14.विद्युत धारेचे रासायनिक परिणाम (Chemical
Effects of Electric Current)
1. रिकाम्या जागा भरा.
(a) बहुतेक द्रव ज्यांच्यातून विद्युत धारा वाहते ते आम्लाचे,अल्कलीचे अथवा
क्षाराचे द्रावण असते.
(b) द्रावणातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे रासायनिक
परिणाम घडून येतात
(c) जर तुम्ही कॉपर सल्फेटच्या द्रावणातून विद्युत धारा जावू
दिली तर,
तांबे बॅटरीच्या ऋण ध्रुवाला जोडलेल्या पट्टीवर जमा
होते.
(d) इच्छित धातूचे कोणत्याही दुसऱ्या धातूवर विद्युत धारेच्या
सहाय्याने थर जमा करण्याच्या क्रियेला विद्युत विलेपण म्हणतात.
2. जेव्हा टेस्टरची मोकळी टोके द्रावणात बुडवितात
तेव्हा चुंबकसुची विचलन दर्शविते. याचे कारण तुम्ही स्पष्ट करु शकता?
उत्तर – चुंबकसूचीचे विचलन झाले याचा अर्थ ते द्रावण विद्युतचे वाहक आहे.(ते द्रावण आम्ल,अल्कली किंवा क्षाराचे असले पाहिजे)
3. तीन द्रवांची नावे सांगा? ज्यांची
आकृती क्रमांक 14.9 मध्ये दाखविल्याप्रमाणे परीक्षा घेतली असता
चुंबकसुची विचलन घडून येईल.
उत्तर –
तीन द्रवांची नावे
आम्ल – HCl,HNO3 , H2SO4
अल्कली – NaOH , KOH
क्षार – NaCl ,KCl
4. आकृती 14.10 मध्ये दाखविलेल्या रचनेत दिवा प्रज्वलित होत
नाही. संभाव्य कारणे व स्पष्टीकरण द्या
उत्तर – कारण त्या
द्रावणामध्ये शुद्ध पाणी साखरेचे पाणी आणि अल्कोहोलचे द्रावण असू शकते तेव्हा
त्यामधून धन आयन आणि ऋण आयन तयार झाले नाही म्हणून दिवा प्रज्वलित होत नाही.
5. दोन द्रावणांमधून होणारे विद्युत धारेचे वहन
पहाण्यासाठी टेस्टरचा उपयोग केला गेला (द्रावण Aव
द्रावण B) त्यात आढळले की द्रावण A करता
टेस्टरचा बल्ब अधिक मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झाला. तर द्रावण B करता
तो मंद गतीने पेटला यावरुन तुम्ही अनुमान काढाल की.
(i) द्रव A व B पेक्षा अधिक चांगला वाहक आहे. (बरोबर)
(ii) द्रव B हा द्रव A पेक्षा अधिक चांगला वाहक आहे. (चूक)
(iii) दोन्ही द्रव हे समान वाहक आहेत. (चूक)
(iv) द्रवांच्या वहन गुणधर्माची अशा प्रकारे तुलना करता येत
नाही. (चूक)
6. शुद्ध पाणी (डिस्टिल वॉटर) वीज वाहक आहे का? जर
नाही, तर त्यास वाहक बनविण्यासाठी काय करावे ?
उत्तर – शुद्ध पाणी
वीज वाहक नाही तर त्यास वाहक बनविण्यासाठी त्यामध्ये क्षारयुक्त पदार्थ मिसळावेत.
7. आग लागलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यापूर्वी
अग्निशामक जवान मुख्य विद्युत पुरवठा त्या भागापुरता बंद करतात ते असे का करतात? याचे
स्पष्टीकरण द्या.
उत्तर – आग
विझविण्यासाठी पाण्याचा वापर होतो.पण पाण्यामध्ये अनेक क्षार विरघळलेले असतात.
त्यामुळे पाणी विद्युत सुवाहक बनते समजा पाण्यामार्फत विद्युत वहन झाले तर
अग्निशामक जवानांना विजेचा धक्का बसू शकतो त्यामुळे पाण्याचा मारा करण्यापूर्वी
मुख्य विद्युत पुरवठा बंद करावा.
8. किनारपट्टीवर रहाणारा मुलगा त्याच्या टेस्टरने
पिण्याचे पाणी व समुद्राचे पाणी टेस्ट करतो. समुद्राच्या पाण्यात त्याला चुंबक
सुईत अधिक विचलन आढळते. याचे कारण तुम्ही सांगू शकाल ?
उत्तर – पिण्याचे
पाणी शुद्ध असल्याने त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते समुद्राच्या पाण्यात
अनेक क्षार विरघळलेले असतात.त्यामुळे चुंबक सुईची हालचाल अधिक दिसते. विद्युतचे
वहन सुलभ होते.
9. खूप पाऊस पडत असताना इलेक्ट्रीशियनने बाहेर
विद्युत दुरुस्तीचे काम करणे सुरक्षित असते का? स्पष्ट
करा.
उत्तर – जेव्हा पाऊस
पडतो तेव्हा पावसाच्या पाण्यामध्ये बाहेरील धुरातून क्षार मिसळतात व पाण्यामध्ये
क्षार होतात.ते विद्युत सुवाहक असल्याने बाहेर दुरुस्तीचे काम करणे सुरक्षित
नसते.धोका बसू शकतो.
10. पहेलीने ऐकले होते की पावसाचे पाणी हे
उर्ध्वपातित पाण्यासारखेच शुध्द (चांगले) असते. म्हणून तिने पावसाचे पाणी काचेच्या
भांडयात जमा केले आणि टेस्टरच्या सहाय्याने त्याची परीक्षा घेतली. तिला आश्चर्य
वाटले कारण कंपासच्या सुचीचे तिला विचलन आढळले? याचे
कारण काय असेल?
उत्तर – पहेलीने
ऐकलेले योग्य आहे.पावसाचे पाणी शुद्ध असते.पण जेव्हा आपण पावसाचे पाणी साठवतो
तेव्हा त्या पाण्यात वातावरणातील क्षार धुळीचे कण मिसळतात.त्यामुळे ते विद्युत
वाहक बनते.त्यामुळे पहेलीला कंपास सूचीचे विचलन आढळले.
11. तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या विद्युत विलेपन
केलेल्या पदार्थांची यादी तयार करा.
उत्तर – पाण्याचे नळ,
सायकलचे हँडल,गाडीचे पार्टस्,दरवाजाची मुठ स्वयंपाक घरातील गॅसचा बर्नर,देवघरातील काही सामान मुर्त्या,दागिने इत्यादी.
12. तुम्ही 14.7 मध्ये तांब्याच्या शुध्दीकरणाकरीता वापरलेली
प्रक्रिया पाहिली शुध्द तांब्याची पातळ पट्टी व अशुध्द तांब्याचा जाड दांडा
इलेक्ट्रॉड म्हणून यात वापरतात. अशुध्द तांब्याच्या जाड दांडयावरून पातळ
तांब्याच्या पट्टीकडे तांब्याचे कण वाहून नेले जातात. कोणता इलेक्ट्रॉड बॅटरीच्या
धन अग्राला जोडावा आणि का?
उत्तर – अशुद्ध
तांब्याची जाड पट्टी बॅटरीच्या धनाग्राला जोडलेली असते पातळ तांब्याची पट्टी ऋण
सागराला जोडलेली असते जेव्हा कॉपर सल्फेट च्या द्रावणात विद्युत धारा वहन होते
तेव्हा Cu+ व SO4- मुक्त होतात मुक्त झालेले Cu+ ऋण ध्रुवाकडे आकर्षली जातात आणि
त्या इलेक्ट्रोडवर जमा होतात.