पाठ 12. यंत्र
लेखक- योगीराज वाघमारे
‘गुडदाणी‘ या कथासंग्रहातून ही कथा संक्षिप्त रूपात घेतली आहे.
मूल्य – श्रमप्रतिष्ठा
शब्दार्थ व वाक्प्रचार :
■ कोरड पडणे – शोष पडणे
■ डाफरणे – चवताळणे, रागावणे
■ पांद – लहान वाट
■मोगरी -लाकडी हातोडा
■ रास – ढीग
■ बिमार -आजारी
■ बिदागी – मानधन
■ बळीराजा – कुणबी,शेतकरी
■गुमास्ता – मुखत्यार, मुनीम
■ टोळभैरव – रिकामटेकडा
■ निर्विकार -विकारशून्य, उदासीन
■अवसान- हिंमत,धैर्य
■गर्भगळीत होणे – अतिशय घाबरणे
■हताश होणे – निराश होणे
■तुटून पडणे-हल्ला करणे,नेटाने
कामास लागणे ■डोळे भरून पाहणे – मनाचे समाधान होईपर्यंत
पाहणे.
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य पर्याय
निवडून लिहा.
(अ) यंत्र ही कथा कोणत्या कथासंग्रहातून घेतले
(अ) उद्रेक
(ब) बेगड
(क) गुडदाणी
(ड) पराभव
उत्तर – (क) गुडदाणी
(आ) वामन कोणाच्या मळ्याकडे निघाला
होता ?
(अ) रामा सावकार
(ब) आबा सावकार
(क) पाटील मळा
(ड) काका सावकार
उत्तर – (ब) आबा सावकार
(इ) करीम गुमास्ता कोणावर डाफरत होता?
(अ) धनगरांवर
(ब) बायकांवर
(क)कामगारांवर
(ड) मजुरांवर
उत्तर – (ब) बायकांवर
प्र.2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका
वाक्यात लिहा.
(अ)आबा सावकाराच्या मळ्यात कोण कोणत्या
पिकांची मळणी होते?
उत्तर -बाबा सावकारच्या मळ्यात जवारी,गहू,हरभरा,करडा इत्यादी पिकांची मळणी होत होती.
(आ) शेतकरी वामनाला केव्हा उसन-पासनं
देतात?
उत्तर -मागे काम केलं म्हणून कुणीही शेतकरी वामनला पुढे कधीही उसन- पासनं देत असत.
(इ) मोकळ्या रानात कोणाची जनावरे चरत होती?
उत्तर -मोकळ्या ज्वारीच्या रानातून सावकाराची जनावरं करत होती.
(ई) मळणी यंत्र कोणत्या गावाहून आणले होते?
उत्तर -मळणी यंत्र आदल्या दिवशीच लातूरहून आणलं होतं.
(उ) वामनला बाजीरावाच्या खळ्यावर का
काम मिळाले नाही?
उत्तर -बाजीराव जाधव यांनी गाडीत कणसांची पोती भरून बाबा सावकाराने आणलेल्या मळणी यंत्रावर मळणी करण्यासाठी आबा सावकाराकडे नेल्याने,खळेच नसल्याने वामनाला बाजीरावच्या खळ्यावर काम मिळाले नाही.
प्र.3 (रा) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन
वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) गावातील मळण्या जत्रेच्या अगोदरच
का करतात?
उत्तर – जवानीची खुडणे गव्हाची कापणी हरभऱ्याचा बनवणे ही सर्व करायला महिना बस लागत असे पुढे चैत्र पौर्णिमेला जत्रा भरणार असायचे त्या जत्रेच्या आधी ही सर्व मळणीची कामे संपवावी लागतात असे नाही तर अचानक पाऊस येऊन शेतामध्ये पडलेल्या धान्याच्या राशी खराब होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वाया जायचा म्हणून जत्रेच्या अगोदरच मळण्या करतात.
(आ) आबा सावकाराचे वर्णन लिहा.
उत्तर -आबा सावकार वाड्याच्या कठड्यावर बसत
असत.अंगात मलमलचा शर्ट घालत.त्यातून जानव्याची रेघ दिसत असायची.दात-कोरणं दातांच्या
फटीतून अधून-मधून घालून उगाच ते दात उचकित बसतअसत.त्यांच्या हाता बुडाशी आनंता
माळी बसून पानांची चंची सोडून तो सुपारी कातरून आबांना देत असे.पान लावलं
जायचं.आबा सावकाराच्या विहिरीजवळच्या वाड्या समोरच खळं तयार केलेलं होतं.तेथे काम
करणाऱ्या बायांकडं आबा बघत असत. ‘ आवला,चला…आटपा..‘ म्हणत असत.
(इ) वामनाने गेल्या वर्षीच्या मळणीच्या उत्पन्नातून काय काय खरेदी केले?
उत्तर – वामनाने गेल्यावर्षी दिवसातून दोन-तीन शिवारातील खळी केली.एकेक शेतकऱ्याकडून दोन दोन पोती धान्य वाटून आलं.खूप मिळकत झाली. जत्रा थाटात केली,बायकोला लुगडे घेतले.स्वतःला धोतर
घेतलं.पायात वाहणा घेतल्या आणि बारकीला दोन माशाची (सोन्याची) अंगठी केली.
प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) “आवला, चला… आटपा”
संदर्भ – हे विधान यंत्र पाठातील असून गुडदाणी या योगीराज वाघमारे यांच्या कथासंग्रहातून हा पाठ निवडला आहे.
स्पष्टीकरण -बाबा सावकार कठड्यावर बसून काम करणाऱ्या बायांच्याकडे बघत असत त्यावेळी त्या बायांना उद्देशून “आवला, चला… आटपा” अस म्हणत.
(आ) “कुणीकडं वामना?”
संदर्भ – हे विधान यंत्र पाठातील असून गुडदाणी या योगीराज वाघमारे यांच्या कथासंग्रहातून हा पाठ निवडला आहे.
स्पष्टीकरण – वामन बाजीराव जाधव यांच्या मळ्याकडे ढेंगा टाकीत जात असल्याचे पाहून जाधव यांच्या गाडीवानाने वामनाला उद्देशून वरील वाक्य म्हटले आहे.
(इ) “झालं का मिस्तरी?” संदर्भ – हे विधान यंत्र पाठातील असून गुडदाणी या
योगीराज वाघमारे यांच्या कथासंग्रहातून हा पाठ निवडला आहे.
स्पष्टीकरण – यंत्राकडे नेण्यासाठी कणसांची मोडणी
संपली होती.तेंव्हा आबा सावकाराने यंत्र चालवणाऱ्याला उद्देशून वरील वाक्य म्हटले
आहे.
प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा
ओळीत उत्तरे लिहा.
(अ) मळणीयंत्र सुरू होताच वामनापुढे कोणते प्रश्न उभे राहिले?
उत्तर – यंत्राचा खेळ बघून वामन गर्भगळीत झाला.
सावकाराने असा एक झोपेत धोंडा घातला असे वाटून त्याच्या डोळ्यासमोर सगळा अंधार
पसरला. घशाला कोरड पडली.हातातली मोगरी लटलटू लागली.तो मटकन खाली बसला.हताश झाला.
त्याला पोटाला रोजगार मिळून पावसाळा सुखाचा जाईल असे वाटले होते.हे यंत्र आपले हात
तोडत चालले आहे असे वाटले.यंत्र पोटावरून फिरतय आता यापुढे आम्ही कोणाच्या
तोंडाकडे बघायचं? काय खायचं? कसं जगायचं? असे प्रश्न उभे राहिले.
(आ) वामन मालकाकडे केव्हा पदर पसरत असे?
उत्तर – ब्राह्मण मालकाकडे “बाबा,मला काम सांगा” म्हणून गेल्यानंतर मालकच तुला दिसत नाही होय,काय काम करायचे ते असे म्हणत असे.मग वामन स्वतःच कामाला लागे,बडवणं,उफवणं
करायचं,पोती टाकायची ,वाड्यात आणून थापीला थाप लावायची.मग आपणच पदर पुढं पसरायचा आणि म्हणायचं ‘मालक जवारी घाला..‘मग आबा असो किंवा शेतकरी जे काही पिकलेलं असतं त्यातील दोन-चार पायली जवारी देत.असं चार दोन खळ्यांवर काम केलं की अर्ध पोतं धान्य साठायचं.
प्र.6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत
उत्तरे लिहा.
(अ) आबा सावकाराच्या खळ्याभोवतीचे
वर्णन करा.
उत्तर –
(आ) वामनासंबंधी माहिती लिहा.
उत्तर –
भाषाभ्यास :
(अ) खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून
वाक्यात उपयोग करा.
गर्भगळीत होणे – अतिशय घाबरणे
यंत्रामुळे अनेक कामगारांचे आजचे काम गेले त्यामुळे सर्व गर्भगळीत झाले.
हताश होणे – निराश होण
परीक्षेचा अभ्यास मनासारखा न झाल्याने स्मिता हताश झाली.
तुटून पडणे – नेटाने कामाला लागणे.
सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संपावर गेलेले कामगार कामावर तुटून पडले.
डोळे भरून पाहणे –
डोळ्यात अश्रू येणे,वाईट वाटणे
यंत्र आल्यानंतर खळ्यावर कामे कशी येणार या विचाराने
वामनचे डोळे भरून आले.
(आ) विग्रह करून समास ओळखा.
पालापाचोळा –
पाला,पाचोळा,पाने इत्यादी मिळून..
समाहार द्वन्द्व समास
मळणी यंत्र –
मळणीचे यंत्र – षष्टी तत्पुरुष समास
दहापंधरा
दहा किंवा पंधरा – वैकल्पिक द्वंद्व समास
अनपेक्षित
अपेक्षित नसलेले – नञ् तत्पुरुष समास