5. देवतुल्य आई-बाबा
अ. नवीन शब्दांचे अर्थ.
देवतुल्य -देवासमान
नेत्र- डोळे
माथा -कपाळ, मस्तक
डोई -डोके
चरण -पाय
वरदहस्त -आशीर्वाद
सदन घर
आ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यता लिही.
1. देवतुल्य कोण आहेत?
उत्तर – देवतुल्य आई – बाबा आहेत.
2. कवी माथी काय लावून पावन होतो?
उत्तर – आपल्या आईबाबांच्या चरणाची धूळ लावून कवी पावन
होतो.
3. आई बाबा नित्य नेमाने कोणते वचन बोलत असतात?
उत्तर – आई बाबा नित्य नेमाने
सत्य बोलण्याचे वचन बोलत असतात.
4. कवी रोज कोणाची पूजा करतो?
उत्तर – कवी रोज आई बाबांची पूजा करतो.
5. आई बाबांची माया कशाहून मोठी आहे?
उत्तर – आई बाबांची माया नभाहून मोठी आहे.
इ.खालील प्रश्नांची उत्तरे 3 वाक्यात लिही.
1.आई बाबांच्या अंगी कोणता भाव आहे? व मनी काय आहे?
उत्तर – आई बाबांच्या अंगी शुद्ध भाव आहे व मनात प्रेम आहे.
2.त्याच्या घरी समाधान कशामुळे खेळत आहे?
उत्तर – आई बाबांची नभाहून मोठी माया,सागरासारखे विशाल हृदय
यामुळे त्यांच्या घरी समाधान खेळत आहे.
3. कवीने आपल्या आई वडिलांची सेवा कशा पध्दतीने केली आहे?
उत्तर – कवीने आपल्या देवतुल्य आई बाबांना मानाचे स्थान देऊन
त्यांची चरण धूळ माथी लावून,त्यांची नेहमी सत्य बोलण्याची शिकवण अंगी बाणवून आई
वडिलांची सेवा केली आहे.
4.तू तुझ्या आई बाबांबद्दल काय लिहिशील?
उत्तर – आई बाबांबद्दल जेवढ लिहावं तेवढं कमीच आहे.आपले
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला ‘आई’ म्हणतात.पण
डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतात त्याना ‘बाबा’ म्हणतात.
ई.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण कर.
1. पेटवून त्यांच्यापाशी, दोन नेत्रज्योती,
लावुनिया पावन होतो, चरणधूळ माथी
सदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई ॥1॥
2. नभाहून मोठी माया, हृदय सागराचे
समाधान खेळे सदनी, शांति वैभवाचे
प्रपंचात राहूनियां, सत्वशील राही ॥3॥
उ.खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. आई – माता,जननी
2. बाप – वडील,बाप
3. डोळे – नयन,लोचन
4. नभ – आकाश
5. सागर – समुद्र
ऊ.या कवितेतील यमक साधणारे शब्द उदाहरणाप्रमाणे लिहा.
उदा. आई – नाही
1. नेत्रज्योती – माथी
2. प्रेम – नेम
3. सागराचे– वैभवाचे