परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
राज्यशास्त्र
घटक 1 .
प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
1) भारताच्या परराष्ट्र धोरणाची सूत्रे कोणी हाती घेऊन यशस्वी करून दाखविली?
2) पंचशील तत्वे कोणत्या दोन देशांमध्ये झाली.
3) …………….. साली पंचशील तत्त्वांचा अवलंब केला.
4) कोणाच्या कारकिर्दीत अलिप्तवादी धोरणांमुळे भारत-पाक संबंध सुधारले?
5) आफ्रिकेतील वर्णभेदाच्या विरोधात कोणी लढा दिला ?
6) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणाला संबोधले जाते?
7) आफ्रिकेचे गांधी असे कोणाला म्हणतात?
8) स्वातंत्र्यापूर्वी भारत कोणत्या देशाची वसाहत होता?
9) जागतिक पातळीवर कोणत्याही गटात सामील न होणे म्हणजे –
10) घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय सहजीवनाचा आदर
करते?
11) सार्क संघटनेत किती देश आहेत?
12) गोर्या लोकांनी काळ्या लोकांना दिलेली वाईट वागणूक म्हणजे –
13) अलिप्तवादी धोरणामुळे कोणत्या देशाकडून भारताला संरक्षण मिळाले.
14) ‘जग हे दृष्ट आहे’ असे उद्गार चीनच्या आक्रमणानंतर कोणी काढले?
15) कोणत्या दोन महासत्ता देशांमधील संघर्षाला शीतयुद्ध म्हटले गेले.
17) भारताने कोणत्या आशियाई संमेलनामध्ये स्वतःचे वसाहत विरोधी धोरण यावेळी जाहीर केले.