इयत्ता – आठवी
विषय – मराठी
18.माय
कवी-वामन सुदामा निंबाळकर
मुल्य – मातृप्रेम
शब्दार्थ –
चून – झुणका,
भारा – मोळी,
कृश – बारीक,
वैद् – वैद्य
स्वाध्याय
प्र 1. खालील प्रश्नांची
प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.काळोखाचे राज्य
केव्हा येते?
उत्तर – काळोखाचे राज्य जसा दिवस
बुडून जाई तेव्हा येते.
2.चुलीला जाळ
केव्हा लागे?
उत्तर – घरोघरी दिवे लागतात तेव्हा
चुलीला जाळ लागतो.
3.डोळ्यात आसवांच्या
धारा का लागतात?
उत्तर – जेंव्हा नाकात वास जाई
तेंव्हा पोटात भडभडून येऊन डोळ्यात आसवांच्या धारा येऊ लागत.
4.मायचा मृत्यू
कसा झाला?
उत्तर – मायला एका काळ या मोठ्या
सापाने फणा काढून चावला माय धरणीवर पडली तिला वाचवण्यासाठी मंतरलेले दोरे,मंत्र,वैद्य उपचार
झाले.असेच दिवस निघत गेले आणि शेवटी मायचा मृत्यू झाला.
5.माय सकाळपासून वणवण
का करत आहे?
उत्तर – माय सकाळपासून मोळीसाठी
रानात वणवण करत आहे.
6.दोन बाया काय
सांगत आल्या?
उत्तर – दोन बाया मायला मोठा काळा
साप चावला असे सांगत आल्या.
7.मोळीवाली दिसताच
कवी काय करतो?
उत्तर – मोळीवाली दिसताच कवी तिची
मोळी विकत घेतो.
प्र 2. रिकाम्या जागा भरा.
1.मायला साप
चावला.
2.घरोघरी भाकरी
बनविल्या जात.
3.चिल्लेपिल्ले
वाऱ्यावर सोडून निघून गेली.
4.आईच्या
पायातून रक्त वाहत होते.
5.झोपडीत साधा
दिवा असे.
प्र 3. खालील प्रश्नांची उत्तरे तीन-चार
वाक्यात लिहा.
1.आईची वाट पाहत
मुले दरवाजात का बसत?
उत्तर – कारण आई सकाळीच मोळीसाठी
रानात जाई व ती विकून मुलांसाठी खाऊ आणत असे म्हणून मुले आईची वाट पाहत दरवाजात
बसत.
2.मायला साप
चावल्याचे कसे कळले?
उत्तर – एके दिवशी माय भळाभळा रक्त
वाहत असलेला पाय बांधून घरी आली.तेव्हा तिच्या सोबत गेलेल्या दोन बायांनी मायला
मोठा काळा साप चावला असे सांगितले.तेव्हा मायला साप चावल्याचे मुलांना कळले.
3.मायवर कोणते
उपचार केले गेले?
उत्तर – मायला काळा साप चावला होता
म्हणून तिला वाचवण्यासाठी तिच्यावर मंत्र,वैद्य,मंतरलेले दोरे यासारखे
उपचार झाले.
प्र 4. संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1.‘मोळी नसे विकत
तेव्हा भुकेलेले झोपी जाऊ’
संदर्भ- वरील ओळ ‘माय‘ या कवितेतील असून या कवितेचे कवी वामन सुदामा निंबाळकर हे आहेत.
स्पष्टीकरण – मोळी विकून येणाऱ्या आईच्या
वाटेकडे भुकेलेल्या पोरांची नजर लागलेली असे कारण मोळी विकली गेली तर त्यांना जेवण
मिळत असे नाही तर भुकेल्या पोटी झोपी जावे लागत असे हे सांगताना कवीने वरील ओळ म्हटली
आहे.
2.’दिवस निघता
निघता तिच्या देहातून प्राण गेला‘
संदर्भ- वरील ओळ ‘माय‘ या कवितेतील
असून या कवितेचे कवी वामन सुदामा निंबाळकर हे आहेत.
स्पष्टीकरण – मायला साप चावला त्यामुळे
तिच्यावर मंत्रे,मंतरलेले
दोरे,वैद्य हे सारे उपचार झाले.पण त्या उपचारात दिवस निघून
गेले व एक दिवस तिच्या देहातून प्राण गेला.असे असे वर्णन कवीने वरील ओळीतून केले
आहे.
3.’दिसता कृश
मोळीवाली मोळी तिची विकत घेतो‘
संदर्भ- वरील ओळ ‘माय‘ या कवितेतील असून या कवितेचे कवी वामन सुदामा निंबाळकर हे आहेत.
स्पष्टीकरण – कवीची माय दिसायला बारीक व
कृश होती.साप चावल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर कविला बारीक कृश अशी जेव्हा
मोळीवाली दिसली की तिची मोळी विकत घेतो व तिला मदत करतो.असे कवीला वरील ओळीतून
सांगायचे आहे.
प्र 5. खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते
सहा वाक्यात लिहा.
1.या कवितेत
गरिबीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर – कवी वामन सुदामा निंबाळकर
लिखित ‘माय’ या कवितेमध्ये माय आणि तिच्या मुलांच्या गरिबीचे वर्णन केले आहे.माय मोळीसाठी
रानात जाते.जेव्हा मोळी विकत नसे तेव्हा तिची भुकेलेली मुलं पाणी पिऊन उपाशी झोपत
असत.एकदा तिच्या आईला साप चावतो व तिचा प्राण जातो अशी या गरिबीच्या वर्णन केले
आहे.
प्र 6. खालील प्रश्नांची उत्तरे 7–8 वाक्यात लिहा.
2.या कवितेचा सारांश लिहा.
उत्तर – या कवितेत माय व तिच्या मुलांच्या गरिबीचे वर्णन केले आहे.जसा
दिवस बुडून जातो,तेव्हा काळोखाचे राज्य येते.जेव्हा घरोघरी जाळ लागे,तेव्हा घरात
दिवे लागत.माय मोळीसाठी रानात वणवण करत असते. मोळी विकून येणाऱ्या आईच्या वाटेकडे
भुकेलेल्या पोरांची नजर लागलेली असे कारण मोळी विकली गेली तर त्यांना जेवण मिळत
असे नाही तर भुकेल्या पोटी झोपी जावे लागत असे. एके दिवशी त्यांच्या आईला काळा
मोठा साप चावल्याचे दोन बाया सांगत येतात.तिच्या पायातून भळाभळा रक्त वाहत असते.तिच्यावर
मंतरलेले दोरे,मंत्र,वैद्य हे उपचार करतात.पण बघता बघता दिवस निघून जातात आणि एक
दिवस तिच्या देहातून प्राण जातो.तिच्या मुलांना वार्यावर सोडून जा. ती मुलं जोरात
ओरडतात,रडतात. म्हणून कृश मोळीवाली दिसताच कवी तिची मोळी विकत घेतो.
3.आईच्या मायेचे
वर्णन कसे केले आहे?
उत्तर – माय आपल्या मुलांसाठी कष्ट करत असते. मुलांसाठी रानात वणवण
करत असते.आपल्या मुलांसाठी झुणका भाकरी,कुठे वांगे हे पदार्थ खाऊ घालते.एकदा मायला
साप चावतो तिच्या पायातून भळाभळा रक्त वाहत असते.मायवर मंतरलेले दोरे,मंत्र,वैद्य
हे उपचार करतात.पण बघता बघता दिवस निघून जातात आणि एक दिवस तिच्या देहातून प्राण
जातो.आईविना मुलं पोरकी होतात.असे आईच्या मायेचे वर्णन केले आहे.
प्र 7. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ
सांगून वाक्यात उपयोग करा.
1.हंबरडा फोडणे – जोरात ओरडणे
मायेचा प्राण गेला म्हणून
मुलांनी हंबरडा फोडला.
2.भडभडून येणे- रडायला येणे
सुषमाला आईने ओरडले म्हणून
तिला भडभडून आले.
3.वाऱ्यावर सोडणे –
मोकळे सोडणे
आईने आपल्या मुलांना वार्यावर
सोडले.