इयत्ता – पाचवी
विषय – मराठी
पाठ 13 मधूला पडलेले स्वप्न
स्वाध्याय
अ.खालील
प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. मधू कोणते पदार्थ आवडीने खात असे?
उत्तर – मधु बाजारातून
आणलेले बिस्कीट केक डोनेट इत्यादी पदार्थ आवडीने खात असे.
2. रविवारी सकाळी मधू कोठे गेला होता?
उत्तर – रविवारी सकाळी
मधु खेळायला गेला होता.
3. आईने जेवणासाठी काय केले होते?
उत्तर- आईने जेवणासाठी
मेथीची भाजी,गाजर,काकडी व टोमॅटो
यांची कोशींबीर शेवग्याच्या शेंगाची आमटी केली होती.
4. कोशिंबीर कशाची केली होती?
उत्तर – कोशिंबीर गाजर
काकडी आणि टोमॅटो यांची केली होती.
5. मधूच्या स्वप्नात आलेल्या फळांची नावे सांग.
उत्तर – मधूच्या स्वप्नात
द्राक्षे,
संत्री,मोसंबी,पेरू,केळी सफरचंद ही फळे आली होती.
6. आईच्या चेहऱ्यावर हसू का आले?
उत्तर – मधूने कोणतीही
तक्रार न करता जेवणातील सर्व पदार्थ आवडीने खाल्ले म्हणून आईच्या चेहर्यावर हसू आले.
खालील प्रश्नांची
उत्तरे तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.
1. रविवारच्या जेवणाचा बेत ऐकून मधूने काय केले?
उत्तर – रविवारी सकाळी
खेळायला गेलेला मधु दहा वाजता घरी आला.खेळून आल्यामुळे त्याला खूप भूक लागली होती.त्याने
आईला विचारले,”आई,आज कोणती
भाजी आहे? आज मेथीची भाजी,गाजर,काकडी,टोमॅटो यांची कोशिंबीर शेवग्याच्या शेंगाची आमटी
केली आहे असे आईने उत्तर दिले.आईचे उत्तर ऐकून “जा,मला नको
हे सगळं!मला नाही आवडत ते.” असे म्हणून मधुरा रागाने माजघरातील सोफ्यावर जाऊन
पडला.
2. स्वप्नात आलेल्या पालेभाज्यांनी मधूला कोणता सल्ला दिला?
उत्तर – मधूच्या स्वप्नात
मेथीची भाजी लाल भाजी पालक हरभऱ्याची ओली भाजी या भाज्या आल्या होत्या.त्यांनी मधुला
पुढील सल्ला दिला.‘आम्ही सर्व भाज्या तुझ्या शरीराला
आवश्यक असणारी खनिजे,क्षार इत्यादींचे पुरवितो.आम्हाला खाल्लेस
तुझ्या शरीराची योग्य वाढ होईल,रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
वाढेल.‘
3. कोणत्या भाज्या कच्या खाल्याने अधिक पोषक घटक मिळतात?
उत्तर – गाजर,काकडी, टोमॅटो या भाज्या कच्च्या खाल्ल्यास अधिक पोषक
घटक मिळतात.
4. समतोल आहार म्हणजे काय?
उत्तर – ज्या आहारात
पिष्टमय पदार्थ,स्निग्ध पदार्थ,प्रथिने,जीवनसत्वे, खनिजे,तंतुमय पदार्थ,पाणी हे सर्व पदार्थ योग्य प्रमाणात असतात.त्या आहारास समतोल आहार म्हणतात.
5.आईला आनंद का झाला?
उत्तर – कारण मधुने
रविवारी कोणतीही तक्रार न करता जेवणाच्या पानावरील सर्व पदार्थ कोणतीही तक्रार न करता
आवडीने खाल्ले व यापुढेही मी सर्व पदार्थ,पालेभाज्या,
फळभाज्या आवडीने खाईन असे आईला सांगितले.म्हणून आईला आनंद झाला.
6. मधूने जेवताना तक्रार का केली नाही?
उत्तर – मधूने कोणतीही
तक्रार न करता जेवणातील सर्व पदार्थ आवडीने खाल्ले तेंव्हा आईने विचारले “बाळ,
नेहमी भाजी खाताना तक्रार करतोस,पण आज बरे मुकाट्याने
खाल्लंस!”त्यावर मधू म्हणाला,“आज हे सर्व पदार्थ माझ्या स्वप्नात
आले होते.या सर्वानी मला त्यांचे महत्व काय आहे ते सांगितले.ते मला पटले. म्हणून मी
आज कोणतीच तक्रार केली नाही.
उ. जोड्या जुळवा.
अ ब
1. मेथी,
पालक हिमोग्लोबीन, खनिजे
2. बटाटा,
नवलकोल, भात, गहू पिष्टमय पदार्थ
3. गाजर जीवनसत्वे
4. दूध तूप
स्निग्ध पदार्थ
5. मूळा, काकडी,
टोमॅटो कोशिंबिरीच्या
भाज्या
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा…