इयत्ता – चौथी
विषय मराठी
10. अडाणी खेडूत
★ नवीन शब्दांचे अर्थ
अडाणी – अज्ञानी, ज्याला ज्ञान नाही अशी व्यक्ती.
निरक्षर -लिहिता वाचता न येणारा
तऱ्हेतऱ्हेचे. – वेगवेगळे
मुश्किलीने – कष्टाने
अ) एका वाक्यात उत्तरे लिही.
१) अडाणी खेडूत शहरात कशासाठी गेला होता?
उत्तर – आडाणी खेड शहरात वाचण्यासाठी एक चष्मा आणण्यासाठी गेला होता.
२) खेडुताला कोणता चष्मा हवा होता?
उत्तर – खेडूत आला वाचण्याचा चष्मा हवा होता.
३) खेडुताचा कोणता गैरसमज होता?
उत्तर – फक्त चष्मा लावला म्हणजे वाचता येते हा खेळ भुताचा गैरसमज होता.
४) शहरात जाऊन चष्मा खरेदी केला पाहिजे असे खेडूतास का वाटले?
उत्तर – कारण फक्त चष्मा लावला म्हणजे मला इतरांसारखे वाचता येईल असे त्याला वाटत होते.
आ) विरुद्धार्थी शब्द लिही.
१) सुशिक्षित X अशिक्षित
२) शहर X गाव,खेडे
३) विश्वास X अविश्वास
४) शत्रू X मित्र
५) कठीण X सोपे
६) साक्षर x निरक्षर
इ)
दोन-तीन वाक्यात उत्तरे लिही.
१) खेडूत नेहमी काय पाहत असे?
उत्तर – खेडूत निरक्षर होता त्याला अजिबात लिहिता वाचता येत नव्हते.लोक पुस्तक किंवा पेपर वाचताना चष्मा लावतात हे तो नेहमी पाहत असे.
२) दुकानदाराच्या मनात कोणता संशय आला?
उत्तर – दुकानदाराने खेळू चला अनेक चष्मे दाखवले आणि वाचण्यासाठी एक पुस्तक घेतले पण खेडूताने सगळे चष्मे डोळ्याला लावून पाहिले तरीही कोणता चष्मा माझा उपयोगाचा नाही
असे तो म्हणाला तसेच तसेच त्या खेडूताने पुस्तक वाचताना उलटे धरले होते. यावरून दुकानदारा ला संशय आला की खेळत आला वाचताच येत नसावे.
३) खेडुताची खरी अडचण कोणती होती?
उत्तर – खेडूत आडाणी होता. लिहायला वाचायला येत नव्हते ही त्याची खरी अडचण होती.
ई) कंसातील शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण कर.
(साक्षर, चष्मा, गिऱ्हाईक, दुकानदार, निरक्षर)
१) व्यवस्थित दिसण्यास मदत करणारी वस्तू – चष्मा
२) लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
३) दुकानातील वस्तू खरेदी करणारा – गिऱ्हाईक
४) लिहिता वाचता येणारा – साक्षर
५) दुकान चालविणारा – दुकानदार
उ) खाली दिल्या कोष्टकात काही शब्द उलटे सुलटे लपलेले आहेत.ते शोधून लिही.
1) अडाणी
2) उलटे
3) पुस्तक
4) अशिक्षित
5) अज्ञान
6) कदाचित
7) खेडूत
8) काटे
9) चष्मा
1) दुकानदार
11 सुशिक्षित
काच