पाठ ५ स्वातंत्र्य चळवळ
भारताचे प्रथम स्वातंत्र्य युद्ध (1857 – 1858)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1 पहिल्या
स्वातंत्र्य युद्धाचे तात्कालिक कारण कोणते?
उत्तर – जनसमूहाच्या दंग्याचा काळ सहन होणारा नव्हता.त्यांचा
स्फोट होण्यासाठी एक कारण पुरेसे झाले.1857मध्ये नवीन प्रकारची बंदूक [ एनफिल्ड
रायफल ]सैन्यातील शिपायांच्या दंग्याला कारणीभूत झाली.त्यांचा वापर करताना त्या
काडतुसाचे आवरण दातांनी तोडून टाकावे लागात असे.या काडतुसाना गाईची व डुकराची चरबी
फासलेली होती.अशी बातमी सैनिकांना समजली.त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपायांच्या
धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांच्यात असंतोषाची ठिणगी पडली.या
काडतुसांचा वापर करण्यास विरोध करणाऱ्या शिपायांना शिक्षा दिली जाऊ लागली
2 मंगल पांडे कोण होता?
उत्तर- मंगल पांडे हा बंगालमधील बराकपुर मध्ये
ब्रिटिश सैन्यात भारतीय शिपाई म्हणून कार्यरत होता.
3 पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचा
कोणताही एक परिणाम लिहा.
उत्तर – 1
भारताच्या राजकीय सांस्कृतिक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाले
2.स्वातंत्र
युद्धामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली
3.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती असलेली भारतीय सत्ता ब्रिटिश राणीने आपल्या
ताब्यात घेतली
4. 1858 मध्ये राणी हिक्टोरियाने एक घोषणा केली.भारतीयांच्या धार्मिक
स्वातंत्र्यात हस्तक्षेप न करण्याचे स्पष्ट
करण्यात आले.
4. 1857 च्या उठावाला
भारताचे पहिले स्वातंत्र्य असे सर्वप्रथम कोणी म्हटले?
उत्तर – 1857 च्या उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्य
युद्ध असे सर्वप्रथम विनायक दामोदर सावरकर यांनी म्हटले.
5 पहिल्या
स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेला मोगल राजा कोण
उत्तर पहिल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या
मोगल राजा दुसरा बहादूर शहा होय
6 पहिल्या
स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या महिलांची नावे लिहा
उत्तर एक लक्ष्मी बाई दोन बेगम हजरत महल
गटात चर्चा करून लिहा
1.भारतात च्या
पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील कारणांची यादी करा
उत्तर भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धातील
कारणांची यादी खालील प्रमाणे –
1) राजकीय कारण
2) कारभार विषयी कारण
3) आर्थिक कारण
4) सामाजिक आणि धार्मिक कारण
5) लष्करी कारण
6) तत्कालीन कारण इत्यादी होय
2 रा भारताच्या
पहिल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या कर्नाटकातील नेत्यांची नावे लिहा.
उत्तर – भारताच्या
पहिल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या कर्नाटकातील नेत्यांची नावे खालील
प्रमाणे–
1. मुंडरगी भिमराव
2 हलगली जेड समाज
3 सुरपुरचे व्यंकटराय
4 नरगुंदचे बाबासाहेब इ. होय
Swatantra yuddh ke karne