16. क्षणात जिंकीन
कवी – नारायण सुर्वे
कवी परिचय –
पूर्ण नाव – नारायण गंगाराम सुर्वे
नारायण सुर्वे – ( १९२६ – २०१०) कामगार आणि दलित यांची सुख दुःखे चित्रित करणारे नामवंत कवी. ‘ऐसा गा मी ब्रह्म‘, ‘माझे विद्यापीठ‘, ‘जाहीरनामा‘ आणि ‘सनद‘ हे त्यांचे काव्यसंग्रह.साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
नवीन शब्दार्थ
भूपाळी – भूप रागातील सकाळी म्हणावयाचे गीत
मायदेश – स्वतःचा देश
मालकंस -संगीतातील एक राग
मेघ -ढग
माथे — डोकं, मस्तक
पैजा -स्पर्धा, प्रतिज्ञा
तीट – सुंदर वस्तूला लावलेला काजळाचा ठिपका
नमविणे – पराभव करणे, झुकविणे नमविणे
अ. खालील प्रश्नांची उत्तर लिही.
१. मायदेशी फुगड्या घालत कोण आले आहे?
उत्तर – फुले,तारका मायदेशी फुगड्या घालत आल्या आहेत.
२. मेघाने कसे यावे?
उत्तर – मेघांनी डुलत डुलत यावे.
३. लवत फुलत कोणी यावे?
उत्तर – लवत फुलत विजेने यावे.
४. हळद कोणी लावलेली आहे?
उत्तर – नगरांनी हळद लावलेली आहे.
५. भूपाळीत कोणता राग आळविण्यास कवीने सांगितले आहे?
उत्तर – भूपाळीत मालकंस राग आळविण्यास कवीने सांगितले आहे.
६. माथे कोठे नमवावे असे कवी म्हणतो?
उत्तर – माथे मातृभूमीपुढे नमवावे असे कवी म्हणतो.
७. कवी कोणाची दृष्ट काढण्यास सांगत आहे?
उत्तर – कवी ज्ञानदेवांची दृष्ट काढण्यास सांगत आहे.
आ. तीन ते चार वाक्यात उत्तरे लिही.
१. माझा मराठाचि बोलु कवतिके ।
परि अमृतातेही पैजेसी जिंके
या पदचरणांचा अर्थ तुझ्या शब्दात लिही.
वरील ओळीत संत ज्ञानेश्वर मराठीचे कौतुक करत आहेत.ज्ञानेश्वर म्हणतात की माझ्या मराठी भाषेतील शब्दांची अमृताशी जरी पैज लावली
तरी माझे मराठीचे शब्द ती पैज जिंकतील.कारण अमृतापेक्षा माझी मराठी भाषा गोड आणि मधुर आहे.
इ. जोड्या जुळवा :
१. फुगडया घालाव्या – उ) फुलातारकांनी
२. मेघांनी यावे – अ) डुलत डुलत
३. विजेने यावे – आ) लावून हळद
४. पिवळी शेते – ई) लवत फुलत
५. भूपाळीत ओवा – इ) मालकंस राग
ई. अर्थ सांगून वाक्यात
उपयोग कर.
१) माथा टेकणे – नमस्कार करणे सुरेशने आपल्या शिक्षकांसमोर माथा टेकला.
२) तीट लावणे – सुंदर वस्तूला लावलेला काजळाचा ठिपका मी बाहेर जाताना माझी आई मला तीट लावते.
३) पैज लावणे – स्पर्धा लावणे,शर्यत लावणे सशाने कासवाशी पैज लावली.
उ. विरुध्द अर्थी शब्द लिही.
१. मायदेश x परदेश
२. अमृत x विष
३. प्राचीन x अर्वाचीन
४. फुलणे X सुकणे,कोमेजणे
५. जिंकणे x हरणे