पाचवी मराठी
द्वितीय सत्र
पाठ – 15 एफ्.एम्.
रेडिओ
स्वाध्याय
अ. नवीन शब्दांचे अर्थ.
प्रसारित करणे – सगळीकडे पसरविणे
सत्र – भाग
निवांत – शांतपणे, गडबड न करता
श्रोता – ऐकणारा
प्रक्षेपण करणे – सोडणे, प्रसारित
करणे
निवेदक –सांगणारा
चॅनल (इंग्लिशशब्द) –
मार्ग
आ. खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1.रेडिओवर कोणता कार्यक्रम प्रसारित होणार होता?
उत्तर – रेडीओवर आपली आवड हा कार्यक्रम प्रसारित होणार
होता.
2. मामा खोलीत काय घेऊन आले?
उत्तर – मामा एक छोटासा रेडिओ घेऊन खोलीत आले.
3. एफ्.एम्. म्हणजे काय?
उत्तर – एफ्.एम्.चे पूर्ण रूप फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन असे
आहे.रेडिओ लहरी प्रक्षेपित करताना आपल्या सोयीसाठी त्याच्या वारंवारतेमध्ये थोडा
बदल केलेला असतो त्यामुळे आवाज एकदम सुस्पष्ट ऐकू येतो.याला एफ्.एम्.असे म्हणतात.
4. एफ्.एम्.चा शोध कोणी लावला?
उत्तर- एफ्.एम्.चा शोध एडविन हॉवर्ड आर्मस्ट्रॉंग यांनी
लावला.
5. प्रक्षेपण केंद्र म्हणजे काय ?
उत्तर -जिथून खास यंत्रणेमार्फत हवेमध्ये रेडिओ लहरी चे
प्रक्षेपण आणि प्रसारण केले जाते त्या ठिकाणास प्रक्षेपण केंद्र असे म्हणतात.
इ.खालील प्रश्नांची उत्तरे उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिही.
1.कोणत्याही चार करमणुकीच्या साधनांची नावे लिही.
उत्तर – टीव्ही,रेडिओ,सर्कस, व्हिडिओ
गेम इत्यादी ही करमणुकीची साधने आहेत.
2. एफ्. एम्.चा आवाज सुस्पष्ट कसा ऐकू येतो?
उत्तर – एफ्.एम्. साठी फक्त 87.5 ते
108.0 मेगा हर्टस् या दरम्यानच्या वारंवारतेचा वापर करतात.
प्रत्येक चॅनेलसाठी काही ठराविक किलो हर्टसच्या फरकात या वारंवारता दिल्या जातात.श्रोत्यांनी
आपला रेडिओ या विशिष्ठ वारंवारतेशी जुळवून घेतला की एफ्. एम्. चॅनेल लागतो.मग आवाज
ऐकू येतो.
3. नवीन चॅनेल सुरु करण्यासाठी काय करावं लागतं?
उत्तर -भारतात 1990 च्या दरम्यान याची
सुरुवात झाली. पण आता शेकडो चॅनल्स उदयास आली आहेत.यासाठी खासगी कंपन्याना भारत
सरकारच्या माहिती प्रसारण खात्याकडे काही विशिष्ट रक्कम भरुन परवाना घ्यावा लागतो.
4. एफ. एम्. मधून कोणकोणती माहिती मिळते?
उत्तर – एफ. एम्. मधून गाण्याबरोबरच चित्रपट गीते,करमणुकीचे
कार्यक्रम,हवामानासंबंधी माहिती, मान्यवरांच्या
मुलाखती,प्रेक्षणीय स्थळांची माहिती असे अनेक कार्यक्रम ऐकायला मिळतात.
ई. जोड्या जुळव. (या जोड्यामध्ये या पाठाशी
संबंधित एक जोडी आहे. परंतु या पाठात त्याचा उल्लेख आलेला नाही. तू शोधून लिही)
उत्तर ‘अ‘ ‘ब‘
1. टि.व्ही. 4. करमणुकीचे
साधन
2. एफ्. एम्. रेडिओ 5. एडविन
हावर्ड आर्मस्ट्रांग
3. रेडिओ मिर्ची 1. एफ्.
एम्. चॅनल
4. मोबाईल 2. फिरते ध्वनी यंत्र
5. मार्कोनी 3. रेडिओचा
शोध
6.टेलिफोन