प्रयोग – वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.
मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
1.कर्तरी प्रयोग –
2.कर्मणी प्रयोग –
3.भावे प्रयोग –
1. कर्तरी प्रयोग (Active Voice) :
कर्त्याच्या लिंग,वचन,पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
उदा . विनायक पुस्तक वाचतो.
(वरील वाक्यातील कर्ता,कर्म,क्रियापद ओळखुया –
वाचणारा कोण? – विनायकने (कर्ता)
काय वाचतो? – पुस्तक (कर्म)
वाचतो – क्रियापद
वरील वाक्यातील कर्त्याचे लिंग वचन पुरुष बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो का पाहुया.
विनायक पुस्तक वाचतो.
विद्या पुस्तक वाचते. (कर्त्याचे लिंग बदलल्यास क्रियापद – वाचते.)
मुले पुस्तक वाचतात. (कर्त्याचे वचन बदलल्यास क्रियापद – वाचतात.)
तुम्ही पुस्तक वाचता. (कर्त्याचे पुरुष बदलल्यास क्रियापद – वाचता)
वरील वाक्यातील कर्त्याच्या लिंग,वचन,पुरुष बदलल्यास क्रियापदाचे रूप बदलते.म्हणून अशा वाक्यांना कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
कर्तरी प्रयोगाची कांही उदाहरणे –
1. गवळी धारा काढत.
2. गीता जेवण करते.
3. सुनिल बोलतो.
कर्तरी प्रयोगाचे प्रकार – कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत.
अकर्मक कर्तरी प्रयोग – ज्या कर्तरी प्रयोगात कर्म नसते व क्रियापद अकर्मक असते त्या कर्तरी प्रयोगास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा. 1. रमेश लिहितो.
2. मुलगी पळते.
3. मी करतो.
वरील वाक्यात कर्म नाही.यातील क्रियापद अकर्मक आहे.
सकर्मक कर्तरी प्रयोग – ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते व क्रियापद सकर्मक असते त्या कर्तरी प्रयोगास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा. 1. रेखा स्वंयपाक करते.
2. रमेश मोबाईल आणतो.
3. तो पाणी पितो.
4. शिक्षक व्याकरण शिकवतात.
वरील वाक्यात कर्म आहे.यातील क्रियापद सकर्मक आहे.कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असते त्या कर्तरी प्रयोगास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :
कर्माच्या लिंग,वचन,पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
उदा . विनायकने पुस्तक वाचले.
(वरील वाक्यातील कर्ता,कर्म,क्रियापद ओळखुया –
वाचणारा कोण? – विनायकने (कर्ता)
काय वाचतो? – पुस्तक (कर्म)
वाचतो – क्रियापद
वरील वाक्यातील कर्माचे लिंग,वचन,पुरुष बदलल्यास क्रियापदाच्या रुपात बदल होतो का पाहुया.
विनायक पुस्तक वाचतो.
विनायकने कविता वाचली. (कर्माचे लिंग बदलल्यास क्रियापद – वाचली.)
विनायकने पुस्तके वाचली. (कर्माचे वचन बदलल्यास क्रियापद – वाचली.)
विनायकने ते वाचले. (कर्माचे पुरुष बदलल्यास क्रियापद – वाच)
वरील वाक्यातील कर्माच्या लिंग,वचन,पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते.म्हणून अशा वाक्यांना कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
कर्मणी प्रयोगाची कांही उदाहरणे –