इयत्ता – चौथी
विषय – मराठी
पाठ – 11
पत्रलेखन
★ नवीन शब्दांचे अर्थ
अप्रतिम अत्यंत सुंदर
घनदाट – दाटीवाटीचे, भरगच्च
पोफळी – सुपारीचे झाड
टुमदार – छोटे,आटोपशीर
गर्द – दाट
झावळी – नारळाच्या झाडाची फांदी
गोपुरे – मंदिराची शिखरे
पौराणिक – पुराणातील
अलिशान – भव्य, मोठे
लाँच – इंजिनवर चालणारी होडी
सान्निध्य – सहवास
प्रतिबिंब आरशात किंवा पाण्यात दिसणारे रूप
अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१) वरील पत्र कोणी कोणास लिहिले आहे ?
उत्तर – वरील पत्र स्नेहलने प्राजक्तास लिहिले आहे.
२) स्नेहलची सहल कोणत्या निसर्गरम्य ठिकाणी गेली होती?
उत्तर -स्नेहलची सहल मुर्डेश्वर या निसर्गरम्य ठिकाणी गेली होती.
३) नारळाच्या झावळ्यांमधून कोणाचे दर्शन होते ?
उत्तर – नारळाच्या झावळ्या मधून आकाशाशी स्पर्धा करणार्या शंकराच्या मूर्तीचे दर्शन होते.
४) मंदिराच्या भव्यतेची कल्पना कशावरून येते?
उत्तर -मुर्डेश्वर मंदिराची उंच उंच गोपुरे पाहिले की मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते.
५) मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा कसा आहे?
उत्तर -मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा सुरक्षित आहे.
६) स्नेहलला प्राजक्ताची केंव्हा आठवण आली ?
उत्तर – मुर्डेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर शंख-शिंपले गोळा करताना आणि लॉंच मधून छोटी समुद्र सैनिक करताना स्नेहलला प्राजक्ताची आठवण आली.
७) समुद्रकिनाऱ्यावर कशाची दुकाने आहेत?
उत्तर -समुद्रकिनाऱ्यावर कलाकुसरीच्या साहित्याची तसेच भेळपुरी,चाटची दुकाने होती.
आ) पत्राच्या आधारे समुद्रकिनाऱ्याचे वर्णन कर...
उत्तर – समुद्राचा किनारा म्हणजे सर्वांनी मनसोक्त मजा लुटण्याचे ठिकाण असते.सगळीकडेच वाळूच वाळू आणि पाणीच पाणी.समुद्राच्या किनाऱ्यावरून वेगाने जाणाऱ्या लाँचेस,मच्छीमारांच्या छोट्या छोट्या होड्या,प्रचंड मोठी जहाजे व मधूनच झेपावणाऱ्या एखाद्या समुद्रपक्ष्याचे दर्शन होते. समुद्रकिनाऱ्यावर शंख शिंपले गोळा करताना आणि लाँचमधून छोटी समुद्रसैर करायला वेगळी मजा असते.समुद्र किनाऱ्यावर असणारी भेळपुरी,चाटची दुकाने पर्यटकांना आकर्षित करतात. समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताच्यावेळी सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून समुद्राचे पाणी केशरी झाल्याप्रमाणे दिसते.असा हा नयनरम्य समुद्र किनारा सर्वांना खूप खूप आवडतो.
इ)
समुद्रकिनाऱ्याचे सुंदर चित्र रेखाट.
ई) शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आमंत्रण देणारे पत्र आपल्या लहान भावास / बहिणीस
लिही.
दि. 16 डिसेंबर 2021
चि. अवनीश यांस ,
अनेक शुभाशिर्वाद –
पत्र लिहिण्यास आनंद होत आहे कि,पुढील महिन्यात बुधवार दि. २६ जानेवारी २०२२ रोजी आमच्या शाळेचे स्नेह संमेलन होणार असून या कार्यक्रमात माझेही नृत्य होणार आहे.माझ्याबरोबर माझ्या शाळेतील सर्वच मुले या कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत.नृत्य,गायन,नाटके,समूहगीत इत्यादी या कार्यक्रमात होणार असून हा कार्यक्रम पाहण्यास तू ही यावास अशी माझी इच्छा आहे. येताना आई बाबानाही घेऊन ये.
तीर्थरूप आई– बाबाना माझा नमस्कार सांग व पत्राचे उत्तर लवकरात लवकर पाठव.
कळावे
तुझा दादा,
प्रितम
प्रति,
अवनीश सुयश देशपांडे
घ.नं. 154
कुंभार गल्ली कोल्हापूर
ता. करवीर जिल्हा – कोल्हापूर
पिनकोड- 416001
उ)
कर्नाटक राज्यातील निसर्गरम्य अशा पर्यटन स्थळांची यादी कर. (शिक्षकांच्या
सहाय्याने)
उत्तर – बेंगळूरू,दांडेली,जोगचा धबधबा,गोकाकचा
धबधबा,बंदीपूर अभयारण्य,गोकर्ण,हम्पी इत्यादी कर्नाटक राज्यातील
निसर्गरम्य पर्यटन स्थळे आहेत.
ऊ)
जोड्या जुळव..
‘अ‘ ‘ब‘ उत्तर
१) घनदाट १) दरी जंगल
२) उंच २) झाडी डोंगर
३) खोल ३) बाग दरी
४) बहरलेली ४) घर बाग
५) गर्द ५) जंगल झाडी
६) कौलारू ६) डोंगर घर