18. वयाची अट नाही
मूळ लेखिका
– सुधा मूर्ती
मराठी
अनुवाद – लीना सोहनी
नवीन शब्दार्थ
समस्या – प्रश्न,अडथळा क्रमशः – क्रमाने,
विपरीत -विरुद्ध
पुण्यप्रद – पुण्य
देणारी मुखोद्गत करणे -पाठ करणे
प्रकाशक -पुस्तके
प्रकाशित करणारा
दृढ – ठाम
उत्तीर्ण – पास
शीर्षक – पाठाचे नाव
उद्दिष्ट – ध्येय
स्वावलंबन -स्वतः वर
अवलंबून असणे.
चौरंग – पूर्वीच्या
काळी बसण्यासाठी वापरत असलेला उंच पाट.
स्वाध्याय
अ. खालील प्रश्नांची उत्तरे एक दोन वाक्यात लिही.
१. कर्मवीर साप्ताहिकात कोणती कादंबरी प्रसिध्द
होत होती?
उत्तर -कर्मवीर
साप्ताहिकात काशीयात्रे ही कादंबरी प्रसिध्द होत होती.
२. उत्तर कर्नाटकात कन्नड भाषेत आईला काय म्हणतात?
उत्तर – उत्तर
कर्नाटकात कन्नड भाषेत आईला अव्वा म्हणतात.
३. लेखिकेच्या आजीचे नाव काय होते ?
उत्तर – लेखिकेच्या
आजीचे नाव कृष्णाक्का होते.
४. आजीच्या मैत्रिणी कोठे भेटायला जमत असत ?
उत्तर -आजीच्या
मैत्रिणी देवळाच्या ओसरीत भेटायला जमत असत.
५. लेखिका आणि तिच्या घरातील लोक उन्हाळ्यात कोठे
झोपत असत?
उत्तर -लेखिका आणि
तिच्या घरातील लोक उन्हाळ्यात घराच्या गच्चीत झोपत असत.
६. अव्वाला काय करायचे होते?
उत्तर – अव्वाला
लिहायला वाचायला शिकायचे होते.
७. आजीने लेखिकेसाठी दसऱ्याच्या दिवशी काय आणले
होते?
उत्तर – आजीने
दसऱ्याच्या दिवशी लेखिकेसाठी फ्रॉकचे कापड आणले होते.
८. शेवटी लेखिकेला काय वाटले?
उत्तर – आपली
विद्यार्थिनी पहिल्या श्रेणीत पास झाली असे शेवटी लेखिकेला वाटले.
आ. खालील वाक्ये कोणी, कोणाला व
कधी म्हटली ते लिही.
१. “अव्वा, सगळं ठीक आहे ना ? तू बरी आहेस ना ?”
उत्तर – वरील वाक्य
लेखिकेने आजीला उद्देशून म्हटले
आहे.जेंव्हा लेखिका गावाहून आली तेंव्हा आजीला रडताना पाहून आजीला म्हटले आहे.
२. “अगं मी अगदी लहान होते ना.‘
उत्तर – वरील वाक्य
आजीने लेखिकेला उद्देशून म्हटले आहे.आजीने आपलं बालपण सांगत असताना वरील वाक्य
म्हटले आहे.
३. “मला जर स्वावलंबी होता येत नसेल तर काय
उपयोग त्या सगळ्याचा?”
उत्तर – वरील वाक्य आजीने
लेखिकेला उद्देशून म्हटले आहे.जेंव्हा आजीला आपल्याकडे भरपूर पैसा अडका असूनही
आपल्याला लिहिता वाचता येत नाही याचा राग आला तेंव्हा आजीने वरील वाक्य म्हटले
आहे.
४. “योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय दाखवलात
तर संकटावर मात करता येते”
उत्तर – हे वाक्य
आजीने (अव्वाने) लेखिकेला उद्देशून म्हटले आहे. जेंव्हा आजी आपण लिहायला वाचायला
शिकणार आहे असे सांगत असते तेंव्हा वरील वाक्यातून आपली इच्छाशक्ती व्यक्त करते.
५. “हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे तर
माझ्या गुरूला आहे.‘
उत्तर – हे वाक्य
आजीने (अव्वाने) लेखिकेला उद्देशून म्हटले आहे.आजी आपल्या नातीकडून (लेखिकेकडून) लिहायला वाचायला शिकते.म्हणून
दसऱ्याच्या दिवशी नातीला आपली गुरु मानून तिला नमस्कार करताना वरील वाक्य म्हटले
आहे.
इ. खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे
लिही.
१. आजीने लेखिकेला
आपल्या आयुष्याबद्दल काय संगितले ?
उत्तर – आजी आपल्या आयुष्याबद्दल लेखिकेला सांगताना
म्हणते कि,ती लहान असतानाच तिची आई वारली.तिचा सांभाळ करणारं,तिला चांगलंवाईट काय ते समजावून सांगणारं
कुणीच नव्हतं.आजीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्याकाळी मुलींना शिक्षण देणं
काही इतकं महत्वाचं मानलं जात नसे. त्यामुळे ती कधी शाळेत गेलीच नाही.लहान वयातच आजीच
लग्न झालं,लगेच मुलं झाली. मी संसारात गुंतले.पुढे नातवंडे
झाली.या सर्वात गुंतल्याने आपण शाळेत गेलो
नाही अशी खंत कधीतरी वाटायची.
२. आजीने शिकण्याचा
दृढ निश्चय का केला ?
उत्तर – लेखिका नियमितपणे
आजीला काशीयात्रे या कादंबरीचा भाग वाचून दाखवत असे.पण एके दिवशी लेखिका लग्नाला
कांही दिवस परगावी गेली होती.तेंव्हा नेहमीप्रमाणे तो ‘कर्मवीर‘ चा अंक आला.तो आजीने उघडला ‘काशीयात्रे‘ गोष्टीचं पान उघडलं, चित्रं पाहिली पण काय लिहिलंय,ते काही आजीला समजेना.
तेंव्हा आपण जर शाळा शिकले असते तर? आपल्याजवळ इतका
पैसाअडका आहे,पण मला जर स्वावलंबी होता येत नसेल तर काय
उपयोग या सगळ्याचा?” असा विचार करून आजीने शिकण्याचा दृढ निश्चय केला.
३. दसऱ्याच्या दिवशी
आजीने काय केले
उत्तर – दसऱ्याच्या दिवशी
सकाळी आजीने लेखिकेला देवघरापाशी बोलावून घेतलं.तिथं तिनं लेखिकेला चौरंगावर
बसवलं.लेखिकेने आजीला शिकवलं त्याची कृतज्ञता म्हणून लेखिकेला फ्रॉकचं कापड गुरुदक्षिणा म्हणून दिलं.तसेच
त्यावेळी आजीनं लेखिकेला मला वाकून
नमस्कार केला. व म्हणाली “हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे तर माझ्या गुरूला आहे.‘
ई. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिही.
उदा: आठवड्यातून एकदा
प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
१. निश्चित वेळी
प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
२. दररोज प्रसिद्ध
होणारे – दैनिक
३. पंधरा दिवसातून
एकदा प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
४. महिन्यातून एकदा
प्रसिद्ध होणारे – मासिक
५. वर्षातून एकदा
प्रसिद्ध होणारे – वार्षिक
उ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिही व वाक्यात
उपयोग कर.
१. पचनी पडणे – समजणे
माझ्या आईने समजावून
सांगितल्यावर मला ती गोष्ट पचनी पडली.
२. जिवाचा कान करणे – लक्ष देऊन ऐकणे
वर्गात मुले
शिक्षकांचे शिकवणे जीवाचा कान करून ऐकत होती.
३. मुखोद्गत करणे – तोंडपाठ करणे
साने गुरुजींनी
लहानपणी रामरक्षा मुखोद्गत केली होती.