7th MARATHI 9. Amhi Tikalo Tar Tumhi Tikal (सातवी मराठी ९. आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल )

9. आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल

नवीन शब्दार्थ :

गणना करणे – अंतर्भाव होणे,

कृत्रिम – मानव निर्मित,

हिमनग – बर्फाचे पर्वत,

वास्तव्य करणे – राहणे

वनराई – जंगल

सुसह्य – सहन करण्याजोगे

उपजीविका – उदरनिर्वाह, पोट भरण्यापुरते

स्वच्छंद – स्वतंत्रपणे, स्वतःच्या इच्छेनुसार राहणे

रोडवणे बारीक होणे

रत्नाकर – समुद्र

पवन – वारा

अर्णव – समुद्र

वसुंधरा – पृथ्वी

त्सुनामी – भूकंपामुळे समुद्रातून येणाऱ्या
प्रचंड लाटा (मूळ जपानी शब्द )

ऑक्टोपस  – आठ पायांचा सामरी प्राणी (हा प्राणी आपल्या
भक्षाच्या शरीरातील फक्त रक्त शोषून घेतो.)

ओझोन – पृथ्वी-सभोवतालचे उंचावर पसरलेले
प्राणवायूचे आवरण

 


समानार्थी शब्द

सरिता
नदी, तटिनी, तरंगिणी

समुद्र
रत्नाकर, अर्णव , सागर

पृथ्वी
वसुंधरा, धरती, अवनी

वारा
पवन, अनिल, वायू

आकाश
गगन, अबर, आभाळ

सूर्य
भास्कर, मित्र, रवी

अरण्य
वन , कानन, जंगल

अ.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.

1. समुद्र नदीला काय विचारतो ?

उत्तर : काय गं सरिते, हल्ली तू फारच रोडावत चालली आहेस?” असे समुद्र नदीला विचारतो.

2. समुद्र कोणाला सुंदर म्हणतो ?

उत्तर : समुद्र
पृथ्वीला सुंदर म्हणतो.

3. नदीच्या मते पृथ्वीवर बुद्धिमान कोण ?

उत्तर : नदीच्या
मते मानव हा पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान आहे.

4. ओझोनची जाडी दिवसेंदिवस का कमी होत आहे ?

उत्तर :
पृथ्वीवर प्रदूषण वाढल्यामुळे ओझोनची जाडी दिवसेंदिवस कमी होत आहे.

5. जागतिक तापमान म्हणजे काय ?

उत्तर : जागतिक
तापमान म्हणजे पृथ्वीवर प्रदूषण वाढल्यामुळे अतिनील किरणांचा परिणाम वाढून
पृथ्वीवरील तापमान वाढणे.

6. वसुंधरा दिनआपण कधी साजरा करतो ?

उत्तर :  22 एप्रिल रोजी आपण वसुंधरा दिन साजरा करतो.

 


आ.खालील वाक्ये कोणी कोणाला उद्देशून म्हटली आहेत ते
लिही.

1. “आमच्या
नशीबाचे भोग आहेत हे
?”

उत्तर : हे
वाक्य नदीने समुद्राला उद्देशून म्हटले आहे.

2. “आमच्यात सुंदर कोण ?”

उत्तर : हे
वाक्य पृथ्वीने समुद्राला उद्देशून म्हटले आहे.

3. “भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी”

उत्तर : हे
वाक्य पृथ्वीने समुद्राला उद्देशून म्हटले आहे.

4. “होय, अगदी आक्टोपस सारखे खेचून घेतात.”

उत्तर : हे
वाक्य पृथ्वीने आकाशाला उद्देशून म्हटले आहे.

5. “आहे की आणि तोही मानवाच्या हातात.”

उत्तर : हे
वाक्य सूर्याने वाऱ्याला उद्देशून म्हटले आहे.

इ. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिही.

1. पृथ्वी सुंदर का दिसते ?

उत्तर : पृथ्वीवर
हिरवीगार झाडे
, वेली, उंच उंच पर्वत, स्वच्छ ओढे, सरोवरे, नद्या हे सारे दागिन्यासारखे सजले आहेत. या सर्वांमुळे
पृथ्वी सुंदर दिसते.

2. पृथ्वीवर मानवाने अन्याय कसा केला ?

उत्तर : मानवाच्या
गरजा वाढत गेल्या
, विकासाच्या नावाखाली त्याने झाडं तोडली, डोंगर सपाट केले, मोठमोठी धरणं बांधली. रहायला घरे पाहिजेत
म्हणून उंच उंच इमारती बांधल्या
, कारखाने सुरु केले, मोठ मोठे रस्ते तयार केले आणि या वसुंधरेला
त्यांनी कुरुप बनविले.आणि याच मानवाने शहरातील सांडपाणी
, कारखान्यातील दूषित रसायन मिश्रित पाणी सगळं पृथ्वीवर
आणून सोडून पृथ्वीला दुषित बनवले.अशा प्रकारे  पृथ्वीवर मानवाने अन्याय केला.

3. नद्या व समुद्र दूषित का झालेत ?

उत्तर : मानवाने
शहरातील सांडपाणी
, कारखान्यातील दूषित रसायन मिश्रित पाणी सगळं
नदीतील पाण्यात सोडले व नदीचे पाणी दुशीर केल. या नद्या पुढे जाऊन समुद्राला
मिळतात.त्यामुळे नद्या व समुद्र दूषित झाले आहेत.

4. वाऱ्याचा जीव कशामुळे गुदमरतो ?

उत्तर : मानवाने
जंगलतोड केल्यामुळे वनराई कमी झाली. हजारो कारखाने
, लाखो वाहने, त्यातून बाहेर पडणारा धूर, दूषित पदार्थांची दुर्गंधी,उष्णता तसेच ध्वनी प्रदूषण यामुळे वाऱ्याचा जीव
गुदमरतो.

5. आकाशावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम झाला आहे ?

उत्तर : जंगलतोडीमुळे
पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.हवेतील उष्णता वाढलेली आहे
, त्यात भर म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धेच्या मागे
लागून देशादेशातून होणाऱ्या अणू आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या
, अंतराळात सोडले जाणारे कृत्रिम उपग्रह या सर्वांचा परिणाम आकाशावर होत आहे.तसेच
पृथ्वीवरील धूर,प्रदूषित हवा,उष्णता हे सर्व आकाशात जाते. या सर्वांमुळे आकाशातील
ओझोन थराची जाडी दिवसेंदिवस कमी होता आहे.

 


ई. शिक्षकाच्या
मदतीने खालील म्हणी पूर्ण कर.

1. खाण तशी
माती.

3. गर्वाचे घर
खाली.

2. खाई त्याला
खवखवे.

4. चोराच्या
मनात चांदणे.

5. दाम करी काम.

 


उ. उदाहरणात
दाखविल्याप्रमाणे जोडशब्दानी रिकाम्या जागा भर.

1. गाठभेट

 2. ठाकठीक

3. थट्टामस्करी

4. बागबगीचा

5. सगेसोयरे

6. मेवामिठाई

7. मानापमान

8. दागधब्बे 


 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *