12. पाखरांनो तुम्ही
कवी – रमेश तेंडूलकर
शब्दार्थ :
■ सायरन – इशारा देणारे ध्वनीक्षेपक, धोक्याची सूचना
देणारा भोंगा
■ ऑल क्लिअर – सर्व ठीक
■ युद्ध्यमान सतत युध्दाची परिस्थिती
■ तालीम- सराव
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) रोज सकाळी याचे सूर पसरतात.
(अ) गाण्याचे
(ब) किलबिलाटाचे
(क) सायरनचे
(ड) पाखरांचे
उत्तर – (क) सायरनचे
(आ) दिलासे कसले दिले जातात ?
(अ) विश्वासाचे
(ब) जीवनाचे
(क) ऑल क्लिअरचे
(ड) होल्डचे
उत्तर – (क) ऑल क्लिअरचे
(इ) न जुळणारा शब्द लिहा.
(अ) खग
(ब) अंडज
(क) विहग
(ड) नभ
उत्तर – (ड) नभ
(ई) घड्याळावर यांचे जीवन अवलंबून आहे.
(अ) पक्ष्यांचे
(ब) माणसांचे
(क) प्राण्यांचे
(ड) यापैकी नाही.
उत्तर – (ब) माणसांचे
प्र 2 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
1 सायरन म्हणजे काय?
उत्तर -सायरन म्हणजे धोक्याची
सूचना देणारा ध्वनीक्षेपक भोंगा
2 आकाश कसे आहे?
उत्तर – आकाश स्वच्छ आणि निळे आहे.
3 हवेत कशाची कंपने आहेत?
उत्तर – हवेमध्ये सायरन नेने ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने
उंच आवाजाची कंपने आहेत.
4 कवीने कोणाला उद्देशून ही कविता लिहिली आहे?
उत्तर – कवीने पाखरांना उद्देशून
ही कविता लिहिली आहे.
5 पाखरांना
कशाची सवय झाली असेल?
उत्तर – पाखरांना सायरनेने
ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने कर्कश सुरांत केलेल्या सुरांची सवय झाली असेल.
प्र. 3 खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा
1.सायरन च्या आवाजाचा पाखरा वर काय परिणाम होतो?
उत्तर – सायरन चे स्वच्छ निळ्या
आकाशात सूर पसरतात.त्या आवाजाच्या उडणाऱ्या लहरीने पाखरे उंच जाताना तसाच आवाजाचा
परिणाम होतो.त्यातील धोक्याचे इशारे ही त्या पाखरांना समजतात. कारण ती सवय बनली आहे.
2.कवीची रोजची तालीम कशी आहे?
उत्कतर – कवीची रोजची तालीम सराव सायरन
ऐकून त्याबरहुकुंम घड्याळ लावणे.त्या घड्याळाच्या वेळेवर त्याला कामे करायची
असतात.तेव्हा धोका केव्हा आहे?केव्हा संपतो?त्याप्रमाणे पुढील कामाचे नियोजन
त्याला करायचे असते.
प्र. 4 संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
1. हवेत चढत जाताना त्या सुरांची उंच-उंच कंपने
संदर्भ वरील पद्यचरण कवी रमेश तेंडुलकर
यांच्या ‘पाखरांनो तुम्ही’ या कवितेतील असून ही कविता जून 1977 च्या सत्यकथा
मासिकातून घेतली आहे.
स्पष्टीकरण – कवीने सायरनच्या यंत्राद्वारे
जोराने उंच आभाळात पाठविलेले कर्कश स्वर
त्यांची कंपने वर वर चढत जातात तेंव्हा हे
पाखरांनो या कंपनांचा तुमच्यावर कोणता परिणाम होतो? त्यांचा अर्थ तुम्हाला कळतो
काय? असे विचारताना कवीने वरील ओळ म्हटली आहे.
2.पाखरानो तुम्हालाही आता त्याची सवय झाली असेल
संदर्भ वरील पद्यचरण कवी रमेश तेंडुलकर
यांच्या ‘पाखरांनो तुम्ही’ या कवितेतील असून ही कविता जून 1977 च्या सत्यकथा
मासिकातून घेतली आहे.
स्पष्टीकरण कवी रमेश तेंडुलकर यांनी युद्धजन्य
परिस्थितीमुळे होणाऱ्या सायरनच्या आवाजाचा माणसाबरोबरच पक्षावरही कसा परिणाम होत
असावा या कल्पनेने ही कविता लिहिलेली आहे. सायरनच्या आवाजावरून कवी आपले घड्याळ
लावून रोजच्या जीवनात केव्हा काय करायचे हे जसे ठरवतो तसाच परिणाम या पाखरांवर ही
झाला असेल त्यांचा परिणाम झाला असेल असे वरील ओळीतून कवी म्हणतात..
प्र. 5 खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा
1. कवीने पाखरांना कोणते प्रश्न विचारले आहेत?
उत्तर – कवीने पाखरांना माणसासारखीच सवय झाली आहे काय?
सायरनचे सुर जेव्हा आकाशात दूर-दूर पसरतात तेव्हा पाखरे कोठे असतात?कोठे जातात? ऑल
क्लिअर सारखे भोंग्याने दिलेले इशारे पाखरांना कळतात,उमजतात काय? आम्ही ज्याप्रमाणे
जीवन संघर्षाची तयारी रोजच करतो तशीच तुम्हीही करता काय? कामाला जाण्यासाठी आम्ही
जशी घड्याळे लावतो त्याप्रमाणे पाखरांनो तुम्ही काय करता? असे प्रश्न विचारले आहेत.
2. सायरनचे सुर ऐकल्यावर माणसे कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात?
उत्तर – युद्धजन्य परिस्थितीमुळे
माणसांना आता सायरनच्या भोंग्यांच्या वेगवेगळ्या सुरावटीची सवय झाली आहे.स्वच्छ
निळ्या आकाशात सूर् पसरल्यावर त्यांचे इशारे जे चांगले किंवा धोकादायक आहेत.ते
रोजच्या सूरामुळे समजतात.सायरनच्या ऑल क्लिअर चा अर्थ धोका संपला असे समजून माणूस
आपले घड्याळ लावून आपल्या कामावर केव्हा कसे जायचे ते ठरवतो.अशा तऱ्हेने सायरनचा
आवाज ऐकून माणूस वागतो
nbsp;
प्र. 6 पुढील प्रश्नांची उत्तरे आठ ते दहा ओळीत लिहा
1. पाखरांच्या आताच्या जीवनावर कोण कोणत्या कारणामुळे समस्या निर्माण झाल्या
आहेत
उत्तर – कवी म्हणतो सध्याच्या युद्धजन्य
पर्यावरण प्रदूषणाने आणि मानवाची जीवन अवस्थाच बिघडली आहे.मग निसर्गातील पक्षाची
स्थिती काय होणार म्हणूनच तो पाखरांना विचारतो की तुम्हालाही आम्हा मानवासारखीच
मोठ्याने आणि वेगळ्या सुरात वाजणाऱ्या सायरनच्या सुरावटीने तुमच्याही जीवनप्रणालीवर
परिणाम केला आहे.त्याने या पाखरांना भोंग्याचे उंच उंच जाणारे स्वर तरंग ऐकून
तुम्ही कोठे जाता? काय करता? कुठे लपता? त्यांनी दिलेले धोक्याचे आणि धोका
संपल्याचे इशारे ऐकून तुम्ही देखील तुमच्या कामाच्या घड्याळाचे काटे फिरवता काय?
हे कसे जमते असे अनेक प्रश्न पाखराना विचारले आहेत.आम्हा मानवावर या भोंग्याचा
सुरवटीचा झालेला परिणाम त्यामुळे त्यांचे जीवनमान बदलले त्याचप्रमाणे प्रदूषणाने
या पृथ्वीतलावरील प्राणी,पक्षी,मानव यांचेही बदलले आहे असे कवीने म्हटले आहे.
भाषा अभ्यास.
अ) खालील शब्दांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1.इशारा –जाणीव सूचना
वाक्य -शत्रूची विमाने आल्याचा इशारा
सायरनच्या वेगवेगळ्या उंच जाणाऱ्या सुरावटी चे दिला जातो
2.दिलासा –आराम वाटणे समाधान वाटणे
वाक्य -सायरनचा ऑल बेल चा सर्व ठीक
असल्याचा सुर ऐकल्यानंतर माणसाला धोका टळल्याचा तेवढाच दिलासा मिळत असे.
3.तालीम –सराव तयारी
वाक्य – पैलवानांना दररोज कुस्तीची
तालीम करावी लागते.
आ) खालील समासाचा विग्रह
करून समास ओळखा.
1. युद्ध्यमान – सतत युद्ध चालू असणार्या
परिस्थितीत (अव्ययीभाव समास)
2.जीवनसंघर्ष – जीवनाची जगण्याची धडपड (षष्ठी
तत्पुरुष समास)
3. न्यायान्याय – न्याय आणि अन्याय इत्यादी. (समाहार
द्वन्द्व समास)
4. दररोज – प्रत्येक दिवशी (अव्ययीभाव समास)
5. वनभोजन – वनात बसून केलेले भोजन (जेवण) (सप्तमी
तत्पुरुष समास)
इ) समानार्थी शब्द लिहा
पाखरू – पक्षी खग
जीवन –जगणे
आकाश –नभ आभाळ व्योम
धोका –अडचण भीती भय
वृक्ष –झाड
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा..