14. आता उठवू सारे रान
कवी – साने गुरुजी.
अ. नवीन
शब्दांचे अर्थ.
किसान
– शेतकरी
मजूर –
काबाड कष्ट करणारा
ठाण मांडणे –
एकाच ठिकाणी बसून रहाणे (पण येथे या कवितेत ठाण म्हणजे निश्चयाने सांगणे
असा अर्थ घ्यावा.)
कंबर कसणे
– निर्धार करणे.
आ. खालील
प्रश्नांची उत्तरे लिही
1.शेतकऱ्यांच्या राज्यासाठी काय करायचे आहे?
उत्तर – शेतकऱ्यांच्या
राज्यासाठी प्राण पणाला लावायचे आहेत.
2. एकजुटीची मशाल घेऊन कोण कंबर कसणार आहेत?
उत्तर – किसान व
मजूर एकजुटीची मशाल घेऊन कंबर कसणार आहेत.
3. दाणादाण कोणाची उडणार आहे?
उत्तर – अडवणूक करणाऱ्यांची
दाणादाण उडणार आहे.
4.स्वातंत्र्याचे गान शेतकरी कसे गाणार आहेत?
उत्तर – हातात
तिरंगी झेंडा घेऊन शेतकरी स्वातंत्र्याचे गान गाणार आहेत.
इ. वाक्यात
उपयोग कर
1.ठाण मांडणे
–
निश्चय करणे
शेतकरी आपल्या
मागण्यांसाठी ठाण मांडून बसले.
2. कंबर
कसणे – निर्धार करणे
विद्यार्थ्यांनी
परीक्षेचा अभ्यास करांसाठी कंबर कसली.
3. प्राणपणाला
लावणे – शक्य ते सर्व करणे
भारताला
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांनी प्राण पणाला लावले.
1. रान पेटविणे – खूप कष्ट करणे
सुधीरने परीक्षा पास होण्यासाठी जीवाचे रान
केले.
उ. या कवितेत काही शब्द परकीय भाषेतील
आहेत.
उदा. किसान – हिंदी
मशाल – अरबी
मजूर – फारसी
बेडी – हिंदी