19.अपंग आम्हा म्हणू नका..
कवयित्री – शांता शेळके
नवीन
शब्दार्थ
अपंग – शरीरातील
एखादया अवयवात दोष असलेला, दिव्यांग.
चोरपाउली – हळूच
डोळस – शाबूत
दृष्टीचा
सुगंध – चांगला वास
चतुराई – कौशल्ये
कशिदा – एक प्रकारचे विणकाम
क्षितिज – जेथे
जमिनीला आकाश टेकल्यासारखे वाटते ते ठिकाण.
उर्मी – मनातील
भावनांच्या लाटा,
सारथी – रथ हाकणारा
अ. खालील
प्रश्नांची उत्तरे लिही.
१.
अपंगांच्या मनात कोणती जिद्द आहे ?
उत्तर – अपंगांच्या मनात उंच हिमालय चढण्याची जिद्द आहे.
2. त्यांच्या ठाई चतुराई आहे असे कवीला का वाटते ?
उत्तर – जेंव्हा अपंग बोटे
नसतानाही लेखन करतात,विणकाम
करतात.त्यावेळी कवीला वाटते की
अपंगांच्या ठाई चतुराई आहे.
3. सूर्यरथाचा सारथी कोण ?
उत्तर – अरुण
हा सूर्यरथाचा सारथी आहे.
4. सुगंध कसा येतो ?
उत्तर : सुगंध
चोरपावलांनी येतो.
5. आंधळ्या लोकांना कशामुळे ज्ञान (सहजसुख) मिळते?
उत्तर : आंधळ्या
लोकांना हाताच्या स्पर्शाने ज्ञान मिळते.
6. पांगळ्या लोकांच्या कशाला आगळे पंख असतात ?
उत्तर : पांगळ्या
लोकांच्या मनाला आगळे पंख असतात.
आ. तीन ते चार वाक्यात उत्तर लिही.
1. हाताची बोटे नसलेले लोक आपले कौशल्य कशा प्रकारे
दाखवितात?
उत्तर : हाताची बोटे नसलेले लोक सुद्धा लेखन करून,
विणकाम
करून आपले कौशल्य दाखवितात.आजकाल
हाताची बोटे असलेले लोकांनाही नित लिहिता येत नाही,अक्षर चांगले काढता येत नाही पण
हाताची बोटे नसलेले लोक उत्कृष्ट
लेखन,विणकाम
करून आपले कौशल्य दाखवितात.
इ. खालील
कवितेच्या ओळीचा सरळ अर्थ लिही.
1. कळते आम्हां ऊनसावली
सुगंध येतो
चोरपाउली कसे
डोळ्यांवाचुन
डोळस आम्ही स्पर्श देतसे सहजसुखा
उत्तर : वरील ओळी कवयित्री शांता शेळके यांच्या अपंग आम्हा म्हणू
नका या कवितेतील असून या कवितेतील डोळ्यांना कांहीही न दिसणाऱ्या व्यक्ती म्हणत
आहेत कि आम्हाला जरी डोळे नसले तरी आम्ही डोळस आहोत.कारण इतरांप्रमाणे आम्ही
हाताने स्पर्श ज्ञान करू शकतो,आम्हाला सुगंध कोठून येतो आहे हे ही कळते.
2. क्षणाक्षणाला क्षितीज वाढते
स्वप्नासंगे भविष्य घडते
उरात उर्मी
अशी उसळते वेधुन घेऊ अलौकिका
उत्तर : वरील ओळी कवयित्री शांता शेळके यांच्या ‘अपंग आम्हा
म्हणू नका’ या कवितेतील असून या कवितेतील अपंग लोक वरील ओळीतून म्हणत आहेत की,
क्षणाक्षणाला आमचे ज्ञान व अनुभवाचे क्षितीज वाढत आहे.आमचीही स्वप्ने खरी होत आहेत व त्यामुळे आमचे उज्ज्वल भविष्य
घडत आहे.आमच्या मनातील भावनांच्या लाटांनी आम्ही साऱ्यांचे लक्ष वेधून घेऊ.
उलट
अर्थाचे शब्द लिही
1. डोळस
x
आंधळा
2. सुगंध
x
दुर्गंध
3. ऊन
सावली
4. उंच
x
बुटका
उ.खालील ओळी
कंसातील शब्दांच्या सहाय्याने पूर्ण कर. (सूर्यरथाचा, लेखन, भविष्य, हिमालय, सुगंध)
1. चोरपाउली
सुगंध येतो.
2. चढुनी
जाऊ उंच हिमालय.
4. स्वप्नासंगे
भविष्य घडते.
3. बोटावाचुन
लेखन करतो.
5. अरुण
सारथी सूर्यरथाचा.
ऊ.खालील
शब्दांचा अर्थ नमुन्याप्रमाणे लिहा.
उदा. पांगळेपणा – पायांनी चालता न येणे.
1. आंधळेपणा
– डोळ्यांनी न दिसणे
2. बहिरेपणा
– कानाला
ऐकू न येणे
3. मुकेपणा
–तोंडाने बोलता न
येणे
4. बुद्धिमांद्यता – इतरांपेक्षा बुद्धि कमी असणे