स्वातंत्र्य चळवळ ( १८८५ – १९१९)
खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.
1.गुप्त संघटना स्थापन करणारे पहिले क्रांतिकारक कोण?
उत्तर –गुप्त संघटना स्थापन करणारे पहिले
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे होय.
2.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अध्यक्ष कोण?
उत्तर –भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम
अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी हे होत.
3.राष्ट्रीयता म्हणजे काय?
उत्तर –राष्ट्रीयता म्हणजे एका ठराविक
भौगोलिक प्रदेशातील जनतेच्या मनात असलेली आपण सारे एक आहोत अशी एकतेची भावना होय.
4.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा व कोणी केली?
उत्तर –भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
1885 साली ॲलन ऑक्टेवियन ह्युम यांनी केली.
5.बंगालची फाळणी केव्हा झाली?
उत्तर –बंगालची फाळणी 1905 साली झाली.
6.बाळ गंगाधर टिळकांनी कोणती प्रसिद्ध घोषणा केली?
उत्तर –बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा
माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रसिद्ध घोषणा केली.
7.भारतीय मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?
उत्तर –भारतीय मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झाली.
8.लाल,बाल,पाल या नावाने
लोकप्रिय राष्ट्रीय नेते कोण?
उत्तर –लाल -लाला लाजपत राय
बाल-
बाळ गंगाधर टिळक आणि
पाल –
बिपिनचंद्र पाल या नावाने ओळखले जाणारे लोकप्रिय राष्ट्रीय नेते होय.
9.होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
उत्तर –होमरूल चळवळ टिळक आणि आणि बेझंट
यांनी सुरू केली.
10.जालियानवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? या घटनेला
जबाबदार ब्रिटिश पोलिस अधिकारी कोण?
उत्तर –जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 या दिवशी घडले.या घटनेला जबाबदार
ब्रिटिश पोलीस अधिकारी जनरल डायर होय.
11.कोणत्याही एका गुप्त क्रांतीकारी संघटनेचे नाव लिहा.
उत्तर –एका गुप्त क्रांतिकारी संघटनांची
नाव- मित्रमेळा.
12.इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली?
उत्तर –इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा भगतसिंग
यांनी दिली.
गटात चर्चा करून लिहा.
1.भारतात राष्ट्रीयतेच्या उदयास कारणीभूत अंश लिहा.
उत्तर – भारतात राष्ट्रीयतेच्या उदयास
कारणीभूत अंश खालीलप्रमाणे –
1.पाश्चिमात्य शिक्षण आणि आधुनिक
ज्ञानविज्ञानाचा परिचय
2.एकरूप कारभाराची पद्धत
3.आर्थिक शोषण
4.परंपरेचा परिचय
5.सामाजिक-धार्मिक चळवळी
6.भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य
युद्धाची स्फूर्ती
7.समाजातील तारतम्य इत्यादी होय.
2.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उद्देशांची यादी करा.
उत्तर –भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उद्देशांची यादी खालीलप्रमाणे
1.देशातील
विविध भागातील राजकीय कार्यकर्त्यांमधील स्नेह संबंध वाढवणे.
2.राष्ट्रीय
एकात्मता वाढीस लावणे.
3.जनतेच्या
मागण्या सरकारपुढे मांडून त्या मान्य करून घेणे.
4.प्रांतरचनेला
विरोध करून राष्ट्रीयता वाढीस लावणे इत्यादी होय.
3.भारतीय स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांचे योगदान लिहा.
उत्तर –भारतीय स्वातंत्र्ययुद्धात
क्रांतिकारकांचे योगदान खालील प्रमाणे-
भारतीय
स्वातंत्र्ययुद्धात अनेक क्रांतिकारकांनी हातामध्ये शस्त्र घेऊन स्वतःला झोकून
दिले.त्यांना क्रांतिकारी,राष्ट्रीयता,वादी असे म्हणत.भारताला पूर्णपणे
स्वातंत्र्य मिळवून देण्याचे धैर्य यांच्यात होते.गाढ देशभक्ती आणि त्याग हे
क्रांतिकारकांचे मूलभूत तत्त्व होते. काही क्रांतीकारकांनी गुप्त संघटना स्थापन
केल्या त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके,सावरकर,चाफेकर बंधू,खुदीराम बोस,चंद्रशेखर
आझादभगतसिंग, राजगुरू,सुखदेव असे काही
क्रांतिकारक एकत्र येऊन आपल्या देशातील जनतेला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून
स्वतंत्र करण्यासाठी झटले.पण दुर्दैवाने
काही क्रांतिकारक ब्रिटिशांच्या सापळ्यात अडकले व ब्रिटिशांनी त्यांना
फाशीची शिक्षा सुनावली पण अपार देशप्रेम असलेले हे क्रांतिकारक हसत-हसत फासावर
मुख्य इसवीसन
गांधीजींचा
जन्म – 2 ऑक्टोबर 1869
असहकार
चळवळ – 1920 ते 1940
चौरीचौरा
हत्याकांड – 1922
संपूर्ण
स्वराज्याची घोषणा – 1929
संपूर्ण
स्वराज्य दिनाचरण – 26 जानेवारी 1930
मिठाचा
सत्याग्रह – एप्रिल 1930
पुणे
करार – 1932
दुसरे
महायुद्ध – 1939 ते 1945
भारत
छोडो आंदोलन – 1942
भारत
स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट 1947