खालील वाक्ये वाचा.
1. मी बाजारातून पेन आणि शाई आणली.
2. श्रद्धा सर्वांची चेष्टा करते, म्हणून
आईकडून मार खाते.
3. बाबांनी माझ्यासाठी दप्तर व पुस्तक आणले.
4. तू किंवा तुझा भाऊ, दोघांपैकी
एकटाच यायला हवा.
5. पाऊस पडला, परंतु त्याचा
शेतीला उपयोग नाही..
6. आम्ही लिंबूपाणी पितो कारण की ते आरोग्यवर्धक आहे.
7. देह जावो अथवा राहो।
वरील वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द आणि,म्हणून,व, किंवा, परंतु,कारण
की,कारण, अथवा
हे शब्द अव्यय आहेत.या अव्ययांमुळे दोन
शब्दे किंवा दोन वाक्ये जोडली आहेत.
दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी
शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभयान्वयी अव्ययांचे प्रकार –
उभयान्वयी अव्ययांच्या प्रकारानुसार येणाऱ्या शब्दांचा थोडक्यात अभ्यास करुया-
1. समुच्चयबोधक – आणि, व, अन, शिवाय, आणखी, नी.
2. विकल्प बोधक – अथवा, किंवा, वा, नाहीतर, की.
3. न्यूनत्व बोधक- पण, परंतु, किंतु, बाकी.
4. परिणाम बोधक -म्हणून, याकरिता, सबब, केव्हा
5. कारण बोधक – कारण, का, की, कारणकी.
6. उद्देश बोधक – म्हणून, यासाठी, याकरिता, सबब.
7. संकेत बोधक – जर-तर, जरी-तरी,की,जर