ५. भवती
६. चढ ६. पंगत
७. रमत ७. तिडवा
८. जडण ८. कचरा
उत्तर
–
1) अवती भवती
2) अंगत पंगत
3) आडवा तिडवा
4) गंमत जंमत
5) केर कचरा
6) चढ उतार
7) रमत गमत
8) जडण घडण