इयत्ता – सहावी
विषय – मराठी
13 .जन्म झाला शुन्याचा
अ.नवीन शब्दांचे अर्थ
ज्यू – एक जमात
वारेमाप – घसघशीत,खूप, भरपूर
काटछाट – कमी करणे
त्रस्त -त्रासलेला
आ.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) गणित तज्ज्ञांची सभा कोठे भरली होती ?
उत्तर -गणित तज्ज्ञांची सभा भारतीय विद्यापीठात भरली होती.
2) सभेचे अध्यक्षपद कोणाकडे होते ?
उत्तर- सभेचे अध्यक्षपद भारतीय गणिती तज्ज्ञ ब्रह्मगुप्ताकडे
होते.
3) नवीन मित्र गणितात का आणला ?
उत्तर -गणितातील गुंतागुत कमी करण्यासाठी नवीन मित्र गणितात
आणला.
4) महापराक्रमी कोणाला म्हटले आहे ?
उत्तर -शून्याला महापराक्रमी म्हटले आहे.
5) ब्रह्मगुप्ताचे अभिनंदन कोणी केले ?
उत्तर- सर्व तज्ज्ञांनी ब्रह्मगुप्ताचे अभिनंदन केले.
इ.खालील
प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिही.
1) सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ?
उत्तर- सभेत खालील विषयांवर चर्चा झाली-
1.गणितात वारेमाप निर्माण झालेल्या चिन्हांची काटछाट करणे
2.गणितातील आकडे सहज मांडता येणे.
3.बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार सोपा होईल असा मार्ग शोधणे.
2) रोमन लिपीमध्ये दहा हजार ही संख्या कशी लिहावी
लागे?
उत्तर- रोमन लिपीत C म्हणजे
100 होतात.त्यामुळे रोमन लिपीमध्ये दहा हजार लिहिण्यासाठी C हे
चिन्ह शंभर वेळा लिहावे लागे.
(3) शून्याला महापराक्रमी असे का म्हटले आहे ?
उत्तर: कारण कोणत्याही आकड्यावर दोन शून्य दिल्यास आकड्याची
किंमत शंभर पट वाढते,तीन शून्य दिल्यास,आकड्यांची किंमत हजार पटीने वाढते.तर
कोणत्याही आकड्यामागे एक टिंब ठेवून शून्य दिल्यास त्या आकड्याची किंमत दहा पटीने
कमी होते.तसेच कोणत्याही आकड्यात शून्य मिळवा किंवा वजा करा उत्तर तेच आकडे येतात.शुन्यामुळे
गुणाकार,भागाकार, बेरीज,वजाबाकी या क्रिया सोप्या झाल्या म्हणून शून्याला महापराक्रमी
म्हटले आहे.
4) सभेला कोणकोणत्या देशातील तज्ज्ञ मंडळी हजर
होती ?
उत्तर- सभेला ग्रीक, रोमन, अरब,ज्यू इत्यादी
देशातील तज्ज्ञ मंडळी हजर होती.
ई. रिकाम्या जागा भर.
1) जगातील गणित
तज्ज्ञांची सभा भरली होती.
2) ब्रह्मगुप्ताने नम्रपणाने आपला ग्रंथ पुढे केला.
3) नवीन मित्र शून्याला
म्हटले आहे.
4) गणितात शून्यामुळे फार मोठी क्रांती घडली.
5) सर्वांनी शून्याचे स्वागत
केले.
उ.खालील शब्दांचा वाक्यात उपयोग कर.
1) विस्फारणे – मी अभ्यास केला नाही म्हणून माझी आई डोळे विस्फारून पाहात
होती.
2) नम्रपणा – माणसाने नेहमी नम्रपणे बोलावे.
3) स्वागत – शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांचे स्वागत केले.
4) अभिनंदन – भाषण स्पर्धेत नंबर आल्याबद्दल सर्वांनी सुमितचे अभिनंदन केले.
ऊ. चूक
की बरोबर ते लिही.
1) शून्याला स्वतःला अशी काही किंमत नाही. बरोबर
2) अंकाच्या समोर (पुढे) शून्य लिहिल्यास शून्याला किंमत
येते. बरोबर
3) अंकाच्या डाव्या बाजूला टिंब देऊन शून्य लिहिल्यास किंमत
दहापटीने कमी होते. बरोबर
4) अंकाच्या उजव्या बाजूला शून्य लिहिल्यास अंकाची किंमत
दहापटीने वाढते.– बरोबर
ऐ.खालील वाक्प्रचारांचा अर्थ शिक्षक/ पालकांच्या
कडून समजून घेऊन लिहा.
1) काटछाट करणे -कमी करणे
2) गुंतागुंत कमी करणे – अवघड काम सोपे करणे, कठीण
काम सोप्या पद्धतीने करणे.
3) उलट सुलट विचार करणे – दोन्ही बाजूंनी विचार करणे.
4) महापराक्रम गाजविणे – खूप मोठे यश मिळविणे.
5)डोक्यावरचा
भार हलका होणे – ताण कमी होणे.