पाठ – 15
झोका
नवीन शब्दांचे अर्थ
टांगणे – लटकाविणे
ठेंगा – लहान, बुटका
शहारणे – अंगावर काटा येणे
वेगा – वेगाने, जोराने
भुंगा – एक प्रकारचा किडा
वाकुल्या दाखविणे – चिडविणे
पिंगा – गोल फिरणे
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. झोका कशावर टांगला आहे?
उत्तर – झोका झाडावर टांगला आहे.
२. खाण्यासाठी कोणकोणते पदार्थ आणण्यास सांगितले आहे?
उत्तर – खाण्यासाठी गूळ,खोबरं,पेढा,शेंगा हे पदार्थ आणण्यास सांगितले आहे.
३. झोका खेळताना आपण कसे वागले पाहिजे?
उत्तर – झोका खेळताना आळीपाळीने बसावे,दंगा करू नये.
४.
झोका वर खाली झाला म्हणजे पोटामध्ये काय होते?
उत्तर – झोका वर खाली झाला म्हणजे पोटामध्ये गुईं गुईं भुंगा झाल्यासारखे होते.
५. दादा ठेंगा कसा झाला?
उत्तर –झोका उंच गेल्यावर दादा ठेंगा झाला.
६. अंग कशामुळे शहारते?
उत्तर – झोका घेताना गार गार हवा लागल्याने अंग शहारते.
७. मोठे सुख कोणते?
उत्तर – आईने दिलेला झोका हे मोठे सुख आहे.
आ. नमुन्याप्रमाणे कवितेच्या आधारे तालबद्ध शब्द लिही.
नमुना :- टांगा – रांगा
शेंगा – दंगा
वेगा – भुंगा
ठेंगा – डिंगा
अंगा – पिंगा
रंगा – सांगा
ई. कवितेच्या ओळी पूर्ण कर.
नमुना : झोक्यासाठी लावा भराभर रांगा
१. आळी पाळी बसू
नका करू दंगा
२. पोटामधि माझ्या
गुईं गुईं भुंगा
३. ताईला वाकुल्या
डिंग डिंग डिंगा
४. मजा आली किती
वारा घाली पिंगा
५. सुख मोठे कुठे
याच्याहुनि सांगा