9. हिरवळ आणिक
पाणी
कवी – बा. भ. बोरकर
परिचय :
कवी – बा. भ.
बोरकर
पूर्ण नाव – बाळकृष्ण भगवंत बोरकर
(1910-1984)
बा. भ.
बोरकर यांचा जन्म गोव्यातील बोरी येथे झाला.
प्रसिद्ध
काव्यसंग्रह – ‘चित्रवीणा‘, ‘दूधसागर‘, ‘कांचनसंध्या‘, ‘अनुरागिणी‘ इत्यादी
कविता संग्रह
प्रसिद्ध
कादंबरी – ‘भावीण‘, ‘मावळता
चंद्र‘ इत्यादी
हे
सौंदर्यवादी वृत्तीचा आनंदयात्री कवी होते.भारत
सरकारने ‘पद्मश्री‘ पुरस्कार
देऊन त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.
ही
कविता त्यांच्या ‘चित्रवीणा‘ या काव्यसंग्रहातून
घेतली आहे.
नवीन शब्दार्थ
–
■ लव- अंगावरील मऊ कोवळे केस
■आरसपानी -स्वच्छ, पारदर्शी
■कलत्र –
पत्नी
■लावण्य – सौंदर्य
■नेक – सरळपणा,सद्वर्तन
■हिमानी – बर्फाप्रमाणे थंड
■श्रमश्री – परिश्रमरूपी लक्ष्मी
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो
पर्याय निवडून लिहा.
(अ) कवीला गाणी हे पाहिल्यानंतर
स्फुरतात
(अ) हिरवळ आणिक पाणी
(क) चंद्र आणि तारे
(क) वेली व फुले
(ड) मुले आणि मुली
उत्तर –
(अ)
हिरवळ आणिक पाणी
(आ) हवेतून खेळणारे
आरोग्य असे असते.
(अ) सुंदर
(ब) आरासपानी
(क) धडधाकट
(ड) दुबळे
उत्तर –
(ब)
आरासपानी
(इ) शरदाचे आमंत्रण कशात असते ?
(अ) स्मितात
(ब) रागात
(क) लोभात
(ड) मोहात
उत्तर –(अ)
स्मितात
(ई) जीवन सुस्थिर यावर झालेले असते.
(अ) प्रेम
(ब) विश्वास
(क) अश्रद्धा
(ड) भक्ती
उत्तर –(ब)
विश्वास
प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका
वाक्यात लिहा.
(अ) आनंदाचे पाझर कोठे सापडतात ?
उत्तर – उन्हात ज्या ठिकाणी कोमल अशा हिरव्यागार
गवताची पाती,त्यांची
छाया दिसते,गवत
पसरलेले असते तेथे आनंदाचे पाझर सापडतात.
(आ) शृंगाराची निर्मळ अमृतवाणी कोठे
आढळते?
उत्तर – ऋतूऋतूतुन जिथे जिथे नवनवे सोहळे या
सृष्टीवर मोकळेपणी पाहता येतात,दिसतात अशा उघड्या अंगणात शृंगाराची
निर्मळ अमृतवाणी आढळते.
(इ) दिलासा कशामुळे मिळतो?
उत्तर – माणसाला दुसरा माणूस ज्या ज्या ठिकाणी
हवाहवासा वाटतो आणि जेथे अभंग,ओवीसारख्या काव्यातून तो दिसतो,कानावर
येतो आणि विश्वास असतो तेथेच दिलासा मिळतो.
(ई) मनाला उद्याचा भार केव्हा नसतो ?
उत्तर – ज्यांच्या हृदयात परमेश्वराबाबत सदैव आदर
असतो अशा माणसांच्या मनाला उद्याचा भार नसतो.
प्र. 3 (रा) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन
वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) वासरे कोठे व कशी चरतात?
उत्तर – जिथे उत्तम असे हिरवे कोवळे गवत उगवले
आहे.जेथून येणारे वारे आपल्या त्वचेवरील कोमल लव थंड वार्याने फुंकारते.जिथे अशा
प्रकारच्या आरोग्य आहे तेथेच गुरे,वासरे आनंदाने चरतात.
आ) समृद्ध धरित्रीच्या ठिकाणाचे वर्णन कवीने कसे
केले आहे?
उत्तर – जिथे ही भूमी समृद्धतेने नटलेली आहे.मुले
आणि पती-पत्नी सर्व आनंदाने सुखाने नांदत आहेत.जिथे सासरीदेखील एखादी सौंदर्यवती
माहेरवासिणही स्व-परिश्रमाच्या लक्ष्मीची प्राप्ती करू शकते असे ठिकाण भूमीवरील
समृद्ध ठिकाण असतो हे कवी म्हणतो.
(इ) अंगणात शृंगाराची निर्मळ अमृतवाणी
केव्हा असते?
उत्तर – सहाही रुतून पैकी वसंत ऋतुसारखा ऋतू राजाचा
सोहळा असतो.जिथे उघड्या मोकळ्या माळावर आणि घराघरातील अंगणातून वसंत ऋतूचा फुललेला
असतो अशा त्या जागी शृंगाराची अमृतवाणी ऐकावयास आणि पहावयास मिळते.
प्र. 4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) जिथे अशी समृद्ध धरित्री
घुमति घरे अन् पुत्र कलत्री
उत्तर –
संदर्भ – वरील काव्यपंक्ती कवी बा भ बोरकर यांच्या
हिरवळ आणिक पाणी या कवितेतील असून ही कविता त्यांच्या ‘चित्रवीणा‘ या
काव्यसंग्रहातून निवडली आहे.
स्पष्टीकरण – जेथे आपली धरित्री,घरांचे
अंगण मुलाबाळांनी गजबजलेले आणि पती-पत्नी आनंदाने नांदत असतात.अशा सुंदर
वातावरणातच या कवीला कविता स्फुरते हे सांगताना कवीने वरील ओळी म्हटल्या आहेत.
(आ) माणूस जेथे हवाहवासा
अभंग – ओवीमधे दिलासा
संदर्भ – वरील काव्यपंक्ती कवी बा भ बोरकर यांच्या
हिरवळ आणिक पाणी या कवितेतील असून ही कविता त्यांच्या ‘चित्रवीणा‘ या
काव्यसंग्रहातून निवडली आहे.
स्पष्टीकरण – एका माणसाला दुसरा माणूस,एका
व्यक्तीला दुसरी व्यक्ती हवीहवीशी वाटते. एकमेकाबद्दल प्रेम आपुलकी
वाटते.ज्यांच्या तोंडून अभंग,ओवीसारखीच वाणी ऐकू येते.अशा त्याठिकाणी
एकमेकांना एकमेकांबद्दल विश्वास दिलासा असं वाटत असतो.असे कवी वरील ओळीतून सांगतात.
प्र. 5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा
ओळीत उत्तरे लिहा.
(अ) शरद ऋतूचे वर्णन कवीने कसे केले
आहे ?
उत्तर – आपल्या सख्या प्रियकराबाबत जसे बंधन
नसते.त्याविषयीचे आदर युक्त प्रेम असते.त्या प्रियकराकडे पाहून हसताना त्या
हास्यातून जणूकाही शरद ऋतूचे पीठ्ठर चांदणेच सर्वत्र पसरल्यासारखे विखूरल्यासारखे
वाटत असते.त्या गोड हसण्यातूनच आपण शरद ऋतुला आमंत्रण देऊन बोलावत असतो व त्याचा
आनंद घेतो.शरद ऋतू म्हणजे प्रेम निर्माण करणारे लोभस चांदणे आहे असे कवी म्हणतो.
(आ) देव जिथे हृदयात सदाचा भार मनाला
नसे उद्याचा‘ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर – कवी बा.भ.बोरकर म्हणतात,जिथे
ज्या माणसांच्या हृदयात,मनात देवाबद्दल आदर श्रद्धा व भक्ती व
विश्वास आहे अशा माणसांच्या मनात उद्या आपले कसे होईल याची चिंता नसते.तो चिंतेचा
भर परमेश्वराने उचलल्याचा त्यांना विश्वास असतो. कारण अशी माणसे दुसऱ्याच्या सुखात
सुखात सुख म्हणतात आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या होणारे दुसऱ्यांच्या होणारे दुःखामुळे
त्यांनाही वाईट वाटते ती काळजी परमेश्वराला आहे असा भरवसा विश्वास त्यांना असतो.
प्र. 6 (वा) खालील प्रश्नाचे सात ते आठ ओळीत
उत्तर लिहा.
(अ) या कवितेमध्ये केलेले निसर्गाचे
वर्णन तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर – कभी बात हो बोरकर यांनी हिरवळ आणिक पाणी या
कवितेतून त्यांना त्यांचे काव्य केव्हाच स्फुरते लिहावेसे वाटते.त्याचे वर्णन केले
आहे ते म्हणतात.जेथे हिरवळ आणिक पाणी आहे.निळ्या आकाशातून जिथे पाखरे-पक्षी किलबिल
करत फिरतात.त्या वेळेस कविता स्फुरते.जिथे हिरवळीवर गुरे चरत सर्व सुख आनंदात
फिरतात. जिथे आरोग्यदायक हवा असते.ज्या ठिकाणची भूमी भरपूर धान्य पिकविते.जिथे
मुलेबाळे पती-पत्नी आनंदाने राहतात,रमतात.सहाही ऋतूचे सर्व सोहळे
पहावयास अनुभवण्यास मिळतात. अशाच जागी कविता स्फुरते.जिथे माणुसकी आहे, अभंग
ओवीतील गोडवा समजतो व त्यांचे जीवनात प्रत्यंतर येते.तेथेच कविता स्फुरते.असे
कवीने म्हटले आहे.
भाषाभ्यास :
(अ) खालील ओळीतील अलंकार ओळखून लक्षण
लिहा.
उरी जिथे भूमीची माया । उन्हात घाली हिरवी छाया ।
उत्तर – दृष्टांत अलंकार
लक्षण – एखादी गोष्ट
पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे उदाहरण देणे हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण
आहे. या ओळीत मातीच्या माया पटवून देण्यासाठी झाडांच्या सावलीचे उदाहरण दिले आहे.
(आ) खालील शब्दांचा विग्रह करून समास
ओळखा.
पानोपानी
प्रत्येक पानातून -अव्ययीभाव समास
निर्मळ –
वाईट विचार नाहीत असे ते – कर्मधारय
समास
अमृतवाणी – अमृताप्रमाणे
– कर्मधारय समास
सुस्थिर एकाच जागी असणारे –
कर्मधारय समास
(इ) समानार्थी शब्द लिहा.
पाणी – जल
पाखरू – पक्षी
पुत्र – मुलगा
चित्त – मन
छाया – सावली
धरित्री- जमीन
डोळा – नयन