पाठ – १२
बारा महिने
★ नवीन शब्दांचे अर्थ
भादव – भाद्रपद महिना
मार्गेसर – मार्गशीर्ष महिना
नवमास – नवीन महिना
स्वाध्याय
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.
१) झाडाना नव्या पालवीचा बहर कोणत्या महिन्यात येतो?
उत्तर – झाडाना नव्या पालवीचा बहर चैत्र महिन्यात येतो.
२) सृष्टी हिरव्या रंगात केव्हा नटलेली दिसते?
उत्तर – श्रावण महिन्यात सृष्टी हिरव्या रंगात नटलेली दिसते.
३) झेंडूची फुले कशी दिसतात?
उत्तर –झेंडूची फुले पिवळी धमक दिसतात.
४) झाडांची पाने झडू लागतात तेव्हा कोणते महिने आले असे समजावे ?
उत्तर – झाडांची पाने झडू लागतात तेव्हा माघ,फाल्गुन,वसंत महिने आले असे समजावे.
आ) खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१) भारतीय पंचांगाप्रमाणे येणारे बारा महिने क्रमवार लिही.
उत्तर – भारतीय पंचांगाप्रमाणे येणारे बारा महिने क्रमवार खालीलप्रमाणे –
1) चैत्र
2) वैशाख
3) ज्येष्ठ
4) आषाढ
5) श्रावण
6) भाद्रपद
7) अश्विन
8) कार्तिक
9) मार्गशीष
10) पौष
11) माघ
12) फाल्गुन
२) कवितेतील बहराचा, मोहोराचा, असे ताल साधणारे शब्द शोधून लिही.
उत्तर – सोसाट्याचा,पाचोळ्याचा,नवमासांचा
३) ‘पिवळी धम्मक‘ हा शब्दप्रयोग पहा. इतर रंगांशी
संबंधित तुम्हाला माहीत असलेले असे इतर शब्दप्रयोग लिही. (यात मूळ शब्द ‘पिवळा धम्मक‘ असा आहे)
उत्तर – काळाभोर,पांढराशुभ्र, हिरवा गार लालबुंद निळाशार इत्यादी.
४) बारा महिन्यांची इंग्रजी नावे क्रमवार लिही.
उत्तर – बारा महिन्यांची इंग्रजी नावे क्रमवार खालीलप्रमाणे –
1) जानेवारी
2) फेब्रुवारी
3) मार्च
4) एप्रिल
5) मे
6) जून
7) जुलै
8) ऑगस्ट
9) सप्टेंबर
10) ऑक्टोंबर
11) नोव्हेंबर
12) डिसेंबर
ई) पंचांगातील बारा महिन्यांमध्ये येणाऱ्या महत्वाच्या सणांची यादी दिली आहे. ते सण कोणत्या महिन्यात येतात ते शिक्षकाच्या मदतीने लिही.
गुढी पाडवा – चैत्र
अक्षय तृतीया – वैशाख
महाशिवरात्र – माघ
होळी पौर्णिमा – फाल्गुन
नरक चतुर्दशी – आश्विन
वटपौर्णिमा – ज्येष्ठ
गोकुळ अष्टमी – भाद्रपद
गणेश चतुर्थी – भाद्रपद
दसरा – अश्विन
मकर संक्रात – पौष
उ) कंसात दिलेला योग्य शब्द निवडून खालील वाक्ये पूर्ण कर.
१) एका वर्षामध्ये बारा महिने असतात. (वारा/बारा)
२) झेंडूच्या फुलांचा रंग पिवळा धम्मक होता. (रंग / रग)
३) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन (दीन / दिन) म्हणून साजरा करतो.
४) कापड विणण्यासाठी सूत वापरतात. (सुत / सूत)
५) कामाच्या वेळी क्षणाचीही उसंत नसते.(वसंत / उसंत)
ऊ) चित्र आणि महिन्याच्या नावांची जोडी जमव.
वरील नोट्स PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..