14.डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद (14.Dr. Moulana Abula Klam Azad)




 14. डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद 

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?

उत्तर -डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते.

 

2. मौलाना अबुल कलाम यांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर: मौलाना अबुल कलाम यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का येथे झाला.

 

3. ‘अबुल कलामया शब्दाचा अर्थ काय ?

उत्तर: अबुल कलाम याचा अर्थ वाचस्पतीअसा आहे.

 

4. आझाद यांनी कोणकोणत्या देशांना भेटी दिल्या ?

उत्तर: आझाद यांनी इजिप्त, अरबस्तान,तुर्कस्तान इत्यादी देशांना भेटी दिल्या.




5. बंगालची फाळणी केव्हा झाली ?

उत्तर: इ.स. 1905 साली बंगालची फाळणी झाली.

6. मौलाना अबुल कलामांची कोणती इच्छा होती ?

उत्तर – भारत एकसंघ रहावा व जगात एकतेचे प्रतिक बनावा ही मौलाना अबुल कलाम यांची इच्छा होते.

आ.खालील प्रश्नांची चार ते पाच वाक्यात उत्तरे लिही.

1. अबुल कलामांनी तरुण पिढीला कोणते आवाहन केले आहे ?

उत्तर : भारत देशातील तरुण वर्गाने शिक्षणासाठी परदेशात न जाता परदेशातील लोकांनी शिक्षणासाठी भारतात यावे. भारताच्या शिक्षण पध्दतीत असलेला प्राचीन गौरव पुन्हा स्वतंत्र भारताला मिळवून द्यावा.” असे आवाहन  अबुल कलामांनी केले.




2. हिंदू मुसलमानांत फूट पडू नये म्हणून अबुल कलामांनी कोणते प्रयत्न केले ?

उत्तर : परदेशातील मुसलमानांप्रमाणे भारतातील मुसलमानांनी सुध्दा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले पाहिजे असा प्रचार सुरु केला.त्यासाठी आझादया टोपण नावाखाली त्यांनी वृत्तपत्रात लेखन सुरू केले. त्यांनी बंगालच्या फाळणीला विरोध केला.तसेच राष्ट्रभक्तीच्या प्रचारासाठी अबुल कलामांनी अल हिलाल‘, ‘अल बलाघही वृत्तपत्रे सुरू केली.

3. अबुल कलामांचे शिक्षणाबद्दलचे कोणते विचार होते ?

उत्तर : अबुल कलामांचे शिक्षणाबद्दल अतिशय दूरदृष्टिचे विचार होते. समाजातील सर्व थरातील लोकांना शिक्षण मिळाले पाहिजे असे त्यांना वाटत होते. स्वतंत्र भारतात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या तीनही क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी अशी त्यांची इच्छा होती.देशाच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी प्रौढशिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान याला त्यांनी जास्त महत्व दिले. तरुणांनी पुढाकार घेऊन ज्ञान,विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत देशाला पुढे न्यावे असे अबुल कलामांना वाटत असे.

4. संगीत, कला व साहित्याच्या विकासासाठी अबुल कलामांनी कशाप्रकारे प्रोत्साहन दिले ?

उत्तर : आपल्या देशाच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी प्रौढशिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान याला अबूला कलामांनी जास्त महत्व दिले. अबुल कलामांनी संगीत कला, साहित्य याला प्रोत्साहन देण्यासाठी संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी,ललितकला अकादमी या तीन अकादमींची स्थापना केली. या अकादमीमुळे विविध भाषा आणि संस्कृतींचे ज्ञान देशालाच नव्हे तर जगालाही होत आहे.




इ. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द वापरुन वाक्ये पूर्ण करा.

1. अबुल कलाम लहानपणी फिरोजखक्त या नावाने ओळखले जात.

2. लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयने बंगालची फाळणी केली.

3. तुरुंगात राहून त्यांनी लोकजागृतीचे कार्य जोरात सुरू केले.

4. अबुल कलामानी इंडिया विन्स फ्रीडम हा आत्मचरित्रपर ग्रंथ लिहिला.

5. 1992 साली भारत सरकारने कलामांना भारतरत्न हा पुरस्कार दिला.




ई.उलट अर्थाचे शब्द लिहा.

1. देशभक्त x देशद्रोही

2. प्रगती x अधोगती

3. कीर्ती x अपकीर्ती

4. सोय x गैरसोय

5. प्रचार x अपप्रचार

उ.खालील विशेष दिन व दिनांक यांच्या जोड्या जुळवा.

                                

1. लोकसंखा दिन       11 जुलै

2. वसुंधरा दिन            22 एप्रिल

3. शिक्षण दिन            11 नोव्हेंबर

4. पर्यावरण दिन         6 जुन

5. शिक्षक दिन            5 सप्टेंबर

6. महिला दिन             8 मार्च




ऊ. समानार्थी शब्द लिहा.

1. गौरव – सन्मान , सत्कार

2. चेतना – उत्साह  

3. फाळणी – वाटणी

4. विद्वान – अभ्यासू , पंडित

5. आधुनिक – अर्वाचीन

 

 



Share with your best friend :)