10. आपली संरक्षण
दले
1.राष्ट्राचे प्रथम कर्तव्य काय आहे?
उत्तर –देशाचे परकीय आक्रमणापासून रक्षण करणे हे राष्ट्राचे प्रथम कर्तव्य आहे.
2.संरक्षण दलाची जबाबदारी कोणती?
उत्तर –संरक्षण दलाची जबाबदारी खालील प्रमाणे–
१.देशांच्या
सीमारेषा यांचे रक्षण करणे.
२.देशाची एकात्मता अबाधित ठेवणे.
३.दहशतवाद आणि बेकायदा कार्याला आळा घालणे. इत्यादी –
3.भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर –भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांना एअर चीफ मार्शल म्हणतात.
4.संरक्षणाचा सर्वोच्च अधिकार कोणाला आहे?
उत्तर –संरक्षणाचा सर्वोच्च अधिकार भारताचे राष्ट्रपतींना आहे.
5.संरक्षण दलाचे विभाग कोणते?
उत्तर –संरक्षण दलाचे विभाग खालील प्रमाणे –
1.
भारतीय भूसेना
2.
भारतीय नौकादल
3. भारतीय
वायुसेना
6.भू सेनादलाच्या प्रमुख आला काय म्हणतात?
उत्तर –भू सेनादलाच्या प्रमुखांना फिल्ड मार्शल म्हणतात.
7.सेना दलाचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
उत्तर –सेना दलाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
8.नौका दलाच्या प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर –नौका दलाच्या प्रमुखांना ॲडमिरल म्हणतात.
9.एन.सी.सी.चे ध्येय वाक्य कोणते?
उत्तर –एन.सी.सी.चे ध्येयवाक्य शिस्त व एकता हे होय.
10.सेनेचे मुख्य कार्य कोणते?
उत्तर –देशाच्या सीमारेषेचे संरक्षणाबरोबर नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप,पूर,दुष्काळ,दरड
कोसळलीणे इत्यादी प्रसंगी मानवीय कार्य पार पाडतात.
11.सीमा सुरक्षा दलाचे कार्य कोणते?
उत्तर –भारताच्या सीमांचे रक्षण करणे हे सीमा सुरक्षा दलाचे मुख्य कार्य आहे.
12.रेड क्रॉस संघटनेचे ध्येय वाक्य कोणते?
उत्तर –मानवता व स्वयंसेवा हे रेड क्रॉस संघटनेचे मुख्य ध्येय होय.
13.संरक्षण दलात तुला सेवा करावीशी वाटते का? कारण लिहा
उत्तर –हो,संरक्षण दलांमध्ये मला सेवा करण्याचे भाग्य लाभले तर मला खूप आनंद होईल.कारण
सुजलाम सुफलाम आणि जगाला संस्कृतीचे ज्ञान देणारी माझी भारतमाता व भारतीय जनता
यांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभेल.त्याचबरोबर माझ्या मातृभूमीशी मी एकरूप होईन.
14.आम्ही संरक्षण दलात का सेवा केली पाहिजे?
उत्तर –कारण आपल्या देशाचे तसेच देशातील जनतेचे,नैसर्गिक साधन संपत्तीचे,वन्यवांचे रक्षण
करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.हे कर्तव्य पार पाडायचे असेल तर आपण संरक्षण
दलात सेवा करून पार पाडू शकतो.म्हणून आम्ही संरक्षण दलात सेवा केली पाहिजे.