परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
राज्यशास्त्र
घटक 1 .
प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
1) 1) 2011 च्या
जनगणनेनुसार भारतात गरिबीचा दर किती होता?
2) भारतात कोणत्या
साली भाषावर प्रांत रचना करण्यात आली?
3) कर्नाटक सरकारने
स्थानिक निवडणुकांमध्ये स्त्रियांना किती आरक्षण दिले आहे?
4) कर्नाटकामध्ये
असमानता दूर करण्यासाठी …………..यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात
आली.
5)
कोणत्या कलमांतर्गत कर्नाटकातील अतिमागास असलेल्या
भागांना विशेष दर्जा देण्यात आला आहे?
6) दहशतवाद्यांनी
मुंबईतील ताज हॉटेलवर ………….यावर्षी साखळी
बॉम्ब हल्ला केला.
7) भारताच्या
पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
8) भ्रष्टाचाराला
नियंत्रित ठेवण्यासाठी कर्नाटकात कोणती संस्था कार्य करते?
9) ‘फोडा आणि राज्य
करा ‘ ही निती कोणी
अवलंबिली?
10) 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती?
11) भारतासमोर
………….. ही एक महत्त्वाची समस्या आहे.
12) राजकीय
भ्रष्टाचार कोणत्या गुन्ह्यांना प्रवृत्त करतो?
13) भारत सरकारने
असमानता दूर करण्यासाठी स्त्रियांना किती आरक्षण दिले आहे?
14) लाचखोरीची गणना कशात केली जाते?
15) जातीयवादाचे एक उदाहरण –
16) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण?