14. सूर्योदय
नवीन शब्दार्थ:
सूर्योदय -सूर्य उगवणे
पांघरून -झाकून घेणे
भूवरी -जमिनीवर
आडून -लपून
डोकावणे -हळूच पहाणे
डौलाने – दिमाखात, तोऱ्यात
नभ – आकाश
झालर -शोभिवंत रंगीत चुणीदार कापडाची पट्टी
मित्र -सूर्य
संगे – सोबत, बरोबर
मंद -हळूवार, सूस्त
वारा -पवन,वायू
राशी – ढीग
शेला – पांघरण्याचे उंची वस्त्र
अभ्यास
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1. आकाशात कोण आलेला आहे ?
उत्तर – आकाशात सूर्य आलेला आहे.
2. त्याच्या महालाचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर – निळ्या महालाला सोनेरी खांब असून त्याच्या आत
मोत्यांच्या झालरी लावल्या आहेत.असे महालाचे वर्णन कवयित्रीने केले आहे
3.भूवरी काय घातले आहे ?
उत्तर – भूवरी केशराचे सडे घातले आहेत.
4.नभातून कोणत्या राशी ओतीत आहे?
उत्तर – आकाशातील सूर्य नभातुन सोन्याच्या राशी अतीत आहे.
5. सोबत कोणाबरोबर झाली आहे ?
उत्तर – सोबत पाखरांबरोबर झाली आहे.
6. साऱ्या जगाला कोण जागवितो ?
उत्तर – साऱ्या जगाला मंद वारा जागवितो.
7. उठा उठा असे कवयित्री का म्हणत आहे ?
उत्तर – कारण आकाशात सूर्य उगवला आहे म्हणून उठा उठा असे
कवयित्री म्हणत आहे.
आ. कवितेच्या आधारे ओळी पूर्ण कर.
1. निळ्या त्याच्या महालाला खांब सोनेरी.
2.केशराचे घातले सडे भूवरी.
3. गुलाबाची फुले उधळू लागतो.
4. फुलांशी गुदगुल्या करीत खेळतो.
5. वारा साऱ्या जगाला जागवितो.
इ. समानार्थी शब्द लिही.
1. आकाश – नभ
2. सूर्य – भास्कर , मित्र
3. मित्र – सवंगडी , दोस्त
4. पाखरे – पक्षी
उ. शब्द समुहात न जुळणारा शब्द ओळख व त्याच्या
भोवती गोल करा.
सूर्योदय – प्रकाश, सूर्यकिरण, पक्ष्यांची
किलबील, चंद्र
उत्तर – चंद्र
डोंगर – दरी, खोरे, नदी, पठारे
उत्तर – पठारे
नभ – आकाश, गगन, ढग, झाडे
उत्तर – झाडे
घर – आई,बाबा,फुलपांखरे,मुले
उत्तर – फुलपांखरे
ऊ. यमक जुळणारे शब्द लिहा.
जसे –
आला – शेला
झालरी – भरजरी
हळू – उधळू
राशी – फुलाशी
छान – गायन
ए. खालील शब्दांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
करा.
डोकावणे – वर्गात अभ्यास करणाऱ्या मुलांना शिक्षक डोकावून
पाहत होते.
संगे – मी माझ्या वडीलांसंगे यात्रेत फिरायला गेलो होतो.
राशी – पाटलांच्या घरी ज्वारीच्या राशी आहेत.
मंद – पहाटेचा मंद वारा खूप छान वाटत होता.
ऐ.खालील कवितेच्या ओळींचा अर्थ तुझ्या शब्दात
लिहा.
1. निळ्या त्याच्या महालाला खांब सोनेरी झालरी.
मोतीयाच्या
लावियेल्या आत झालरी.
2. नभातून सोनियाच्या ओतितो राशी
गुदगुल्या करीत तो खेळे फुलांशी.