6vi APALE KARNATAKA (BELGAVI VIBHAG) बेळगावी विभाग

 


बेळगावी विभाग

आपली अरण्य संपत्ती

खालील प्रश्नाची उत्तरे द्या.

1) सदाहरित जंगले म्हणजे काय ?

उत्तर – वर्षभर हिरवीगार असणाऱ्या जंगलांना सदाहरित जंगले
असे म्हणतात.

2) बेळगावी विभागातील प्रमुख धबधब्यांची नावे लिहा.

उत्तर – बेळगावी विभागातील प्रमुख धबधब्यांची नावे
खालीलप्रमाणे

1.गोकाकचा
धबधबा

2.नागडू
धबधबा

3. देवमाला
धबधबा

4. अस्परकोंड
धबधबा

 

3) बेळगावी विभागातील कोणत्या जिल्हयात लोखंडाची खनिजे मिळतात ?

उत्तर – बेळगावी भागातील बागलकोट जिल्ह्यात लोखंडाची खनिजे
मिळतात.

 

आपला शेती व्यवसाय

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) या विभागातील जिल्हयामध्ये वाढणारी प्रमुख पिके कोण कोणती ?

उत्तर – बेळगावी विभागात भात,कापूस,मका,कडधान्य गहू,बाजरी,मिरची इत्यादी पिके पिकवली जातात.

 

2) या विभागातील कोणत्या जिल्हयात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय
आहे
?

उत्तर – बेळगावी विभागातील उत्तर कन्नड जिल्ह्यात मासेमारी
हा प्रमुख व्यवसाय आहे.

 

3) या विभागातील कोणत्या जिल्हयात बीजोत्पादन केंद्र आहे?

उत्तर – बेळगावी विभागातील हावेरी जिल्ह्यात बीजोत्पादन
केंद्र आहे.

 

4) या विभागातील बॅडगीहे गाव कोणत्या शेती उत्पन्नामुळे नावारूपास आले
आहे
?

उत्तर – बेळगावी विभागातील बॅडगी हे गाव मिरची या शेती
उत्पन्नामुळे नावारूपास आले आहे.




 

आपल्या विभागातील कला,साहित्य,संगीत,लोककला,नाटक

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) या विभागातील तीन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची नावे लिहा.

उत्तर – बेळगावी विभागातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची
नावे खालील प्रमाणे..

1.द.रा.बेंद्रे

2.गिरीश
कर्नाड

3.चंद्रशेखर
कंबार

2) या विभागातील तीन प्रसिद्ध संगीतकारांची नावे लिहा.

उत्तर – बेळगावी विभागातील प्रसिद्ध संगीतकारांची नावे
खालील प्रमाणे…..

1.भारतरत्न
पंडित भीमसेन जोशी

2.पंडित
मल्लिकार्जून मन्सूर

3.विदुषी
गंगुबाई हनगल

4.पंडित
व्यंकटेश कुमार

 

3) या विभागातील दोन प्रसिद्ध नाटक विभागांची नावे लिहा.

उत्तर – बेळगावी विभागातील नाटक विभागांची नावे खालील
प्रमाणे

1.श्रीकृष्ण
पारिजात

2. तिंळू
तिट्टू  यक्षगाण

3.सन्नाट
दोड्डाट

 


आपले आरोग्य आणि शिक्षण

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) बेळगावी विभागातील कोणत्या जिल्हयात कायदा महाविद्यालय आहे ?

उत्तर – बेळगावी विभागातील 
हुबळी या जिल्ह्यात कायदा महाविद्यालय आहे.

 

2) ग्रामीण भागात सरकारने स्थापन केलेल्या आरोग्य केंद्राचे
नाव काय
?

उत्तर – ग्रामीण भागात सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)
या नावाने सरकारी दवाखाने चालू केले आहेत.

 

3) या विभागातील कोणत्या जिल्हयात कृषी विश्वविद्यालय आहे?

उत्तर – बेळगावी विभागातील बागलकोट जिल्ह्यात कृषि
विश्वविद्यालय आहे.

 

4) कर्नाटक विभागातील प्रथम महिला विश्वविद्यालय कोठे सुरू
झाले
?

उत्तर – कर्नाटक विभागातील प्रथम महिला विश्वविद्यालय
विजापूर या ठिकाणी सुरु झाले.




Share with your best friend :)