इयत्ता – आठवी
17. तीन मुद्दे
लेखक – आचार्य विनोबा भावे
लेखक परिचय :
पूर्ण नाव – विनायक नरहर भावे (1895 1982)
सुप्रसिद्ध विचारवंत, तत्त्वज्ञ व भाष्यकार, स्वातंत्र्य सेनानी, गांधीवादी विचार सरणीचे विचारवंत व भूदान चळवळीचे प्रणेते.
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.
‘मधुकर‘, ‘जीवन दृष्टी‘, ‘गीता प्रवचने‘, ‘लोक नीती‘, इत्यादी विचारप्रवर्तक पुस्तके त्यानी लिहिली. ‘आचार्यकुल‘ स्थापन करून शिक्षणविषयक नवे विचार मांडले.
’तीन मुद्दे’ हा वैचारिक लेख ‘मधुकर‘ या पुस्तकातून घेतला आहे.
(मूल्य- श्रमप्रतिष्ठा)
शब्दार्थ आणि टीपा :
कूच करणे -जाणे, निघणे, वाटचाल करणे.
रसोई – स्वयंपाक
नेटकेपणा – सुंदरपणा
खुलणे – उठावदार होणे
दशा -अवस्था, परिस्थिती
धोरण – अंदाज
दाखला -उदाहरण
जाणून- माहिती घेऊन, ओळखून
दुधात साखर पडणे- अधिक चांगले होणे.
स्वाध्याय
प्र 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) विनोबा भावे यांनी कोणती चळवळ सुरू केली?
उत्तर – विनोबा भावे यांनी ‘ भूदान चळवळ‘ सुरू केली.
2) विनोबानी कशाची स्थापना करून शिक्षण विषयक नवीन विचार मांडले?
उत्तर – विनोबानी ‘आचार्यकुल‘ची स्थापना करून शिक्षण विषयक नवीन विचार मांडले.
3) कामाची तीन स्वतंत्र अंगे कोणती?
उत्तर – कामाची तीन स्वतंत्र अंगे सर्वप्रथम काम जाणून घेणे,कामात नेटकेपणा असावा,कामात वेग असावा.
4.कामाच्या बाबतीत कोणता नियम असतो?
उत्तर – कोणतेही काम वेळेच्या आत पूर्ण करणे हा कामाच्या बाबतीत नियम असतो.
5) सफाई आणि नेटकेपणा याबाबतीत विनोबाजीनी कोणता दाखला दिला आहे?
उत्तर – सफाई आणि नेटकेपणा याबाबतीत विनोबाजीनी लष्करी शिस्तीचा दाखला दिला आहे.
6) कामाचा गाभा असे विनोबाजी कशाला म्हणतात?
उत्तर – कामातील सुंदरतेला कामाचा गाभा असे विनोबाजी म्हणतात.
प्र 2. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन-तीन वाक्यात लिहा.
1) रसोई बनवणे केव्हा निरुपयोगी म्हणता येईल ?
उत्तर – रसोई करणारा मनुष्य रसोई चांगली करतो.पण पाच माणसांची रसोई बनवायला.त्याला पाच तास लागतात तर त्याचे रसोई बनवणे निरुपयोगी म्हणता येईल.
2) लष्करी शिस्त आणि व्यवहार यांचा मेळ विनोबाजींनी कसा मांडला आहे ?
उत्तर -अमुक वेळेच्या आत अमुक मंसाची आहे असा मदत बंदीचा लष्कर प्रश्न लष्कराकडे असतो जी गोष्ट लष्कराचे असते तीच गोष्ट व्यवहारातल्या सर्व उद्योगांना लागू आहे कोणतेही काम वेळेत पूर्ण झाले नाही तर उपयोगी नाही.
3) लिहिणे केव्हा आले म्हणायचे असे विनोबा म्हणतात?
उत्तर – जलद धावत्या हाताने लिहिता आले पाहिजे.वाटोळे,सरळ,मोकळे,सुंदर तसेच शुद्धलेखनाच्या नियमावर शुद्ध लिहिता आले पाहिजे.तसे झाले तर लिहिणे आले म्हणायचे असे विनोबाजी म्हणतात.
4) सुंदरता ही कामाची शोभा नसून तो कामाचा गाभा आहे असे का म्हटले आहे ?
उत्तर – सुंदरता किंवा नेटकेपणा हा गुण कामात आल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलेल.ज्या कामात नेटकेपणा नाही.ते काम निरर्थक आहे.म्हणून सुंदरता ही शोभा नसून तो कामाचा गाभा असे म्हटले आहे.
प्र 3. खालील प्रश्नांची प्रत्येकी चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.
1) वेग साधणे हा कामाचा एक आवश्यक मुद्दा ठस्तो हे पटवून देताना विनोबांनी उदाहरणे दिली आहेत ?
उत्तर -अमुक मैल कूच करून जायचे आहे.एवढाच प्रश्न लष्कराकडे नसतो.तर अमुक वेळेच्या आत त्याठिकाणी पोहोचणे.असा प्रश्नही लष्करापुढे असतो.जी गोष्ट लष्कराची तीच गोष्ट कमी जास्त प्रमाणात व्यवहारातल्या सर्व उद्योगांना लागू आहे.रसोई करणारा माणूस पाच माणसांचे जेवण करायला पाच तास लावत असेल तर त्याची रसोई बनवणे निरुपयोगी आहे.काळाच्या प्रवाहात मनुष्य सापडलेला आहे.त्याला सर्व कामे या प्रवाहाचे धोरण सांभाळून करायचे असतात म्हणून वेग साधणे हा कामाचा एक आवश्यक मुद्दा ठरतो ही उदाहरणे विनोबाजींनी दिली आहेत.
2) काम करत असताना ज्ञानाचे महत्त्व काय ?
उत्तर – कोणतेही काम करताना त्या कामाची पूर्ण माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.तेथे लष्कराची उदाहरणे दिली आहेत.बरोबर नकाशे आखून रस्त्यावरील वळणे कोठे कोठे कसकशी सापडायची हे ठरवून त्याप्रमाणे कूच करावे लागते.तसेच आपल्याला करत असलेल्या कामाची पूर्ण माहिती घेऊन त्या कामाला सुरुवात
केली तर चांगले यश मिळते.
3) लेखकाने नेटकेपणाचे महत्त्व कसे सांगितले आहे ?
उत्तर – कामातील नेटकेपणाचे महत्व सांगताना अर्थात विनोबांनी लष्कराचे उदाहरण दिले आहे.कामात सुंदरता नेटकेपणा व शिस्त महत्त्वाची आहे.सुंदरता व नेटकेपणा हागून कामात आल्याने दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम सुद्धा होईल नाहीतर त्या कामाला अर्थ उरणार नाही कामात नेटकेपणाची अत्यंत गरज
आहे.
प्रश्न 2 रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1.मुदत बंदीचा प्रश्न लष्करापुढे असतो.
2.सर्व कामे या प्रवाहाचे धोरण सांभाळून करायची असतात.
3.विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे हे होय.
4.शुद्धलेखनाच्या नियमावर शुद्ध लिहिता आले पाहिजे.
5.कामात सुंदरता किंवा नेटकेपणा हा गुण आल्याने सून दुधात साखर टाकल्याप्रमाणे काम खुलेल.
प्र. 5 खालील प्रश्नाचे उत्तर 7-8 वाक्यात लिहा.
1.सर्व कामांसाठी लागणाऱ्या तीन तत्वांचे वर्णन करा.
उत्तर – कामात वेग बाईचे नेटकेपणा पाहिजे आणि तिसरी गोष्ट ज्ञान पाहिजे.लष्कराने ठरलेल्या वेगात अगदी पद्धतशीर कूच केले आणि ते ठरलेल्या वेळेत पोहोचली सुद्धा पण ठरलेल्या जागी मात्र पोहोचले नाही.जाणून काम केले नाही म्हणजे अशी दशा होते.बरोबर नकाशे आखून रस्त्यातील वळणे कोठे कोठे कसकशी सापडावयाची हे ठरवून त्याप्रमाणे कूच केले पाहिजे.
कोणत्याही कामाची तीन अंगे आहेत काम जाणून केले पाहिजे,नेटके केले पाहिजे,वेगाने केले पाहिजे हे तिन्ही गुण साधणे म्हणजे काम साधले. उदाहरणार्थ -लिहिणे केव्हा आले म्हणायचे?जलद, धावत्या हाताने लिहिता आले पाहिजे.‘वाटोळे,सरळ,मोकळे‘ असे सुंदर लिहिता आले पाहिजे.हे सर्व कामांसाठी लागणाऱ्या तीन तत्वांचे वर्णन होय.
भाषाभ्यास :
1. पुढील संधी सोडवा.
1) निरुपयोगी – नि: + उपयोगी
2) निरर्थक – नि: + अर्थक
2. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) कूच करणे – जाणे,निघणे
भारतीय सैनिकांनी शत्रु सैन्याविरुद्ध कूच केले.
2) दुधात साखर पडणे – अधिक चांगले होण
मला चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळाल्याने दुधात साखर पडल्यासारखे वाटले.
3) धोरण सांभाळणे – अंदाज करणे
लष्कराला धोरण सांभाळून कूच करावे लागते.