धोंगडे
शब्दार्थ व टीपा :
■ सा- ती सर्वनाम
■ अनामिक – नांव नसलेली
■ घर करणे – वास्तव्य करणे
■ रूप पालटणे – रूप बदलणे
■ उमलणे – फुलणे
■ जाहिराती डकवणे – जाहिराती चिकटविणे
■ निर्विकार -आकार नसलेले
■ ओकेबोके- शांत वर्दळ नसलेले
■ महत्ता – महत्त्व
■ एस.एन.डी.टी.- श्रीमती नाथीबाई दामोदर
ठाकरसी
■ लेनिन – रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता
■ स्टॅलिन – रशियाच्या अभ्युदयाचा शिल्पकार
■ कार्ल मार्क्स – साम्यवादी नेता,’दास
कॅपिटल‘ ग्रंथाचा
निर्माता
■ युरी गागारिन – जगातला पहिला अवकाशयात्री
■ स्फुटनिक
– रशियाने अवकाशात सोडलेले जगातले पहिले अवकाश यान.
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो
पर्याय निवडून लिहा.
(अ) रशिया देशाची राजधानी ही आहे.
(अ) लंडन
(ब) मॉस्को
(क) पणजी
(ड) बर्लिन
उत्तर -(ब) मॉस्को
(आ) लेखिका मॉस्कोत या ऋतूत उतरल्या
(अ) वसंत
(ब) शरद
(क) वर्षा
(ड) ग्रीष्म
उत्तर – (अ) वसंत
मॉस्को या नगरीमध्ये इतके लोक राहतात.
(अ) एक कोटी
(ब) दोन लाख
(क) साठ लाख
(ड) नव्वद लाख
उत्तर – (ड) नव्वद लाख
(ई) जगामधील पहिला आवकाशयात्री हा
होता.
(अ) लेनिन
(ब) स्टॅलिन
(क) युरी गागारिन
(ड) गॉर्की
उत्तर – (क) युरी गागारिन
(उ) रशियानं अवकाशात सोडलेलं पहिल
अवकाशयान हे आहे.
(अ) स्फुटनिक
(ब) आर्यभट्ट
(क) अपोलो
(ड) इनसॅक्ट
उत्तर -(अ) स्फुटनिक
(ऊ) मॉस्को शहरात हे प्रसिद्ध
वस्तुसंग्रहालय आहे.
(अ) पिकासो
(ब) रॉडीन
(क) पुष्कीन
(ड) बॉटीसेली
उत्तर – (क) पुष्कीन
प्र.2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात
लिहा
1.लेखिका कोणत्या विषयाच्या
प्राध्यापिका आहेत?
उत्तर -लेखिका एस.एन.डी.टी. विद्यालयात इंग्रजी
विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
2.हा पाठ कोणत्या मूळ पुस्तकातून घेतला
?
उत्तर – हा पाठ देशांतर या प्रवासवर्णनपर पुस्तकातून
संक्षिप्त रूपात घेतला आहे.
3.मॉस्कोला कोणते दोन चेहरे आहेत?
उत्तर- मॉस्कोला एक वरचा (दर्शनी मास्कोपेक्षा
गर्दीने तुडुंब भरून वाहणारे) आणि एक हात लांब (भुयारी मॉस्को)असे दोन चेहरे आहेत.
4.रस्त्याचे सौंदर्य व महत्ता कशाने
वाढले आहे
उत्तर – रस्त्याचे सौंदर्य आणि महत्वा वाढवणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे रशियातील मास्कोतील पुतळे.
प्र. 3 खालील प्रश्नांची दोन किंवा तीन
वाक्यात उत्तरे लिहा
1. 24तास उजेडाचा एक दिवस
लेखिकेने कसा अनुभवला?
उत्तर -लेखिकेने स्किइंगच्या वेगवान चालीने पायाला
चाकं लावून चालणारी गोरीपान मुलं-मुली आणि या सर्व निसर्गरम्य चित्राची मोजमाप
आपल्या परीने दिवसाच्या उजेडात भर घालून वाढवणारा थंड सूर्य होय.परतीच्या प्रवासात
प्यान्गॅन्ग ते मॉस्को या बारा तासाच्या दिवसा उजेडाच्या प्रवासात मॉस्कोमध्ये
पुन्हा बारा तासाचा म्हणजेच एकूण चोवीस तास उजेडाचा दिवस आम्ही अनुभवला होता.
2.एखाद्या शहराचा खराखुरा चेहरा कसा
दिसतो?
उत्तर – एखादं शहर म्हणजे त्यातला निर्जीव वस्तू आणि
हिरवा परिसर नव्हे तर त्या शहराला जिवंतपणा देणारी रक्तामासाची माणसं म्हणजे त्या
शहराचा खराखुरा चेहरा.माणसांचे स्वभाव जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी सारखेच हेच खरं असलं तरी लेखिकेला रशियन लोक शांत,प्रामाणिक कष्टाळू आणि सोशिक वाटले.
3.लेखिकेला कोणता मोठा आनंददायी अनुभव
आला?
उत्तर – मॉस्कोच्या वैभवात भर टाकणाऱ्या दुसऱ्या महत्वाच्या वस्तू म्हणजे इथली प्रचंड दालनानी सजलेली वस्तू संग्रहालय जवळ जवळ साठ संग्रहालयातून साहित्य, कला,क्रांती,शिल्पे,चित्रे
यांच्या स्मृती जतन केल्या आहेत.पुष्कीन म्युझियम पाहताना युरोप आणि रशिया यांच्या
चित्र शिल्पाची जुगलबंदी पाहणं हा मोठा आनंददायी अनुभव होता.बॉटीसेली,व्हेरॉनीस,व्हॅनगॉग,पिकासो,रॅडीन
रेम्ब्रॉ इ.ख्यातनाम चित्रकारांच्या उत्कृष्ट कलाकृतीचे काटेकोर जतन केले आहे.
4.लेखिकेला कोणत्या दोन गोष्टी
स्फूर्तीप्रद वाटल्या?
उत्तर – लेखिकेला रस्त्याचे सौंदर्य आणि महत्ता
वाढवणारे वैशिष्ट्य म्हणजे इथले पुतळे महत्त्वाच्या व्यक्तीचे पुतळे सर्वत्र आपली
वाड्मयीन गुणवत्ता मान मिरवत.महान साहित्यिक लेनिन,स्टॅलिन,मार्क्स
टॉलस्टॉय,पुष्कीन,गॉकीया
शिवाय अंतराळवीरांचे ही पुतळे आहेत.त्या पलिकडे जाऊन अंतराळ विज्ञानात आघाडी
मारणाऱ्या रशियाच्या अस्मितेचे प्रतीक शोभा.असं स्फुटनिकच 108मीटर
उंचीचे मीर अँव्हेन्युवरचा देखणा शिल्प आणि त्यासमोरील अंतराळ विज्ञान जनक
कॉन्स्टटीन रिओलकोव्हस्की याचं स्मारक स्फुर्तिप्रद वाटले.
प्र 4. संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) “ही कामं मुकपणे करणाऱ्या
यंत्रणा फसविण्याची वृत्ती ही कोठे दिसली नाही.”
उत्तर – हे वाक्य ‘सा
रम्या नगरी मॉस्को‘ या पाठातील आहे.हा पाठ देशांतर या अश्विनी
धोंगडे यांच्या प्रवासवर्णनपर पुस्तकातून घेतला आहे.
मॉस्को शहरात आपल्याकडचे तीन चार रस्ते एकत्र जोडून
होईल तेवढी इथल्या रस्त्यांची रुंदी,रस्त्याच्या दुभाजकावरची फुलझाडं आणि
पादचाऱ्यासाठी असणारे खास पथ रस्त्यावर सुळसुळणाऱ्या मोटारी बसेस आणि ट्रॉलीज पण
तेही कर्कश हॉर्न आणि धुराचे प्रचंड लोट बाहेर न सोडता.वेगाने जातानाही पादचारी
रस्ता ओलांडताना थांबून त्यांना आधी जाऊ देण्याची पद्धत त्यामुळे या शहराला एक
समाजात संयम असं प्रौढत्व आला आहे.केवळ पाच कोपेकच्या तिकिटावर कुठेही प्रवास
करण्याची लोकल्स सर्व बसेसमध्ये मुभा आहे.पण कंडक्टर किंवा तिकीट क्लार्क
नाही.म्हणून ही कामं मुक्तपणे करणाऱ्या यंत्रणा फसविण्याची वृत्तीही कोठे दिसली
नाही.
2. “मी निरोप
घेतला”
उत्तर – हे वाक्य ‘सा रम्या नगरी मॉस्को‘ या
पाठातील आहे.हा पाठ देशांतर या अश्विनी धोंगडे यांच्या प्रवासवर्णनपर पुस्तकातून
घेतला आहे.मास्को पाहून लेखिका परतण्यापूर्वी तिने दहा दिवस तेथे जेव्हा अनुभवले शहराचे रंगरूप पाहात शेवटच्या दिवशी विमानतळावर आल्यावर तिने एखाद्या प्रेमळ मित्राचा निरोप घ्यावा.तसा या मॉस्को शहराचा मूक निरोप घेतला.ती विमानाच्या काचेतून किती तरी वेळा खालच्या बाजूस मॉस्को शहर पाहत होते.
प्र. 5 खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत
उत्तरे लिहा.
1.तीस-पस्तीस मैलाच्या प्रवासात
लेखिकेला काय दिसले?
उत्तर – ऐन वसंत बहारमध्ये लेखिका मॉस्को शहरात फिरत
होती.क्षणोक्षणी आपलं रूप पालटणाऱ्या हवाई सुंदरीने प्रत्येकांच्या कौतुकाचा विषय
बनण्याचे हे दिवस विमानतळावरून शहराकडे येणाऱ्या तीस-पस्तीस मैलांच्या प्रवासात
अक्षरश: हिरवेहिरवेगार गालिचे पसरलेले आणि त्यावर नक्षी रेखल्यासारखी हजारो इवलाली पिवळीधमक फुले आपल्याकडच्या शेवंतीसारखी आणि त्यांच्या गोल माळा बनवून केसावर त्या माळणारी एक गोरीपाण फूलपरी मोटारीच्या वेगात पटकन दिसली आणि नाहीशीही झाली.त्यानंतर माॅस्कोच्या वास्तव्यात अनेक रंगांची आकाराची वासाची व बिनवासाची शेकडो अनामिक फुले भेटली.
2.सुरुवातीला लेखिकेला रस्ते फारच
ओकेबोके व निर्विकार का वाटले?
उत्तर – रस्त्यावर उतरल्यावर हातातलं तिकीट चुरगाळून
फेकून देण्याची सवय लागलेल्या हातांना मॉस्कोमध्ये खाली वाकून पुन्हा चुरगळलेले
तिकीट नीट उचलून कचरापेटीत टाकण्याचीटोचणी दोन-तीनदा लावावी लागली.रस्त्यावर थुकणं,कचरा
टाकणं,जाहिराती
डकवण असले प्रकार कुठेही नसल्याने खरं तर सुरुवातीला लेखिकेला रस्ते फारच ओकेबोके
आणि निर्विकार वाटले,पण शहराचे सौंदर्य टिकवण्याची जबाबदारी
प्रत्येक नागरिकाची आहे याची जाणीव झाली.
3.मॉस्कोच्या वैभवात भर टाकणाऱ्या
वस्तू कोणत्या?
उत्तर – बॅले आणि ऑपेरा ही खासियत असणाऱ्या रशियन
कलेच्या सादरीकरणासाठी मास्को मध्ये 90 च्या आसपास नाट्यगृहे आहेत शंभर
सिनेमागृह आहेत जवळजवळ 4200चे लहान-मोठी ग्रंथालय आहेत मास्को च्या
वैभवात र टाकणाऱ्या दुसर्या वस्तू म्हणजे इथली प्रचंड दालनाची सजलेली वास्तु
संग्रहालय जवळजवळ साठ संग्रहालयातून साहित्य कला क्रांती शिल्पे यांच्या स्मृती
जतन केले आहेत
खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा
1. मॉस्कोतील रेल्वे प्रवासाचे वर्णन
करा.
उत्तर – विविध मार्गावर तीन पातळ्यामध्ये पसरलेले
मेट्रोचे प्रचंड जग.ज्याची सुतराम कल्पना वरच्या मॉस्कोमध्ये येत नाही.दर
साठ-सत्तर सेकंदात येणाऱ्या आगगाड्या ना धूर,ना आवाज,ना
शिट्या,ना
भोंगे स्वयंचलित काचेच्या दरवाजाचाच काय होईल तो आवाज.गाडीत गर्दी पुष्कळ पण लेडीज
कंपार्टमेंट फर्स्ट क्लास असला जातीय वाद नाही.गर्दीला ही शिस्त सौजन्य असतो.याची
जाणीव लोकांच्या रक्तातच असावी.उतरते जिने,प्लॅटफॉर्म व आगगाडीचा डबा लोकांच्या
बोलण्याचा आवाज नाही.हास्यविनोद हा,हा,हू,हू
गप्पागोष्टी हा प्रकारच नाही. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे एका पातळीत असल्याने
म्हाताऱ्या व कोताऱ्यांची सोय तर व्हायची, पण सामानाच्या अथवा बाळाचा छोट्या
बाबा गाड्या आत ढकलून गृहिणी बिनधास्त गर्दीत शिरायच्या.फक्त पाहणाऱ्याकडे दृष्टी
हवी इतकेच.
2.मॉस्कोतील रस्त्यांचे वर्णन करा
उत्तर- मॉस्कोतील रस्ते ओकेबोके वाटतात.कारण
रस्त्यावर कागद,चिटोरे,चुरगळलेली
तिकिटे नाहीत.रस्त्यावर थुकणं नाही.कचरा टाकणं.जाहिराती डकवणं असले प्रकार कोठेही
नाहीत.इथला प्रत्येक माणूस शहराचे सौंदर्य टिकवण्याची जबाबदारी घेतो.ही प्रत्येक
नागरिकांची जबाबदारी आहे.आपल्याकडील तीन-चार रस्ते एकत्र जोडून होईल.तेवढी इथल्या
रस्त्यांची रुंदी रस्त्याच्या दुभाजकावरची फुलझाडं आणि पादचाऱ्यासाठीअसणारे खास पद, रस्त्यावर
सुळसुळणारी मोटारी बसेस आणि ट्रॉलीज आहेतच.रस्त्याचं सौंदर्य आणि महता वाढवणाऱ्या
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथले पुतळे ऐतिहासिक व्यक्ती साहित्यिक अंतराळ
विज्ञानात आघाडी मारणारे त्यांचे पुतळे पाहावयास मिळतात.
भाषा अभ्यास
(अ) वाक्प्रचाराचा अर्थ सांगून
वाक्यात उपयोग करा.
1.मनात घर करणे -मनात
ठासणे,मनावर
परिणाम करणे
मॉस्को शहर पाहिल्यानंतर अशी शहरे आपल्या भारतातही
असावीत असे विचार तिच्या मनात घर करून राहिले.
2.ठाण मांडून बसणे –
विस्मरण न होणे,बसलेली
जागा न सोडणे
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी ठाण मांडून बसले.
3.भर घालणे – वाढ
करणे
रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराची फुले मॉस्को शहराच्या
रस्त्याच्या सौंदर्यात भर घालीत होती.
4.जतन करणे -राखून
ठेवणे
मॉस्को शहरातील म्युझियममध्ये पुतळे,साहित्यिकांचे
ग्रंथ,ऐतिहासिक
स्थळे यांचे उत्तम जतन केले आहे.
(ब) विग्रह करून समास ओळखा
1.क्षणोक्षणी -प्रत्येक
क्षणाला
अव्ययीभाव समास
2.स्वयंचलित -स्वतःहून,आपणहून
चालणारे असे ते यंत्र.
कर्मधारय समास
3.गप्पागोष्टी -गप्पा
आणि गोष्टी
इतरेतर द्वन्द समास
4. बिंदास्त -कोणताही
धोका न घेत असता
तत्पुरुष समास
5. ग्रंथालय -ग्रंथाचा
संग्रह असलेले खली / घर
कर्मधारय समास
6.मुलं-मुली – मुले
आणि मुली इत्यादींचा समूह
समाहार व्दंव्द समास
abc2