परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
3 गुणांसाठी येणारे कांही महत्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे
१. भारत आणि रशिया संबंध स्पष्ट करा. – बंधुत्वाचे नाते
1.१९६२ चीनचे आक्रमण
2.१९६१ गोवा मुक्ती संग्राम
3.अलिप्तवादी धोरण आवलंबिले
4.१९६६ भारत पाकिस्तान युद्ध
5.ताश्कंद करार
6.१९७१ मध्ये भारत–रशिया दरम्यान २० वर्षांचा शांती व मैत्री करार
7.बोकारो व भिलाई येथील लोह उत्पादन
8.UNO सुरक्षा समितीत भारताला सदस्यत्व मिळवून देण्यासाठी रशियाने भाग घेतला.
२. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची कारणे कोणती?
1.१९४७ साली विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांची निर्मिती
2.भारत पाकिस्तानकडून बंधूभावाची अपेक्षा करतो
3.लष्करी राजवट राजकीय अस्थैर्य
4.१९४७–४८, १९६५, १९७१, १९९९ भारत–पाक युद्धे
5.काश्मीरचा १/३ भाग बळजोरीने पाकने ताब्यात घेतला
6.दहशतवादाला खतपाणी घालून भारत विरुद्ध संघर्ष पाकने केला.
३. भारत–चीन संबंधात तणाव का निर्माण झाला?
1.भारताचे शेजारचे राष्ट्र चीन
2.१९४९ मध्ये कम्युनिस्ट राजवट सुरू झाली शांततापूर्व सह जीवनासाठी पंचशील तत्वाचा करार
3.१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण आणि तिबेट बळकाविले
4.अरुणाचल प्रदेशावरही आपला हक्क सांगितला. चीन भारतामध्ये नक्षलवादाला खतपाणी घालून दहशतवादी कारवाया करत आहे.
5.अण्वस्त्र निर्मिती
6.विदेशी व्यापाराची आव्हाने
7.सीमा रेषेतील सैनिकी आक्रमण
४. भारत आणि श्रीलंकामध्ये ऐतिहासिक संबंध आहेत चर्चा करा.
1.भारताच्या दक्षिणकडील छोटेसे राज्य
2.दोन्ही राष्ट्रे एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतात.
3.श्रीलंका ‘सार्क‘ची सदस्य आहे.
4.भारताने श्रीलंकेशी आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सुसंबंध निर्माण केले.
5.तामिळी संघटना LTT
विरोधात लढण्यासाठी भारताने श्रीलंकेच्या मदतीला ‘शांतीसेना‘ पाठविली.
6.तामिळी व सिंहली परस्पर सहकार्य –
7.शांततापूर्व सहजीवन भारताला अपेक्षित आहे.
8.श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार बौद्ध भिक्षूकांनी केल्याचे दाखले इतिहासात आढळतात.
५. भारत आणि अमेरिका या लोकशाही राष्ट्रामधील संबंध कसे आहेत?
1.भारत आणि अमेरिका ही जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र –
2.भारत हे अलिप्तवादी NAM
राष्ट्र असल्याने शीत युद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया सुरक्षित अंतर राखले आहे.
3.आर्थिक विकासाला मदतही केली.
4.१९६२ च्या चीनच्या आक्रमणकाळात मदतही केली.
5.या क्षेत्रात अमेरिका व भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
6.संयुक्त राष्ट्र संघाच्या अंतरराष्ट्र शांततेच्या तत्वाशी उभय देश कटिबद्ध आहेत.
६. पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचे परिणाम काय झाले?
1.ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानिकांशी केलेला करार स्वीकारण्यात आला.
2.महत्वाकांक्षी विस्तार योजनांना आळा बसला. भारतीयांना स्थिर सरकार देण्याचे आश्वासन दिले.
3.कायद्यामध्ये समानता ठेवली गेली.
4.धार्मिक सहिष्णुता भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला नाही.
७. १८५७ च्या बंडाची राजकीय कारणे कोणती?
1.लॉर्ड डलहौसीने लागू केलेल्या दत्तक वारस नामंजूर कायदा,
2. सातारा, झांसी, जयपूर, उदयपूर ही संस्थाने इंग्रजांच्या अधिपत्याखाली आली.
3..डलहौसीने तंजावरच्या नवाब आणि कर्नाटकाच्या नवाबाची पदे काढून घेतली.
4.मोंगल बादशहा आणि औंधच्या नवाबाचे पद काढून घेतले, लक्षावधी सैनिक बेकार झाले.
८. १८५७ च्या बंडाची शासकीय कारणे कोणती?
न्यायालयाची स्थापना केली.
1.ब्रिटीशांनी दिवाणी अन्य फौजदारी ब्रिटीशांनी पक्षपाती राजकारण केले.
2.इंग्रजी ही न्यायालयाची भाषा होती.
3..बहुतेक करुन इंग्रजांच्या बाजूने न्याय दिला जात होता.
4.सामान्य लोकांच्या आकलनाबाहेर या पद्धती होत्या.
९. १८५७ च्या बंडाची आर्थिक कारणे कोणती?
इंग्लंडमध्ये झालेली औद्द्योगिक क्रांती
1.भारतीय वस्तूवरील कर वाढविला.
2.भारतीय कामगार बेकार झाले.
3.भारतीय कुटिरोद्द्योगाचा नाश झाला.
4.शेतीवरचा कर वाढविला.
5.कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून जमिनी काढून घेतल्या.
१०. १८५७ च्या बंडाचे तात्कालिन कारण –
★कंपनी सरकारने नवीन लांब पल्ल्याच्या बंदुका वापरण्यास सुरुवात केली.त्यांच्या आवरणावर गायीची व डुक्कराची चरबी लावली अशी अफवा पसरली.सैनिकांनी त्या काडतुसा वापरण्यास विरोध केला.
★मंगल पांडे या सैनिकाने ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला.मंगल पांडे याला फाशी दिली.
११. १८५७ च्या बंडाच्या अपयशाची कारणे कोणती?
1.ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरलीच नाही.
2.ही चळवळ ठराविक लोकांच्या हितापुरती मर्यादीत राहिली.
3.अनपेक्षित कारणांचा तो स्फोट होता.
4.इंग्रजी सैन्यातील एकी व भारतीय सैनिकातील असंघटीतपणा,बंडखोरांना योग्य दिशा आणि नेतृत्व लाभले नाही.
5.अयोग्य युद्धनिती अकुशलता,नेतृत्वाचा अभाव, बेशिस्तपणा,अनेक संस्थानिकांनी बंड मोडून काढण्यास इंग्रजांना मदत केली.
१२. भारतातील रस्त्यांचे महत्व स्पष्ट करा.
उत्तर – खेडी आणि शेतीच्या विकासासाठी रस्त्यांची गरज आहे.शेतकऱ्यांचे शेती पीक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची गरज आहे.घरोघरी वस्तू पुरवठा करणे.रस्त्यामुळे सहज साध्य असते.रस्ते वाहतूक ही रेल्वे वाहतूकीला पुरक आहे.उद्योगधंद्द्याच्या वाढीसाठी रस्त्यांची मदत होते.
१३. भूमार्ग वाहतूकीच्या समस्या अनेक खेड्यातील व जिल्ह्यातील रस्ते पावसाळ्यात वाहतूकीसाठी उपयोगात येत नाही.
★भूमार्ग वाहतूक परिसर,प्रदूषण,गर्दी आणि अपघाताला कारणीभूत आहे.
★रस्ते पाऊस, प्रवाह आणि वादळाने खराब होतात.
★रस्त्यांची दुरुस्ती प्रामाणिकपणे होत नाही.रस्त्यांच्या बाजूला आवश्यकतेची कमतरता दिसून येते.
१४. भारतातील प्रमुख बंदरे कोणती?
★पूर्व किनारपट्टीवरील बंदरे :- कलकत्ता, हल्दीया, विशाखापट्टण, चेन्नई, तुतिकोरिन.
★पश्चिम किनारपट्टीवरील बंदरे :- कोचिन, नवीन . मंगळूरु, मार्मगोवा, मुंबई, नाव्हाशेवा, कांडला.
१५. संघटीत कामगार व असंघटित कामगार यातील फरक स्पष्ट करा.
★संघटित कामगार – कायदे व नियमांनुसार एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना संघटित कामगार असे म्हणतात.विशेष प्रशिक्षण बौद्धिक संधी, शैक्षणिक गुणवत्ता याचा लाभ निश्चित वेतन, भत्ता, पगारी रजा, निवृत्ती वेतन सुविधा मिळतात. उदा. सरकारी खाती, कंपन्या, कारखाने इत्यादी.
★असंघटित कामगार– सरकारच्या विशिष्ट नियम आणि नियंत्रणाशिवाय काम करणाऱ्या कामगारांना असंघटित कामगार म्हणतात.कोणतेही प्रशिक्षण, शैक्षणित पात्रता यांचे बंधन नसते.निश्चित वेतन, भत्ता,पगारी रजा,निवृत्ती वेतन सुविधा मिळत नाहीत.
उदा. घरगुती नोकर, शेतमजुर, बांधकाम मजूर, हमाल, हातगाडीवाले इत्यादी.
१६.भारतातील अंतरराष्ट्रीय विमानतळे कोणती?
★ दिल्ली (इंदिरागांधी विमानतळ)
★मुंबई (सहारा आणि सांताक्रुज)
★कोलकत्ता (सुभाषचंद्र बोस विमानतळ)
★चेन्नई (अन्ना किंवा मीनबाकम)
★बेंगळुरु (नाडप्रभू कैपेगौडा)
★हैद्राबाद
★अहमदाबाद
★पणजी
★अमृतसर
★गुवाहट्टी
★तिरुअनंतपुरम
१७. बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय लिहा.
1.लोकसंख्या नियंत्रण
2.कुटीरोद्द्योगांना उत्तेजन
3.कृषी व्यवसायाचा विकास
4.औद्द्योगिक विकास
5.शैक्षणिक सुधारणा
6.पंचवार्षिक योजना
7.तांत्रिक शिक्षणाला उत्तेजन
8.ग्रामीण विकास
9.रोजगाराची खात्री देणारे कार्यक्रम इत्यादी.
१८. गांधीजींच्या ग्राम स्वराज्याची कल्पना विकेंद्रीकरणाच्या भूमिका सांगा.
1.ग्राम स्वराज्य हे गांधीजींचे स्वप्न होते.
2.खेड्यांची जबाबदारी आणि अधिकार ग्रामीण लोकांच्यावर सोपवणे म्हणजेच ग्राम स्वराज्य.
3.स्वयंपूर्ण ग्राम हेच याचे ध्येय आहे.
4.विकेंद्रीकरण हे सर्व प्रकारच्या शोषणाला रोखते.मानवाची स्वतंत्रता आणि घनतेचे रक्षण करते.
5.विकेंद्रीकरणाला अमलात आणण्यासाठी पंचायत व्यवस्था अमलात आणली आहे.
१९. ग्रामीण प्रदेशातील प्रमुख आर्थिक घटकांची यादी करणे. –
1.शेती आणि पशू संगोपनाला चालना देणे.
2.नाश पावत असलेले कुटीरोद्योग आणि लघुद्योग, बहुसंख्य गरीब
3.बेकारीचे प्रमुख कारण
4.अस्वच्छता
5.निरक्षरता
6.अंधश्रद्धा
7.मूलभूत नागरी सुविधांचा अभाव
२०. ग्रामीण विकासाचे महत्व सांगा.
1.गरीबी आणि बेकारीची समस्या दूर करणे.
2.शेती आणि पूरक व्यवसायांची वाढ करणे.
3.ग्रामीण निर्वासितांना थांबविणे.
4.मूलभूत सुविधा पुरविणे
5.कुटीर आणि लघू उद्योगांचे संरक्षण करणे.
6.आर्थिक विकासामध्ये ग्रामीण लोकांना सहभागी करून घेणे.शेतीला पाणी पुरवठ्याची सोय करणे.
२१.ग्रामीण विकासात पंचायतराज्य संस्थेची भूमिका–
1.मूलभूत सुविधांचा विकास करणे साध्य आहे.
2.उद्द्योगावकाश प्राप्त करून देणे.
3.कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे.
4.गरीबी आणि बेकारी दूर करणे.
5.ग्रामीण संस्कृतीचा विकास करणे.
6.नागरिकांना सरकारी सुविधा उपलब्ध करून देणे.
२२. ग्रामीण विकासात महिला स्वसहाय्य संघाचे पात्र स्पष्ट करणे.
1.ग्रामीण महिलांचे सबलीकरण
2.ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविणे.
3.ग्रामीण महिलांमध्ये बचत जागृती निर्माण करणे.
4.उत्पादक प्रक्रियेत महिलांना सहभागी बनविणे. मद्यपान,जुगार यावर नियंत्रण आणणे.
6.बालविवाह,जातीपद्धती यासारख्या सामाजिक समस्या नियंत्रणात आणणे.