16. चतुर मैत्रीण
अ. नवीन शब्दांचे अर्थ,
कल्याण – सुख, चांगले, मंगल
अतिथी -पाहुणा
घाम फुटणे -भीती वाटणे.
आ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1. गावातील लोक कसे रहात असत?
उत्तर – गावातील लोक मिळून मिसळून रहात असत.
2. नदी कोठे होती?
उत्तर – नदी गावापासून सुमारे एक मैलावर होती.
3.भटजींना कोणती सवय होती?
उत्तर – दुपारच्या आरतीनंतर घरी येताना दोन तीन माणसांना घरी जेवायला घेऊन येण्याची सवय होती.
4. भटजींच्या पत्नीला उपाशी का रहावे लागे ?
उत्तर – त्यांची पत्नी दररोज दोन किंवा तीन लोकांचे जेवण करायची पण भटजींनी अचानक आणलेल्या अतिथीचे जेवण झाल्यावर तिला उपाशी झोपावे
लागे.
5. भटजींच्या पत्नीने भटजींना कोणते काम
सांगितले?
उत्तर – भटजींच्या पत्नीने भटजींना नदीवरून पिण्याचे पाणी आणण्याचे काम सांगितले.
6. भटर्जीच्या पत्नीने कशाची पूजा केली?
उत्तर – भटर्जीच्या पत्नीने मुसळाची पूजा केली.
7. भटजी अतिथींच्या मागे का लागले?
उत्तर – भटजी अतिथींच्या मागे त्याने थांबवून मुसळ देण्यासाठी लागले.
इ.खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा.
1. भटजींची पत्नी अशक्त का होऊ लागली?
उत्तर- दुपारच्या आरतीनंतर घरी येताना दोन तीन माणसांना घरी जेवायला घेऊन येण्याची सवय होती.त्यांची पत्नी दररोज दोन किंवा तीन लोकांचे जेवण करायची पण भटजींनी अचानक आणलेल्या अतिथीचे जेवण झाल्यावर तिला उपाशी झोपावे लागे.तिने अनेकदा आपल्या पतीला असे न करण्याची विनंती केली.पण त्यांची सवय काही कमी होईना.त्यामुळे अनेकदा भटजींची बायको उपाशी झोपू लागली त्यामुळे ती
दिवसेंदिवस अशक्त होऊ लागली.
2. मैत्रिणीने भटजींच्या पत्नीला कोणता सल्ला
दिला असेल?
उत्तर- पण तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले की तुझी वारंवार होणारी उपासमार चुकवायची असेल तर मी सांगते तो उपाय कर.घरी जेवायला अतिथी आले की मुसळाची पूजा व अतिथीना सांग की,माझे पती रोज कोणाला तरी जेवायला बोलावतात
व पोटभर जेवायला देतात.व त्यानंतर त्यांना मुसळाने मारायला सुरुवात करतात.
3. अतिथी भटजींच्या घरातून न जेवताच का पळाले?
उत्तर- भटजींच्या पत्नीने अतिथीना सांगितले होते की,माझे पती प्रथम जेवायला
घालतात व त्यानंतर अतिथीना मुसळाने मारायला लागतात.म्हणून नदीवरून भटजी पाणी घेऊन
आल्यावर भटजी आपल्याला मुसळाने मारणार या भीतीने अतिथी भटजींच्या घरातून न जेवताच
पळाले.
ई. रिकाम्या जागा भर.
1. नदीच्या काठावर सुंदर देऊळ होते.
2. भटजींची पत्नी दिवसेंदिवस अशक्त होऊ लागली.
3. अतिथींना तिने पाणी दिले.
4. भटजी पाणी आणण्यासाठी नदीवर गेले.
5.आपल्याला पाहिजे तर नवीन मुसळ आणता येईल.
उ. उदाहरणात दर्शविल्याप्रमाणे तक्ता पूर्ण
करा.
उदा. | जा | जाताना |
1 | खा | खाताना |
2 | गा | गाताना |
3 | ये | येताना |
4 | पळ | पळताना |
5 | कर | करताना |
6 | लिही | लिहिताना |
|
|
|
ऊ. उदाहरणात दर्शविल्याप्रमाणे खालील शब्दात लपलेला दुसरा
शब्द शोधून लिही व त्या शब्दाचा वापर करुन रिकाम्या जागा भर.
उदा. सुमन -मन
1. कवन – वन
2. हरण – रण
3. कापूस – पूस, कापू
4.दुपार – पार
5. सवय – वय
उदा. लहान बाळाचे मन निरागस असते.
1. वनाचे रक्षण आमची जबाबदारी आहे.
2. तू खेळात हरलास तरी त्या खेळात भाग घे.
लहान बाळाचे मन निरागस असते.
3. एकच आंबा कापू नकोस.
4. गावातील लोकांनी पिंपळाखाली पार बांधला.
5. माझे वय आता 11 वर्षे आहे.
ए.समानार्थी शब्द लिहा.
पती – नवरा
पाणी – जल
फूल – पुष्प
नदी – सरिता
मैत्रीण – सखी