(NUMBER) वचन :
नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो
गुण असतो त्याला वचन असे म्हणतात.
वचनाचे दोन प्रकार आहेत.
१)एकवचन (Singular Number)
नामाच्या रुपावरुन ज्यावेळेस एक वस्तू,व्यक्ती किंवा स्थळ यांचा बोध होतो.तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात.
उदा. : Pen , Head ,Leg
२) अनेकवचन (Plural Number) :
नामाच्या रुपावरुन ज्यावेळेस एकापेक्षा
जास्त व्यक्ती, वस्तू किंवा स्थळयांचा होतो तेव्हा त्यास
अनेकवचन असे म्हणतात.
उदा. :Pens , Heads , Legs
इंग्रजीमध्ये एकवचनी नामाचे अनेकवचन तयार करण्याचे कांही नियम खालीलप्रमाणे :
१. सामान्यपणे इंग्रजीत जास्तीत एकवचनी नामाला s हा प्रत्यय
लावून त्याचे अनेकवचन तयार होते.
उदा. :एकवचन – अनेकवचन
Pen – Pens
Hand – Hands
२.नामाच्या शेवटी y असून त्यापूर्वी स्वर (a,e,i,o,u
) येत असेल तर त्या नामाचे अनेकवचन s हा प्रत्यय जोडून करतात..
उदा. :एकवचन – अनेकवचन
Boy – Boys
Key – Keys
Day – Days
३.नामाच्या शेवटी y असून त्यापूर्वी व्यंजन असेल्यास त्या नामातील y काढून त्याजागी ies हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन करतात.
उदा. :एकवचन – अनेकवचन
Baby – Babies
Story – Stories
City – Cities
४.नामाच्या शेवटी s, sh,
ch, ss, x, z यापैकी अक्षर असेल तर es हा प्रत्यय लावून त्या नामाचे अनेकवचन करतात..
एकवचन – अनेकवचन
Bus – Buses
Class – Classes
Dish – Dishes
Bench – Benches
Box – Boxes
५.नामाच्या शेवटी o असून त्यापूर्वी व्यंजन असेल तर es हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन करतात.
एकवचन – अनेकवचन
Hero – Heroes
Potato – Potatoes
Buffalo – Buffaloes
काही अपवाद:
Photo –
Photos
Piano –
Pianos
Kilo – Kilos
Dynamo – Dynamos
६.मात्र नामाच्या शेवटी o असून त्यापूर्वी स्वर असेल तर फक्त s हा प्रत्यय जोडून त्या नामाचे अनेकवचन करतात.
एकवचन – अनेकवचन
Radio – Radios
Cuckoo – Cuckoos
Studio – Studios
७.नामाच्या शेवटी f, fe ही अक्षरे असल्यास f, fe काढून टाकून त्यांच्या जागी ves ही हा प्रत्यय लावून त्या नामांचे अनेकवचन करतात.
एकवचन – अनेकवचन
Leaf – Leaves
Wife – wives
Shelf – Shelves
८. वरील
नियमास अपवाद असणारी नामे –
एकवचन – अनेकवचन
Roof – Roofs
Safe – safes
Chief – Chiefs
Cliff – Cliffs
Handkerchief – Handkerchiefs
९.काही एकवचनी नामांचे अनेकवचन नामातील स्वरात बदल करून करतात..
एकवचन – अनेकवचन
Man – Men
Foot – Feet
१०.नामाच्या शेवटी man हा शब्द असेल्यास त्याचे अनेकवचन man च्या जागी men वापरून करावे.
एकवचन – अनेकवचन
Postman – Postmen
Milkman – Milkman
Gentleman – Gentlemen
११.काही नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे एकसारखीच असतात.
एकवचन – अनेकवचन
Sheep – Sheep
Deer – Deer
Swine – Swine
कांही उदाहरणे –
Singular – Plural
I – We
you – you
he – they
she – they
it – they
is – are
this – these
that – those
was – were
lady – ladies
century – centuries
dictionary – dictionaries
toy – toys
monkey – monkeys
donkey – donkeys
holiday – holidays
ray – rays
story – stories
banana – bananas
mango – mangoes
paisa – paise
shoe – shoes
tomato – tomatoes
rupee – rupees
echo – echoes
bush –
bushes
radio – radios
branch – branches
cuckoo – cuckoos
batch – batches
thief – thieves
watch – watches
calf – calves
gas – gases
wolf – wolves
brush – brushes
half – halves
fox – foxes
scarf – scarfs
bench – benches
belief – beliefs
address – addresses
grief – griefs
bus – buses
woman – women
fly – flies
tooth – teeth
country – countries
goose – geese
lorry – lorries
horseman – horsemen
family – families
washer-man – washer-men
puppy – puppies
policeman – policemen
colony – colonies.