पाठ 14 प्रामाणिकतेचे फळ
नवीन शब्दांचे अर्थ
नियमित – न चुकता
दैनिक – रोज प्रसिद्ध होणारे वर्तमान पत्र
मेहनत – कष्ट
अ.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. वैशाली कोणत्या वर्गात शिकत होती?
उत्तर – वैशाली पाचवीच्या वर्गात शिकत होती.
२. वैशाली सकाळी काय काम करत होती ?
उत्तर – वैशाली सकाळी दुधाच्या पिशव्या व वर्तमानपत्र पोहोचवायचे काम करत होती.
३. साहेबांनी वैशालीला किती रुपये दिले ?
उत्तर – साहेबांनी वैशालीला शंभर रुपये दिले.
४. वैशालीने साहेबांचा शोध कसा घेतला ?
उत्तर – वैशाली दररोज त्या साहेबांना पैसे परत देण्यासाठी त्यांची वाट बघायची.एके दिवशी शाळेला जाताना एका औषध दुकासमोर साहेबांची गाडी दिसली त्यावरून तिने साहेबांचा शोध घेतला.
५. साहेबांनी वैशालीचे सर्व मुलांसमोर कौतुक का केले ?
उत्तर – वैशालीच्या प्रामाणिकपणाबद्दल साहेबांनी वैशालीचे सर्व मुलांसमोर कौतुक केले.
६. वैशालीला आईने काय सांगितले ?
उत्तर – “बाळा ते साहेब केव्हा भेटतील तेव्हा त्यांचे पैसे परत दे. दुसऱ्यांचे पैसे असे ठेवून घ्यायचे नाहीत. ते आपल्या मेहनतीचे नसतात.असे वैशालीला आईने सांगितले.
आ. नमुन्याप्रमाणे शब्द तयार कर.
नमुना:- साभारखत – साखर भात
१) दिलीपाव – दिपावली
२) नायराण – नारायण
३) आत्रमंण – आमंत्रण
४) गननजा – गजानन
इ. तू केलेल्या चांगल्या कामांची यादी कर.
उत्तर –
ई. अनेकवचन लिहा.
नमुना:- पैसा – पैसे
१.केळे – केळी
२. डोळा – डोळे
३. रुपया – रुपये
४. वही – वह्या
उ. कंसात दिलेल्या शब्दाच योग्य रुप गाळलेल्या जागेत भर.
जसे :- मीना शाळेला……..(निघाला, निघाली)
मिना शाळेला निघाली.
1.सुधा पत्र लिहीत. (होती, होता)
उत्तर – सुधा पत्र लिहीत होती.
2.सुनिल ऐकत …….. (नव्हती, नव्हता)
उत्तर – सुनिल ऐकत नव्हती.
3. तो (पळाला, पळाली)
उत्तर – तो पळाला.
4. रमेश शाळेत (आली, आला)
उत्तर – रमेश शाळेत आला.
ऊ. उदा. प्रमाणे शिक्षकांकडून समजून घेऊन लिहा.
दैनिक – रोज प्रसिद्ध होणारे.
१. साप्ताहिक – आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे.
२. पाक्षिक – पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे.
३. मासिक – महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे.
४. वार्षिक – वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे.
ए.
योग्य शब्द लिहा.
१.
मिठ – मीठ
उत्तर – मीठ
२.
पीठ – पिठ
उत्तर – पिठ
३.
शिवार-शीवार
उत्तर – शिवार
४.
बिज-बीज
उत्तर – बीज