15. तीन प्रश्न (15.Teen Prashna)

 15. तीन प्रश्न




लेखिका – डॉ. चित्रा नाईक

नवीन शब्दार्थ

अरेरावीउद्धटपणा

इभ्रतइज्जत

शिरच्छेद करणे डोके उडविणे

न्यायीयोग्य प्रकारे वागणारा

विवेकशील – विचार करणारा




अ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही

१. राजधानीमध्ये कोण आला होता ?

उत्तर – राजधानीमध्ये एक प्रवाशी आला होता.

 

२. प्रवाशाचा पहिला प्रश्न कोणता

उत्तर – या देशाचा मध्य बिंदू कोणता? हा प्रवास याचा पहिला प्रश्न होता.

 

३. प्रवाशाने दुसरा प्रश्न कोणता विचारला ?

उत्तर -. आकाशात किती चांदण्या आहेत? हा प्रवाशाने दुसरा प्रश्न विचारला.

 

४. प्रवाशाचा तिसरा कोणता?

उत्तर – देवाधीदेवांचे काम काय असते? हा प्रवाशाचा तिसरा प्रश्न होता.

 

५. उत्तर न देणाऱ्यास राजाने कोणती शिक्षा सुनावली?

उत्तर – उत्तर न देणाऱ्यास राजाने शिरच्छेद करण्याची शिक्षा सुनावली.

 

६. प्रधानाने मेंढपाळाला काय सांगितले ?

उत्तर – प्रधान आणि मेंढपाळाला सांगितले की,मला तीन प्रश्नांची उत्तरे येत नाही म्हणून उद्या मला राजा ठार मारेल.




७. प्रधानाने राजाकडे किती अवधी मागितला

उत्तर – प्रधानांनी राजाकडे एक दिवसाचा अवधी मागितला.

 

८. दरबारातील लोकांनी कोणती घोषणा दिली ?

उत्तर – नवीन महाराजांचा विजय असो अशी दरबारातील लोकांनी घोषणा केली.

 

९. राजाला कोणी धडा शिकविला?

उत्तर – मेंढपाळ आणि राजाला धडा शिकवला.

 

आ. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिही.

 

१. मेंढपाळाने पहिल्या प्रश्नाचे उत्तर काय दिले ?

उत्तर – या राज्याचा मध्यबिंदू कोणता? असा पहिला प्रश्न होता.याचे उत्तर देताना मेंढपाळ ज्या ठिकाणी उभा होता त्याच ठिकाणी त्याने हातातील काठी जमिनीवर आपटून तिथेच रोवली व तो म्हणाला राज्याचा मध्यबिंदू हाच आहे आणि जर हा मध्यबिंदू नसेल तर तो नाही हे तुम्हीच सिद्ध करा.असा प्रतिप्रश्नही मेंढपाळाने केला.

 

२. मेंढपाळाने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर कसे दिले ?

उत्तर – आकाशात किती चांदण्या आहेत? हा दुसरा प्रश्न होता याचे उत्तर देण्यासाठी मेंढपाळाने आपल्या खांद्यावर असलेले मेंढीचे कातडी जमिनीवर फेकले व मनाला त्या या मेंढ्यांच्या खाद्यात जितके केस आहेत तेवढेच बरोबर चांदण्याची संख्या आहे आपण ती मोजून पहावी.




३. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मेढपाळाने राजाला काय करण्यास सांगितले?

उत्तर – देवाधीदेवांचे काम काय असते हा तिसरा प्रश्न होता या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मेंढपाळाने राजाला सांगितले की,मला राजवस्त्र गाना द्या. राजमुकुट द्या.आपल्या सिंहासनावर बसू द्या.

 

४. राजवस्त्रे धारण केल्यानंतर मेंढपाळाने सैनिकांना कोणती आज्ञा दिली?

उत्तर – राजवस्त्रे व मुकुट धारण करून मेंढपाळ आसनावर बसला व सैनिकांना आज्ञा दिली,’पकडा या दुष्ट राजाला सुळावर चढवा याला

 

५. मेंढपाळाने देवाधिदेवांचे काम कसे दाखवून दिले?

उत्तर – देवाधीदेवांचे काम असते नाही देण्यास निरपराध जीवांचे रक्षण करावयाचे आणि विवेकाने अधिकार वापरण्याचे.पण या राजामुळे अनेक निरपराध जीव बळी गेले होते.म्हणून मेंढपाळांने तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे कारण सांगून राजमुकुट धारण केला आणि सिंहासनावर बसला. आणि सिंहासनावर बसता क्षणी त्याने सैनिकांना आज्ञा दिली,’पकडा या दुष्ट राजाला पकडून सुळावर चढवा.अशा प्रकारे काम करून दाखवले.

 

इ. कोणी कोणास म्हटले ?

1.‘‘महाराज, कोणते ते तीन प्रश्न ? त्याची उत्तरे मला नक्की सापडतील”

उत्तर – हे वाक्य मेंढपाळाने प्रधनाला विचारले.

 

२. ‘‘राज्याचा मध्यबिंदू हाच तो, नाही हे तुम्हीच सिद्ध करा.”

उत्तर – हे वाक्य मेंढपाळाने राजाला उद्देशून म्हटले आहे.

 

३. “ठीक आहे, याला आत नेऊन राजवस्त्रे घालून आण.”

उत्तर – हे वाक्य राजाने आपल्या सैनिकांना उद्देशून म्हटले आहे.-

 

४. “जशी आज्ञा महाराज, प्रश्नांची उत्तरे मी समाधी लावन मिळवीन. मला एक दिवसाचा अवधी द्या.”

उत्तर – हे वाक्य राजाने प्रधानाला उद्देशून म्हटले आहे.

 

उ. खालील शब्दांचा तुझ्या वाक्यात उपयोग कर.

1. अरेरावी –  रस्त्यावर काही मुले माझ्या मित्रावर अरेरावी करीत होते.

2. निर्भिड -गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात निर्भीडपणे चळवळ
केली.

3. न्यायबुद्धी- छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायबुद्धी अलौकिक होती.

4. विधी आमच्या घरात यात्रे निमित्त विशेष विधी करण्यात आला.



Share with your best friend :)