पाठ 14 – चतुर इसाफ
नवीन शब्दांचे अर्थ
घटना – घडलेला प्रसंग
कुरुप – दिसायला चांगला नसलेला
ओझे – बोजा, भार
बुटका – कमी उंचीचा
अशक्त -कमी शक्तीचा
बोजड -अवजड, जास्त वजनाचे
चतुराई – हुशारी
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. श्रीमंत लोक गुलाम का ठेवत ?
उत्तर – श्रीमंत लोक घरात,शेतात किंवा दुकानात काम करण्यासाठी गुलाम ठेवत.
२. इसाप कसा होता ?
उत्तर – इसाप कुरूप, अशक्त व बुटका होता.
३. इसापचा मालक कोठे जाणार होता?
उत्तर – इसापचा मालक व्यापारानिमित्त परगावी जाणार होता.
४. इसापने कोणते गाठोडे उचलले ?
उत्तर – इसापने सर्वात मोठे अन्न-धान्याचे गाठोडे उचलले.
५.
इसाप इतर गुलामांना कोणता प्रश्न विचारत असे?
उत्तर -इसाप इतर गुलामांना “काय म्हणतंय तुझं ओझं?” असा प्रश्न विचारत असे.
आ. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिही.
१. इसापचा मालक कसा होता ?
उत्तर – इसापचा मालक अतिशय चांगला माणूस होता.इसाप त्याचा आवडता गुलाम होता.
२. इसापने अन्नधान्याचे गाठोडे का उचलले?
उत्तर – कारण अन्नधान्याचे गाठोडे सुरुवातीला बोजड वाटणार असले तरी पुढे रात्रीचे जेवण,दुपारचे जेवण करतील तसं अन्नधान्याचे गाठोडे रिकामे होत जाणार होते.
इ. रिकाम्या जागा भरा.
१. सगळ्यानी इसापला वेडा ठरविले
२. इसाप आनंदाने सर्वांची चेष्टा करत प्रवास करत होता.
३. इसापच्या चतुराईची जाणीव सगळ्याना झाली.
४. त्याला बक्षीस देऊन गुलामगिरीतून मुक्त केले.
ई. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळव.
‘अ‘. ‘ब‘
उत्तर – – १. गरीब आ. श्रीमंत
२. चांगला इ.वाईट
३. कुरुप ई.सुंदर
४. बुटका अ. उंच
उ. नमुन्याप्रमाणे
लिही.
उदा. मूल – मुलांना
१.फूल – फुलांना
३. ढग – ढगांना
२. फळ – फळांना
४. थेंब. – थेंबांना