20. जावयाची करामत
नवीन
शब्दार्थ
कोनाडा
– भिंतीत असलेली लहान साहित्य ठेवण्याची जागा.
किंचाळणे
– मोठयाने ओरडणे.
भेदरणे
– घाबरणे.
लगावणे
– मारणे
धूम
ठोकणे – पळून जाणे
पाचावर
धारण बसणे – खूप घाबरणे
दबकत – पायाचा आवाज न करता
अ.खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. स्वयंपाकामध्ये
जेवणात कोणता रुचकर पदार्थ वाढला होता ?
उत्तर
– स्वयपाकामध्ये जेवणात काकवी हा
रुचकर पदार्थ वाढला होता.
2. सासूबाईंनी
मडके कोठे ठेवले ?
उत्तर
-सासूबाईंनी मडके शिंक्यावर ठेवले.
3. जावईबुवानी
काकवी पिण्यासाठी कोणती युक्ती केली ?
उत्तर
– जावईबुवांना काकवी प्यायची होती.पण त्यांचा हात शिंक्यापर्यंत
पोहोचत नव्हता.म्हणून त्यांनी कोपऱ्यात धुणे वाळत घालायची
काठी घेऊन त्या काठीने मडक्याला मारून छिद्र पाडायचे आणि
त्या छिद्रातून गळणारी काकवी पोटभर प्यायची अशी
युक्ती केली.
4. जावईबूवा का घाबरले ?
उत्तर
-कुणीतरी आरडाओरडा केलेला ऐकून जावईबूवा
घाबरले.
5. चोरांची
कशी फजिती झाली ?
उत्तर –अंगावर
गळालेल्या काकवीमुळे जावईबुवांच्या सर्वांगाला
कापूस लागला होता त्यामुळे जावईबुवा अस्वलासारखे
दिसत होते.व त्या कापसाच्या अंगाने चालल्यामुळे आणि
बोलल्यामुळे जावईबुवा हे चालते
बोलते अस्वलासारखे दिसू लागले.अशा पांढऱ्या अस्वलासारख्या दिसणाऱ्या जावईबुवांना पाहून
चोरांची फजिती झाली.
6. पांढऱ्या
अस्वलाच्या रुपातील जावईबुवांना पाहताच घरच्या मंडळींची अवस्था काय झाली ?
उत्तर –पां ढऱ्या
अस्वलाच्या रुपातील जावईबुवांना पाहताच घरची मंडळी घाबरून
गेली.कांहींची बोबडी
वळली तर काहींनी भितीने एकमेकांना मिठ्या
मारल्या.जावईबुवांची पत्नी किंचाळत पळून गेली.
आ. खालील
वाक्य कोणी कोणाला म्हटली ते लिहा.
1. “कवी नव्हे
हो,काकवी,ऊसाचा रस उकळताना
तयार होते ती.”
उत्तर
-हे वाक्य जावईबुवांच्या मेव्हण्यांने
जावईबुवांना उद्देशून
म्हटले आहे.
2. “कोण रे
तुम्ही ? इथं काय
करताय ? ”
उत्तर
-हे वाक्य अस्वलाच्या रुपातील जावईबुवांनी चोरांना
उद्देशून म्हटले आहे.
3. “अगं, मला ओळखलं
नाहीस? कमाल आहे
तुझी ?”
उत्तर
-हे वाक्य अस्वलाच्या रुपातील जावईबुवांनी त्यांच्या पत्नीला उद्देशून
म्हटले आहे.
इ.समानार्थी
शब्द लिही.
1. स्वाद – चव
2. रात्र – रजनी
3. स्तुती –
कौतुक प्रशंसा
4. अंधार – तम
5. चोर –
दरोडेखोर
6. साहस – शौर्य
ई. उलट अर्थाचे शब्द लिही.
1. चविष्ट
x बेचव
2. गोड x कडू
3. बाहेर x आत
4. समाधान x असमाधान
5. स्तुती x निंदा
ऊ.खालील वाकप्रचारांचा अर्थ लिहा.
1. बेत
करणे – ठरवणे,निश्चय करणे
2. धूम ठाकणे – पळून जाणे