14. KARNATAKATIL KANHI SHILPASUNDAR STHALE (14. कर्नाटकातील काही शिल्पसुंदर स्थळे)




इयत्ता – आठवी 

विषय  – मराठी 

14. कर्नाटकातील काही शिल्पसुंदर स्थळे

प्रा. कृ. ब. निकुम्ब

लेखक परिचय –                                                                                                           

प्रा. कृष्णाजी बलवंत
निकुम्ब
(1920-1999) हे बेळगाव येथील
लिंगराज कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते. मूळचे नाशिकचे. शालेय व कॉलेज शिक्षण
नाशिक येथे झाले. त्यांचा उज्ज्वला
हा पहिला कवितासंग्रह 1945 साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या प्रतिमेला शांततेचे
वातावरण
, सृष्टीचे रम्य, उदास, शांत असे स्वरूप मानवते. ‘उर्मिला’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह, आधुनिक काव्यरचनेचे भावगीत,सुनीत, कणिका, मुक्तछंद, गझल, ओवी वगैरे काव्यप्रकार त्यांच्या या संग्रहात आढळून येतात.

प्रसिद्ध काव्यसंग्रह  उज्ज्वला’, ‘उर्मिला’, ‘अनुबंध’, ‘अभ्र’, ‘पंखपल्लवी‘, ‘सायसाखरहे त्यांचे आहेत.

 


शब्दार्थ आणि टीपा :

डौलदार -दिमाखदार,ऐटदार

शिल्पकला – दगडावरील कोरीव काम

ऐश्वर्य -सुबत्ता,संपन्नता, श्रीमंती

सुरेख – सुंदर

लुब्ध होणे – मोहित होणे

शिल्पसौंदर्य -दगडातील कोरीव सौंदर्य

मनोरे -शिखराकडे निमुळता होत जाणारा व आतून उंच खांब, फळ असा मिनार

रेलचेल- मुबलक, भरपूर

सुवर्णाक्षर – सोन्याची अक्षरे

सुबक – छोटे पण देखणे

जाणती मंडळी – ज्ञानी माणसे, जाणकार लोक

दालन -कक्ष विभाग

क्षितिज – आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते ती जागा,आकाश व

जमीन यांची सीमारेषा

पडसाद – प्रतिध्वनी, एकाच आवाजाचे अनेक आवाज उमटणे.

सज्जा-इमारतीच्या बाहेरच्या बाजूला काढलेला कठडा

आराखडा -नकाशा,रूपरेषा

नमाज -मुस्लिमांची प्रार्थना

कलाकुसर-नाजुक नक्षीचे काम

कोडे -रहस्य,गुप्त गोष्ट

गौरव -बहुमान, मानसन्मान

अव्वल – उत्तम,प्रथम दर्जाचे

चिरनिद्रा-कायमची झोप

वाटोळे -गोलाकार,चेंडूसारखे

साद -हाक,बोलविणे,आवाज

विसावा-आराम,विश्रांती

अचूक जसेच्या तसे, मिळते जुळते

 


प्र 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) गुलाब म्हणताच कोणत्या रंगाचे फूल डोळ्यासमारे उभे रहाते?

उत्तर – गुलाब म्हणताच गुलाबी रंगाचे फूल डोळ्यासमारे उभे रहाते.

2) उत्तरेतून दक्षिणेत जाताना कर्नाटकात प्रथम कोणत्या जिल्ह्यात उतरतो?

उत्तर – उत्तरेतून दक्षिणेत जाताना कर्नाटकात प्रथम विजयापुरा जिल्ह्यात उतरतो.

3) विजयापूराची जुम्मामशीद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली?

उत्तर – विजयापूराची जुम्मा मशीद पहिल्या अली आदिलशाहीच्या कारकिर्दीत बांधली गेली.

4) इब्राहीम रोजा ही इमारत कशाने नटली आहे?

उत्तर – इब्राहीम रोजा ही इमारत ठायी ठायी कोरीव कामाने नटली आहे.




5) महंमद आदिलशहाने गोलघुमट कशासाठी बांधविला ?

उत्तर – महंमद आदिलशहाने गोलघुमट स्वतःच्या चिरनिद्रेसाठी बांधविला.

6) गोलघुमट कशासाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर – गोलघुमट प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे

7) मेहेतर महल म्हणजे काय ?

उत्तर – मेहेतर महल म्हणजे लहानशा मशिदीच्या भोवती असणाऱ्या बागेचे एक शोभिवंत प्रवेशद्वार होय.

प्र2. खालील प्रश्नांची उत्तरे
प्रत्येकी दोन ते तीन ओळीत लिहा.

1) तऱ्हेतऱ्हेचे गुलाब मानवाच्या बागेत कसे डोलू लागले?

उत्तर – गुलाब म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गुलाबी रंगाचे फूल उभे राहते. ते सुरेख असते, सुवासिक असते. चांगले डौलदारही . मात्र गुलाब
म्हटल्याबरोबर आपल्याला अगोदर काही जाणवत असेल
, तर त्याचा तो मोहक गुलाबी रंग! पण माणसाचे केवळ एकाच गुलाबी रंगावर समाधान झाले आहे काय? त्याने कलमे केली.नाना प्रकारचे प्रयोग केले आणि मग तऱ्हेतऱ्हेचे गुलाब त्याच्या बागेत डोलू लागले.

2) सौंदर्य निर्माण करणाऱ्या कला कोणत्या आहेत ?

उत्तर – चित्रकला, संगीतकला, शिल्पकला या सौंदर्य निर्माण करणाऱ्या कला आहेत.

3) विजापूरात कोणत्या गोष्टीची रेलचेल करून ठेवली आहे?

उत्तर – विजयापुरात तट आणि बुरूज, राजवाडे आणि महाल, मशिदी आणि मनोरे, थडगी, तळी, किल्ले यांची केवळ रेलचेल करून ठेविली आहे.




4) इब्राहीम रोजा बद्दल जाणती मंडळी काय म्हणतात ?

उत्तर – इब्राहीम रोजबद्दल जाणती मंडळी म्हणतात की, आग्राचा प्रसिद्ध ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांनी ताजचा आराखडा तयार करताना, इतर इमारतीबरोबर इब्राहीम रोजाही नक्कीच विचारात घेतला असावा! या इमारतीच्या कलात्मक सौंदर्याचा हा मोठाच गौरव होय.

5) गोलघुमटात कोणता चमत्कार घडतो ?

उत्तर – गोलघुमट ज्या प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे तो चमत्कार येथेच घडतो. तेथे शब्द उच्चारायचा अवकाश लागोपाठ त्याचे पडसाद उमटू लागतात.या सज्जातल्या भिंतीकडे तोंड करून पुसट आवाजात बोलावे.बरोबर समोर सज्जात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते तंतोतंत ऐकू येते. मधले अंतर आहे एकशे चोवीस फुटांचे!

प्र 3. खालील प्रश्नांची उत्तरे
प्रत्येकी पाच ते सहा ओळीत लिहा.

1) गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वर्णन करा.

उत्तर – गुलाब म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गुलाबी रंगाचे फूल उभे राहते. ते सुरेख असते, सुवासिक असते. चांगले डौलदारही. पण माणसाचे केवळ एकाच गुलाबी रंगावर समाधान झाले आहे काय? छे! त्याने कलमे केली.नाना प्रकारचे प्रयोग केले आणि मग तऱ्हेतऱ्हेचे गुलाब
त्याच्या बागेत डोलू लागले.
मानवाने नाना प्रकारचे प्रयोग केले आणि मग तऱ्हेतऱ्हेचे गुलाब त्याच्या बागेत डोलू लागले. पांढरा गुलाब, पिवळा गुलाब, मोतिया रंगापासून तो लालबुंद रंगापर्यंतच्या आणि फिक्या पिवळ्यापासून तो धुंद केसरीपर्यंतच्या शेकडो छटांचे गुलाब माणसाने तयार केले. फुलांच्या एखाद्या प्रदर्शनात तर तपकिरी, गडद जांभळ्या रंगांचे गुलाबही आढळतात आणि सहज पाहाण्यात येत नसला तरी हिरवा गुलाबही असतो! पुनः या गुलाबांच्या आकारांचे तरी किती प्रकार सांगावे! याचा अर्थ असा की, सौंदर्य माणसाला आवडते खरे, पण तेच सौंदर्य तन्हांत-हांनी वेगवेगळेपणाने अनुभवण्यात त्याला विशेष आनंद होतो. सौंदर्याच्या विविधतेतला आनंद वेगळाच!




2) जुम्मा मशिदीबद्दल माहिती लिहा.

उत्तर- पहिल्या अली आदिलशहाच्या कारकीर्दीत जुम्मा मशीद बांधली गेली. ती अतिशय प्रचंड आहे. इतकी की, साडेचारशे फूट लांब आणि सव्वादोनशे फूट रूंद. अशा या इमारतीत एकाच वेळी मोजून अडीच हजार माणसांना नमाज पढता येतो. तिच्या भिंतीवर सुवर्णाक्षरांनी कुराण
लिहिलेले आहे. तिचा घुमट
, तिच्यातली मोजकीच कलाकुसर या साऱ्यांचा असा एक तोल साधला गेला आहे की, ती प्रचंड असूनही अस्ताव्यस्त वाटू नये !

3) गोलघुमटाच्या भव्यतेची माहिती लिहा.

उत्तर –  महंमद आदिलशहाने गोलघुमट ही इमारत स्वतःच्या चिरनिद्रेसाठी बांधविली.ती अतिशय विस्तृत आणि ठसठशीत आहे,या चौकोनी इमारतीची प्रत्येक बाजू दोनशे पाच फूट आहे. तिच्या चारही कोनांना सातमजली, अष्टकोनी मनोरे इमारतीला अगदी चिकटून बांधलेले आहेत. इमारतीची उंची तिचा भव्य घुमट आणि तिची प्रमाणबद्धता दुरूनही नजरेत भरते. खाली एकच एक चौकोनी दालन आहे.
बाजूच्या मनोऱ्यातून वर-खाली जा-ये करण्यासाठी वाटोळे जिने आहेत. गोलघुमट प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. तेथे शब्द उच्चारायचा अवकाश लागोपाठ त्याचे पडसाद उमटू लागतात. या सज्जातल्या भिंतीकडे तोंड करून पुसट आवाजात बोलावे. बरोबर समोर सज्जात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते तंतोतंत ऐकू येते. हे मधले अंतर एकशे चोवीस फुटांचे आहे. खालच्या भव्य पोकळीत पहावे तर दृष्टी फिरते वरच्या भव्य घुमटाकडे पाहावे तर घाबरल्यासारखे होते. हा प्रतिध्वनींचा चमत्कार आहेच शिवाय साधेपणा
, ठसठशीतपणा, भव्यपणा यांच्या कमालीच्या सुसंगतीमुळे तो शिल्परचनेतलाही एक चमत्कारच होऊन बसला आहे.

 


प्र4. रिकाम्या जागी योग्य
शब्द लिहा.

1) विजयापुरा शहर हे मुस्लीम शिल्पशैलीचे केंद्र आहे.

2) जुम्मामशिदीत एकाच वेळी अडीच हजार माणसांना नमाज पडता येतो.

3) टुमदारपणा आणि बारकाईची कलाकारगिरी ही इब्राहीम रोजाची आकर्षण होत.

4) फुलांच्या एखाद्या प्रदर्शनात तर तपकिरी गडद जांभळ्या रंगाचे गुलाबही आढळतात.

 

प्र5. संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1) आदिलशाही राजाची विजयापुरा ही राजधानी.

2) मधले अंतर आहे एकशे चोविस फूट.

प्र6. जोड्या जुळवा.

उत्तर –                                               

1) इब्राहिम रोजा          क) ठायीठायी कोरीवकाम

2) गोलघुमट                अ) प्रतिध्वनी चमत्कार

3) मेहेतर महल            ई) शोभिवंत प्रवेशद्वार

4) जुम्मा मशिद           ब) अली आदिलशहा

5) विजयापुरा               इ) आदिलशहाची राजधानी

प्र7. खालील प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.

इब्राहिम रोजा, गोलघुमट या इमारतींचे सविस्तर वर्णन करा.

इब्राहिम रोजा

इब्राहीम रोजा ही इमारत अशी ठायी ठायी कोरीव कामाने नटलेली आहे. असे म्हणतात की,दुसऱ्या कोणत्याही आदिलशाही इमारतीत इतकी कलाकुसर नाही. तिच्या रचनेतला आणखी एक चमत्कार सांगण्यासारखा आहे. अनेक चौकोनी फरशीसारख्या दगडानी तिचे सपाट छत घडविलेले आहे. पण त्या चौकोनी दगडांना कोणताही आधार दिलेला दिसत नाही! शिल्पकलेतल्या जाणत्या मंडळीना कोडे अजूनही सुटलेले नाही! हीच जाणती |मंडळी असेही म्हणतात की, आग्राचा प्रसिद्ध ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांनी ताजचा आराखडा तयार करताना, इतर इमारतीबरोबर इब्राहीम रोजाही नक्कीच विचारात घेतला असावा! या इमारतीच्या कलात्मक सौंदर्याचा हा मोठाच गौरव होय.




गोलघुमट- 

AVvXsEgWA8iODv5d4Ixa5brXU0rxAe6dl9 tUw7UtjkEmYjdO iKMmP9Lh1wrBvDj6o5XxRvTLvzqXlFkCkqKQHgMeDOFYK08Fh8eKT5FvjI61PDIV8JRHKIl h6 aqJp8r53Lq6PeU3waq12wisourSGg8IzPu0P7Pb Ni eKQlZXf0RB0Eozur WdeRYfGuw=s320

महंमद आदिलशहाने गोलघुमट ही इमारत स्वतःच्या चिरनिद्रेसाठी बांधविली.ती अतिशय विस्तृत आणि ठसठशीत आहे,या चौकोनी इमारतीची प्रत्येक बाजू दोनशे पाच फूट आहे. तिच्या चारही कोनांना सातमजली, अष्टकोनी मनोरे इमारतीला अगदी चिकटून बांधलेले आहेत. इमारतीची उंची तिचा भव्य घुमट आणि तिची प्रमाणबद्धता दुरूनही नजरेत भरते. खाली एकच एक चौकोनी दालन आहे. बाजूच्या मनोऱ्यातून वर-खाली जा-ये करण्यासाठी वाटोळे जिने आहेत.

गोलघुमट ज्या प्रतिध्वनीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे तो चमत्कार येथेच घडतो. तेथे शब्द उच्चारायचा अवकाश लागोपाठ त्याचे पडसाद उमटू लागतात. या सज्जातल्या भिंतीकडे तोंड करून पुसट आवाजात बोलावे. बरोबर समोर सज्जात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते तंतोतंत ऐकू येते. मधले अंतर आहे एकशे चोवीस फुटांचे!

खालच्या भव्य पोकळीत पाहावे तर दृष्टी फिरते. वरच्या तितक्याच भव्य घुमटाकडे पाहावे तर घाबरल्यासारखे होते. आजूबाजूला साद-पडसादांचा समुद्र उसळलेला असतो आणि आपण आश्चर्याने केवळ स्तब्ध होऊन गेलेलो असतो. गोलघुमट हा प्रतिध्वनीचा चमत्कार तर
खराच. पण साधेपणा
, ठसठशीतपणा, भव्यपणा यांच्या कमालीच्या सुसंगतीमुळे तो शिल्परचनेतलाही एक चमत्कारच होऊन बसला आहे. गोलघुमट विजयापूराच्या एका टोकाला तर इब्राहीम रोजा बरोबर त्याच्या उलट टोकाला. रचनेतही या इमारती अशाच एकमेकीच्या अगदी विरुद्ध आहेत. भव्यता आणि साधेपण हे गोलघुमटाचे विशेष, तर टुमदारपण आणि बारकाईची कलाकारागिरी ही इब्राहीम रोजाची आकर्षणे होत.

 




*आठवी विज्ञान प्रश्नोत्तरे*

*घटक 7.बल आणि दाब (Force And Pressure)*
*घटक 5.दगडी कोळसा आणि पेट्रोलियम*
*घटक 4.द्रव्य : धातू आणि अधातू*
*घटक 3. कृत्रिम तंतू व प्लॅस्टिक*
* घटक 2. सूक्ष्मजीव मित्र आणि शत्रू*
*️घटक 1.पिकांचे उत्पादन व व्यवस्थापन*
Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now