संविधान दुरुस्ती
1.संविधान
दुरुस्ती म्हणजे काय?
उत्तर -संविधानीक कायद्यांची स्थिरता हे एक आवश्यक लक्षण
आहे. परंतू निरंतर चालणाऱ्या सामाजिक बदलामुळे आणि बदलत्या परिस्थितीनुसार
संविधानात दुरुस्ती करणे गरजेचे असते.यालाय संविधान दुरुस्ती म्हणतात.
2.भारतीय संविधान
दुरुस्ती पद्धती कोणत्या ?
1.साध्या बहुमताने दुरुस्ती पध्दत
2.विशेष वहुमताने दुरुस्ती पध्दत
3.विशेष बहुमतासह कमीतकमी अर्ध्यापेक्षा
जास्त राज्यांच्या संमतीने दुरुस्ती करण्याची पध्दत इ. होय.
3.साध्या
बहुमताने दुरुस्ती पध्दत म्हणजे काय?
उत्तर -संविधानाचा काही भाग संसदेतील (लोकसभा आणि राज्यसभा) संसदेने सामान्य शासकीय प्रक्रियेच्या साध्या बहुमताने (संसदेतील
अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांच्या संमतीने भारतीय नागरिकत्वाची पात्रता) दुरूस्ती
करू शकतो.
उदा: भारतीय नागरिकत्वाची पात्रता
4.विशेष बहुमताने
बहुमताने दुरुस्ती पध्दत म्हणजे काय?
उत्तर -संविधानाचा काही भाग संसदेतील विशेष बहुमताने
दुरुस्ती करू शकतो.विशेष बहुमत म्हणजे संसदेतील सदस्यापैकी दोन तृतीयांश सदस्यांनी
संमती दिल्यास दुरुस्ती करु शकतो.
उदा.मूलभूत हक्क,राज्य मार्गदर्शक तत्वे आणि इतर अंश.
5.भारतीय संविधान
दुरूस्ती करण्याची तिसरी पध्दत वर्णन करा?
उत्तर -संसदेच्या विशेष बहुमतासह अर्ध्यापेक्षा जास्त
राज्यांची संमती घेऊन संविधानाच्या काही भागाची दुरुस्ती करू शकतो.ही पध्दत वरील
दोन्ही पध्दतीपेक्षा कठीण आहे.या पद्धतीनुसार राष्ट्रपतीची निवड,केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकार
वाटप आणि इतर अंश दुरुस्ती करू शकतो.