इयत्ता – सहावी
विषय – मराठी
पाठ 12
डोंगरातील शाळा
नवीन शब्दार्थ –
वाडी – 10 ते 15 घरे असणारी वसती
मढलेला – आच्छादलेला
महावृक्ष – मोठे झाड
चमकणे – प्रकाशणे
शिकवण – शिक्षण
घोषणा – जाहीर करणे
सतत – कायम, नेहमी
आसपास – भोवताली
झापा – कामठ्या, झावळ्या
पेंढा – ज्वारीच्या
कांज्या किंवा – धाट
छप्पर – घरावरचे आच्छादन
चिरा – घडीव दगड
आ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1) गाव कोठे होतं?
उत्तर: गांव जंगलात व डोंगर दऱ्यामध्ये होतं.
2) मुले शाळेला कशी जात असत?
उत्तर: मुले शाळेला एका अवघड पायवाटेने जात असत.
3) पवना कोण होती?
उत्तर: पवना ही शहरात जाऊन शिकलेली एक तरुण मुलगी होती.
4) शाळा बांधायची असे कोणी ठरविले?
उत्तर: मुंबईला जाऊन श्रीमंत झालेल्या शंभू नावाच्या
व्यापाऱ्याने शाळा बांधायची ठरविले.
5) शाळा कशाची बांधली?
उत्तर: बांबू, नारळाच्या झावळ्या यांचा वापर
करून शाळा बांधली.
इ. पाठाच्या आधारे रिकाम्या जागा भर.
1) शाळा बांधू ती शिमीट कांक्रीटची (सिमेंट काँक्रीटची)
अशी त्याने घोषणा केली.
2) वडाचे झाड म्हणजे देवाचे झाड आहे.
3) पोरांच्या डोक्यात सतत होतं शाळा पाहिजे.
4) गरज ही शोधाची जननी आहे.
5) झाडाखाली शिकता शिकता झाडालाही गोडी लागली.
ई. खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे
लिही.
1) गावची परिस्थिती कशी होती ?
उत्तर : ते एक
जंगलातलं गांव,वाडीच म्हणायची,आजूबाजूला डोंगर,एका बाजूला
दऱ्या,पुढे कोकणच, मध्येच जराशी सपाट जागा. सगळा परिसर दाट झाडीने मढलेला, बांडगुळ
महावृक्षापासून ते फांद्याफांद्यावर लोंबणाऱ्या माँस वनस्पतीपर्यंत. वाडीतून मूलं
शाळेसाठी खालच्या गावात उतरून जात असत.अशी गावची परिस्थिती होती.
2) गावात शाळा बांधायचे का ठरले ?
उत्तर: कारण गावात शाळा नव्हती.त्यामुळे मुलांना शाळेसाठी
खालच्या गावात उतरून जावे लागत असे.म्हणून गावात शाळेचे गरज होती.तसेच गावात पवना
नावाची एक तरुण मुलगी चांगले शिकवत असे त्यामुळे गावातील मुलं खालच्या गावातल्या
शाळेत चमकत होती.म्हणून गावात शाळा बांधायचे ठरले.
(3) शाळा बांधण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या?
उत्तरः शाळा सिमेंट काँक्रीटची बांधायची असल्याने जागेची अडचण
होती.सिमेंट विटा आणणार कशा? गावकऱ्यांचा झाडे तोडण्यास विरोध होता.त्यामुळे झाडे
तोडण्यास आलेल्या टोळीला गावकऱ्यांनी परत पाठवलं.अशा अनेक अडचणी शाळा बांधण्यासाठी आल्या.
4) शाळा बांधण्यासाठी कशाचा वापर केला?
उत्तरः गावकऱ्यांचा विरोध झाल्याने शंभूने गावात सिमेंट काँक्रीटची शाळा बांधण्याचा
विचार मनातून काढून टाकला.पण गावातील पोरांच्या डोक्यात सतत होत शाळा बांधायची.म्हणून
नारळाच्या झावळ्या,पेंढा,बांबूच्या कामठ्या इत्यादींचा वापर करून शाळा
बांधण्यात आली.
5) शाळा पाहून शंभूला काय वाटले?
उत्तर: शंभूने गावात सिमेंट काँक्रीटची शाळा बांधण्याचा
विचार मनातून काढून टाकला.पण गावातील पोरांना शाळा बांधायची होती.म्हणून पवनाने पुढाकार
घेऊन नारळाच्या झावळ्या,पेंढा,बांबूच्या कामठ्या इत्यादींचा वापर करून शाळा बांधली.ती
शाळा पाहून शंभूला वाटले की सिमेंट काँक्रीटपेक्षा हीच शाळा सुंदर आहे.
उ . समान अर्थी शब्द लिही.
अवघड – कठीण
मजूर – कामगार
सांगाडा – रचना , बांधणी
रस्ता – वाट
बांबू – वेळू, कळक
ऊ. विरुध्द अर्थी शब्द लिही.
श्रीमंत x गरीब
होकार x नकार
झाड x वृक्ष
नेणार x आणणार
साक्षर x निरक्षर
ए. कोणी, कोणास, व केव्हा म्हणाले ते सांग व लिही.
1) “शाळा बांधू ती सिमिट काँक्रीटची”
उत्तर : हे वाक्य शंभूने गावकऱ्याना म्हटले आहे.गावात शाळा बांधायचे
ठरल्यानंतर शंभूने हे वाक्य म्हटले आहे.
2) “शाळा बांधायची अन् तू त्यात
मास्तरीण”
उत्तर : हे वाक्य पोरांनी पवनाला म्हटले आहे. गावात बांबूची
शाळा बांधायची ठरल्यानंतर पोरांनी पवनाला हे वाक्य म्हटले आहे.
3) “पवने मला माफ कर”
उत्तर : हे वाक्य रघूने पवनाला म्हटले आहे.व्यसनमुक्ती
केंद्रातून परत आल्यानंतर रघूने हे वाक्य म्हटले आहे.
(4) “त्या शिमिटापेक्षा हे बेस्ट हाय”
!
उत्तर : हे वाक्य शंभूने म्हटले आहे. गावातील बांबू, झावळ्याने
तयार केलेली शाळा पाहून शंभूने हे वाक्य म्हटले आहे.