बागवान
– माळी,बगीच्याची देखभाल
करणारा,भाजी विकणारा
असाही एक अर्थ आहे.
पुरस्कार– बक्षीस
पणाला
लावणे – शर्थीने प्रयत्न करणे
अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शिरीष कोठे रहात होता ?
उत्तर
-शिरीष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावाडा येथे रहात होता.
२) शिरीषच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर
– शिरीषच्या वडिलांचे नाव भास्कर होते.
३) शिरीष आणि संगीता कोणता खेळ खेळत असत?
उत्तर
-शिरीष आणि संगीता भाजी विकणारा बागवान हा खेळ खेळत असत.
४) ती दोघे कशासाठी घराबाहेर गेली होती ?
उत्तर
– भाजी म्हणून वेगवेगळया झाडांची पाने गोळा करण्यासाठी ती दोघे घराबाहेर गेली
होती.
५) सरकारने शिरीषचा कसा गौरव केला ?
उत्तर
-सरकारने ‘वीर बालक‘ पुरस्कार
देऊन शिरीषचा गौरव केला.
६) सरकारने शिरीषचा गौरव का केला?
उत्तर
– शिरीषने आपल्या प्रसंगावधानाने संगीताचे प्राण वाचवले.त्याच्या या धाडसाबद्दल
सरकारने त्याचा गौरव केला.
आ) खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार वाक्यात लिही.
१) शिरीष व संगीता हे खेळासाठी कोणते साहित्य वापरत असत ?
उत्तर
– शिरीष व संगीता खेळासाठी निरनिराळ्या झाडांच्या पानांची भाजीछोटे बटाटे,मुळे,काकडी
यांना फळे व छोटे दगड व बिया म्हणजे पैसे हे साहित्य वापरत असत.
२) खेळाचे साहित्य जमविण्यासाठी त्यांनी काय केले?
उत्तर
– खेळाचे साहित्य म्हणजे भाजीसाठी झाडांची पाने जमविण्याच्या नादात दोघेही
घरापासून थोडीशी दूर गेली व आपला जीव धोक्यात घालून त्यांनी साहित्य जमविले.
३) संगीता कोणत्या अडचणीत सापडली ?
उत्तर
– खेळाचे साहित्य जमाविण्याच्या नादात संगीता एका ढिगाऱ्यावर पाय ठेवून हात उंच
करून झाडाची पाने तोडण्याचा प्रयत्न करू लागली.तो ढिगारा पालापाचोळा व शेणाचा
होता.ते तिला कळलेच नाही. ढिगाऱ्याखाली गटार होते.त्या शेणकचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून
संगीता खाली उतरू शकलीच नाही.ती त्या गटारात खाली पडली व ती संकटात सापडली.
४) संगीताला वाचविण्यासाठी शिरीषने काय केले?
उत्तर
– संगीताला वाचविण्यासाठी शिरीषने पळत जाऊन बाजूला पडलेला एक मोठा बांबू आणला व
त्याने संगीताच्या हाताजवळ बांबू नेला व तिला पकडायला सांगितले.संगीता शिरिषपेक्षा
लहान होती. त्यामुळे वजन थोडे कमी होते.त्याने सर्व शक्ती पणाला लावून तिला वर
खेचण्यास सुरुवात केली.शिरीषच्या प्रयत्नाने संगीता कमरेपेक्षा वर आली व धोका
टळला.लगेच शिरीषने ओरडून लोकांना बोलवायला सुरुवात केली.त्याचा आरडा-ओरडा ऐकून लोक
धावून आले.असेपर्यंत शिरीषने केले.
५) संगीताला वर खेचण्यात शिरीषला कोणती अडचण आली?
उत्तर
– संगीता ज्या गटारात पडली तू पाच सहा फुटांची चर होती.शिवाय पावसाचे पाणी व शेण
माती यामुळे गटार भरली होती.हात सोडून संगीताचा सर्व भाग गटारात गेला होता.यावेळी
तिला वर कसे काढावे.संगीता पर्यंत आपला हात नेऊन तिला वर कसे ओढावे अशा अडचणी
शिरीषला आल्या.
इ) तर काय झाले असते सांगा.
१) शिरीष व संगीता खेळण्यासाठी घराबाहेर पडली नसती तर
उत्तर
– तर संगीताचा जीव धोक्यात आला नसता.
२) संगीता संकटात असताना तेथे शिरीष जवळ नसता तर
उत्तर
– संगीताचा जीव गेला असता
३) शिरीषच्या ठिकाणी ‘तू‘ असतास तर
उत्तर
– मी शिरीषप्रमाणे बांबूची काठी किंवा वडाच्या झाडाच्या पारंब्या यांचा आधार घेऊन
संगीताचा जीव वाचवण्यााठी प्रयत्न केला असता.