20. गोपाळकाला
कवी – प्रल्हाद बडवे
कवी परिचय :
प्रल्हाद शिवाजी बडवे (1632
ते 1730) एक साक्षात्कारी संत.पांडुरंगाचे मुख्य पुजारी. त्यानी पांडुरंगाच्या
पुजेचे रोजचे उपचार वैदिक पद्धतीने सुरू केले.‘अमृतानुभव‘ या ज्ञानेश्वराच्या ग्रंथाचे संस्कृत समश्लोकी रुपांतर केले आहे. त्यांचे
मुख्य कर्तृत्व म्हणजे अफजलखानच्या स्वारीच्या वेळी पांडुरंगाच्या मूर्तीचे
त्यांनी केलेले संरक्षण होय त्यांची अकरावी पिढी असून आजही त्यांच्या घरी आळंदीला
जाणाऱ्या पालख्या त्यांना आमंत्रण करून मगच पुढे जातात.त्यानी एक काकड आरती लिहिली
आहे.
या कवितेचा काव्यप्रकार ओवी आहे. ही कविता ‘वाचू आंनदे‘ या पुस्तकातून निवडली आहे.
– भक्ती, समानता)
शब्दार्थ आणि टीपा :
गोपाळकाला-प्रत्येक गोपाळाची
शिदोरी एकत्र करून वाटून घेणे.
विश्वंभर-श्रीकृष्ण
परवडी- प्रकार
आथीपाथी-आतिथ्य
यदुपती-श्रीकृष्ण
कवळ-घास
सुरश्रेणी- देवदेवता
पाषाण-दगड, खडक, कातळ
रुचती -आवडणे
भोज्य-जेवण,पदार्थ
गोपहारी-गोपाळांची रांग
मिथ्या-खोटे,लटके
उच्छिष्ट-उष्टे
गुरळी-चूळ
घन-ढग
वृक्ष -झाड
प्र 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) शिदोऱ्या आणा असे कृष्ण कोणाला म्हणाला ?
उत्तर – शिदोऱ्या आणा असे
कृष्ण सवंगड्याना म्हणाला.
2) सवंगड्यांनी कशाच्या कावडी आणल्या?
उत्तर – सवंगड्यांनी
दुधाच्या कावडी आणल्या.
3) गोपाळकाला कोठे मांडला होता?
उत्तर – गोपाळ काला
विस्तीर्ण शिळेवर मांडला होता.
4) गोकुळवासी स्त्रियांसाठी कोणता शब्द वापरलेला आहे?
उत्तर – गोकुळवासी
स्त्रियांसाठी वज्रनारी हा शब्द वापरलेला आहे.
5) गोप-गोपींचा अतिथी कोण होता?
उत्तर -गोप-गोपींचा अतिथी
यदुपती होता.
6) गोपाळकाला म्हणजे काय ?
उत्तर – प्रत्येक गोपाळाची
शिदोरी एकत्र करून वाटून घेणे म्हणजे गोपाळकाला होय.
7) आकाशातून हा सोहळा कोण पहात होते ?
उत्तर – आकाशातून हा सोहळा देवदेवता पहात होते.
प्र2. प्रत्येक प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(1) एकमेकांना कशाप्रकारे वाकुल्या दाखवितात ?
उत्तर -श्रीकृष्णाने एका
मोठ्या पाषाणावर गोपाळकाला मांडलेला आहे.सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत.एकमेकांना
गुदगुल्या करत वाकुल्या दाखवतात.
2) हा सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या देवांचे वर्णन कसे
केले आहे?
उत्तर – गोपाळ काला हा आनंदी
मंगलमय पवित्र सोहळा पाहण्यासाठी आकाशात देव-देवता विमानात बसून आले आहेत
प्रत्यक्ष डोळ्यांनी ते पाहतात व दिव्य फुलांचा वर्षाव करतात.
प्र3. खालील प्रश्नाचे उत्तर पाच-सहा वाक्यात लिहा. P
1) गोकुळाला धन्य का म्हटले आहे ?
उत्तर – गगनात देव-देवता
बसून स्वतःच्या डोळ्यांनी हा सोहळा पाहून दिव्यफुले अर्पण करीत आहेत आणि ते म्हणत
आहेत,धन्य धन्य गोकुळजण,धन्य धन्य झाड खडक,धन्य धन्य ते स्थान आणि जेथे जगजीवन तेथे नांदे सुख असे म्हटले आहे.
प्र4. खालील प्रश्नांची प्रत्येकी सात-आठ वाक्यात उत्तरे
लिहा.
1) श्रीकृष्ण व सवंगड्यांच्या भोजनाचे वर्णन करा.
उत्तर – श्रीकृष्ण सर्वांना
शिदोरी उघडण्यास सांगतो व सर्व सवांगडी शुद्ध यावर बसतात व श्रीकृष्ण मध्ये
बसतात.ऊंच एका खडकावर गोपाळकाला मांडतात.शिदोर्या व खडक सोडून वज्रनारी एकीकडे
बसतात.त्या श्रीकृष्णाला अतिथी म्हणून पाहुणचार करतात.भोजन करताना एकटा गुदगुल्या
करतो, एकटा चिडवून दाखवतो, एकटा दृष्टी चुकून शिदोरी चोरून खातो,एकटा पळून जातो,एकटा दात विचकून दाखवतो असे वर्णन केले आहे.
2) श्रीकृष्णाचे आदरातिथ्य गोपगोपिकांनी कसे केले ?
उत्तर – गोपिकांनी जे जे
भोजन आणले होते.ते कृष्णमुखी त्यांनी दिले. सवंगडी आणलेल्या दुधाच्या कावडी
श्रीकृष्णाला देत होते. खडकावर त्यांनी गोपाळकाला मांडला. शिदोरी सोडून खडकावर
एकीकडे गोपहारी जातात व एकीकडे वज्रनारी जातात.श्रीकृष्णाचा सन्मान करतात त्या
म्हणतात, यदुपतींचा आदरतिथ्य करू जे जे रुचकर आणतात ते यदुपतीला देतात.
प्र5. जोड्या जुळवा.
अ ब
1)श्रीकृष्ण – शिदोऱ्या आणण्याची आज्ञा देतो.
2)गोप दही दुधाच्या कावडी आणतात.
3)सूर विमानातून सोहळा पाहतात.
4)गोकुळ धन्य धन्य ते स्थान
प्र6. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1) जे जें ज्या रुचीती । ते ते अर्पिती कृष्णमुखी
उत्तर –
संदर्भ -वरील वाक्य कवी
प्रल्हाद बडवे लिखित ‘गोपाळकाला‘ या कवितेतील आहे.
स्पष्टीकरण – जेव्हा गोपिका
येतो पतींचे आदरातिथ्य करीत होत्या तेव्हा त्यांनी रुचकर पदार्थ आणले होते ते
श्रीकृष्णाच्या मुखी अर्पण केले हे सांगताना कवीने वरील ओळी लिहील्या आहेत.
2) दात विचकोनी दाविती
संदर्भ – वरील वाक्य कवी
प्रल्हाद बडवे लिखित ‘गोपाळकाला‘ या कवितेतील आहे.
स्पष्टीकरण – जेंव्हा सवंगडी
व श्रीकृष्ण शिदोऱ्यावर भोजन करण्यास बसले होते.तेव्हा एकटा वाकुल्या दाखवीत होता.
भाषाभ्यास :
अ) पुढील संधी विग्रह करून प्रकार सांगा.
1) जगज्जीवन
संधी – जगज्जीवन
विग्रह – जगत् + जीवन
संधी प्रकार – व्यंजन संधी
2) नयन
संधी – नयन
विग्रह – ने + अन
संधी प्रकार – विसर्ग संधी