100 दिवस वाचन अभियानासाठी कृती व उपक्रम – :
या 100 दिवस वाचन अभियान अंतर्गत 100 दिवसांसाठी खाली दिलेल्या आठवड्यानुसार कृती व उपक्रमांचे नियोजन देण्यात आले आहे.दिलेल्या प्रत्येक आठवड्यातील उपक्रमानुसार या अभियानाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.हे अभियान प्रभावी करण्यासाठी डिझाइन केलेले उपक्रम सोपे आणि आनंददायक ठेवण्यात आले आहेत,जेणेकरून ते घरी उपलब्ध असलेल्या साहित्य/साधनांसह आणि शाळा बंद झाल्यास पालक, समवयस्क आणि भावंडांच्या मदतीने सहज पूर्ण करता येतील.
गट विभागणी –
सदर अभियानासाठी विद्यार्थ्यांची गट विभागणी –
बालवाटीका ते आठवी इयत्तेपर्यंतची सर्व मुले या मोहिमेचा भाग असतील.
बालवाटीका ते आठवीचे विद्यार्थी हे खालील तीन गटांमध्ये विभागले जातील:
गट 1: बालवाटीका ते दुसरी
गट 2: इयत्ता 3री ते 5वी
गट 3: इयत्ता 6 वी ते 7/8 वी
वरील गटनिहाय उपक्रम व कृती नियोजन खालीलप्रमाणे –
उपक्रम नियोजन कन्नड,इंग्रजी व मराठी मध्ये उपलब्ध आहे.
गट निवडा –
गट