इयत्ता – सहावी
दुसरे सत्र
विषय – समाज विज्ञान
पाठ – १
आपले कर्नाटक
(कलबुरगी विभाग)
कलबुरगी
विभागातील जिल्हे पूर्व इतिहास
खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) संविधानाच्या
कोणत्या कलमामध्ये कलबुरगी विभागातील जिल्ह्यांना विशेष स्थान दिले आहे?
उत्तर – संविधानातील कलम 371 (जी) नुसार कलबुरगी
विभागातील जिल्ह्यांना विशेष स्थान दिले आहे.
2) निजाम संस्थान
कोणत्या साली भारतात विलीन झाले?
उत्तर -निजाम संस्थान 1948 मध्ये भारतात विलीन
झाले.
3) बळ्ळारी
जिल्हयातील हंपी ही कोणत्या साम्राज्याची राजधानी होती ?
उत्तर -बळळारी
जिल्ह्यातील हंपी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.
4) विजयनगर आणि
बहमनी राज्यघराण्य पतनानंतर राज्यकारभार केलेल्या दोन संस्थानांची नांवे लिहा.
उत्तर -विजयनगर आणि बामणी
राजकारण्यांच्या पतनानंतर हरपणहळ्ळी,जरीमले, संडुरू आणि सुरपूरचे नायक
इत्यादी संस्थानांनी राज्य केले.
रिकाम्या जागी
शब्द भरा.
1) बळ्ळारी जिल्हयातील हंपी
येथे विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.
2) कलबुरगी विभागातील
जिल्हयांना 1956 साली स्वातंत्र्य
मिळाले.
भौगोलिक
साधन संपत्ती
खालील प्रश्नांची उत्तरे
लिहा.
1) या विभागातील
प्रमुख दोन नद्या कोणत्या ?
उत्तर -कलबुर्गी
विभागातील प्रमुख नद्या म्हणजे भीमा,तुंगभद्रा,कृष्णा,मुल्लमारी, बेण्णेतोर इत्यादी होय.
2) बीदर
जिल्हयातील एका धरणाचे नांव लिहा.
उत्तर -बिदर जिल्ह्यातील
कारंज हे धरण प्रसिद्ध आहे.
3) बळ्ळारी आणि
रायचूरू जिल्हयांना पाणीपुखठा करणाच्या धरणाचे नांव लिहा.
उत्तर -बळ्ळारी आणि
रायचुरू जिल्ह्यांना तुंगभद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
आमच्या
विभागातील अरण्ये,जंगली प्राण्यांची निवासस्थाने-
खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. या विभागात
दिसून येणाऱ्या काही वन्य प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर -कलबुरगी
विभागामध्ये लंगूर (माकडासारखा दिसणारा प्राणी) हरीण,कोल्हा,माकडे अस्वले,लांडगा आणि कुत्रा
इत्यादी वन्यप्राणी आढळतात.
2. निजाम
संस्थानाच्या मुक्तीसाठी सुरू केलेल्या लढ्यामध्ये भाग घेतलेले दोन लढवय्ये कोण?
उत्तर – निजाम संस्थानाच्या
मुक्तीसाठी सुरू केलेल्या लढ्यामध्ये भाग घेतलेले दोन लढवय्ये खालीलप्रमाणे 1.स्वामी रामानंद तीर्थ
2.सरदार शरणगौडा इनामदार
इत्यादी होय.
आमची शेती
सुधारणा, आमचे उद्योगधंदे
खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कलबुरगी
विभागातील प्रमुख उद्योगांची नावे लिहा.
उत्तर – कलबुरगी विभागामध्ये
लोखंड आणि पोलाद कारखाने, साखर कारखाने,सिमेंट कारखाने आणि दगडी कोळश्यापासून तयार
होणारी विद्युत केंद्रे इत्यादी प्रमुख उद्योगधंदे आहेत.
2) या विभागातील
कोणत्या जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजाच्या खाणी आहेत ?
उत्तर -कलबुरगी विभागातील
बळ्ळारी आणि कोपर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजांच्या खाणी आहेत.
3) कलबुरगीमध्ये
असलेल्या दर्ग्याचे नांव काय?
उत्तर – कलबुरगीमध्ये असलेल्या
दर्ग्याचे नांव ख्वाजा बंदेनवाज हे होय.
खालील रिकाम्या
जागा भरा.
1) या विभागातील हट्टी येथे
सोन्याची खाण आहे.
2) बळ्ळारी जिल्हयातील
दारोजी येथे वन्यप्राणी धाम आहे.
कला,साहित्य,संगीत,लोकगीत,नृत्य
खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कलबुरगी
विभागात प्राचीन काळात रचना केलेल्या दोन काव्यांची नांवे लिहा.
उत्तर – कलबुरगी विभागात प्राचीन
काळात रचना केलेल्या दोन काव्यांची नांवे –
1. कविराज मार्ग
2. विक्रमार्जुन विजय
2) वचन चळवळी
बद्दल माहिती लिहा.
उत्तर – बाराव्या शतकात कर्नाटकात
उदयास आलेली महत्वाची समाजसुधारणा म्हणजे वचन चळवळ होय.या चळवळीमध्ये सर्व बाबतीत
असमानतेचा तिरस्कार केला. या चळवळीने अस्पृश्यतेचा विरोध केला.(या चळवळीचे प्रमुख
नेते जगद्गुरु बसवेश्वर हे होय.)
3) दास
साहित्यामध्ये साधना केलेल्या दोन श्रेष्ठ दासांची नांवे लिहा.
उत्तर – दास साहित्यामध्ये साधना
केलेल्या दोन श्रेष्ठ दासांची नांवे – 1. पुरंदरदास 2.कनकदास
4) कलबुरगी
विभागातील लोकनृत्यांची नांवे लिहा.
उत्तर – कलबुरगी विभागातील
लोकनृत्यांची नांवे खालीलप्रमाणे –
नंदी बैलाचे नृत्य
आल्लावा नृत्य
चौडंम्माचे नृत्य
लमानी नृत्य
टिपरी नृत्य
दुरगु – मुरगी (लाड
लक्ष्मी)
आमचे
शिक्षण आमचे आरोग्य
* खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) या विभागातील
रायचूर जिल्हयात असलेली विश्वविद्यालये कोणती ?
उत्तर – कलबुर्गी विभागातील
रायचूर जिल्ह्यात कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय,कृषी विश्व विद्यालय इ.
विद्यालये आहेत.
2) बळ्ळारी
जिल्हयातील दोन विश्वविद्यालये कोणती ?
उत्तर – बळ्ळारी जिल्हयातील दोन
विश्वविद्यालये खालील प्रमाणे-
1.विजयनगर श्री कृष्णदेवराय
विश्वविद्यालय
2. कन्नड विश्वविद्यालय
3) कन्नड
विश्वविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – कन्नड विश्वविद्यालय
बळ्ळारी जिल्ह्यातील हंपी याठिकाणी आहे.
रिकाम्या जागा
भरा.
1) कर्नाटक केंद्रिय
विश्वविद्यालय कलबुरगी जिल्हयात आहे.
2) बळ्ळारी जिल्हयातील हंपी
येथे असलेल्या विश्वविद्यालयाचे नाव कन्नड विश्वविद्यालय होय.
विभागातील
सांस्कृतिक संपत्ती आणि स्वतंत्र सैनिक
खालील
प्रश्नांना उत्तरे द्या.
1) कलबुरगी
विभागातील स्वातंत्र्य चळवळी बरोबर आणखीन दोन चळवळी सुरू होत्या त्या कोणत्या ?
उत्तर – कलबुरगी विभागातील
स्वातंत्र्य चळवळी बरोबर आणखीन दोन चळवळी सुरू होत्या त्या म्हणजे
1. वाचनालय चळवळ
2. केंद्रीय शाळा स्थापन
चळवळ
2) निजामाच्या
खाजगी सेनेचे नांव काय ?
उत्तर – निजामाच्या खाजगी सेनेचे
नांव रजाकार असे होते.
3) कलबुरगी
विभागात स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या दोन राष्ट्रीय शाळांची
नावे लिहा.
उत्तर – कलबुरगी विभागात
स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या दोन राष्ट्रीय शाळांची नावे
1. नूतन विद्यालय कलबुरगी (1907)
2. विद्यानंद गुरुकुल,कुकनूर (1922)
4) हैदराबादचे
निजाम संस्थान कोणत्या तारखेस भारतात विलीन झाले?
उत्तर – हैदराबादचे निजाम संस्थान
15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात विलीन झाले.
5) कलबुरगी विभागातील
प्रमुख नेत्यांची नांवे काय?
उत्तर – कलबुरगी विभागातील प्रमुख
नेत्यांची नांवे-
श्री रामानंद तीर्थ,सरदार शरणगौडा इनामदार, महागावचे चंद्रशेखर पाटील
आणि कल्याण शेट्टी.. इ.
आमच्या
विभागातील जिल्ह्यांची वैशिष्ट्ये –
खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कलबुरगी
विभागात किती जिल्हे आहेत?
उत्तर – कलबुरगी विभागात 6 जिल्हे आहेत.
2) प्राचीन काळात
या प्रदेशावर राज्य केलेल्या तीन राज्यघराण्यांची नावे लिहा.
उत्तर – प्राचीन काळात या
प्रदेशावर राज्य केलेल्या तीन राज्यघराण्यांची नावे पुढील प्रमाणे –
1. राष्ट्रकूट
2. कल्याणचे चालुक्य
3.बहामनी
4.विजयनगर साम्राज्य
3) भारतातील सोने
मिळण्याचे स्थळ रायचूर जिल्हयात आहे. त्याचे नांव काय?
उत्तर – भारतातील सोने मिळण्याचे
स्थळ रायचूर जिल्हयात आहे. त्याचे नांव काय हट्टी होय.
4) या विभागात
स्थापन केलेली कोळशापासून विज निर्मिती करणारी दोन केंद्रे कोणत्या जिल्हयात आहेत ?
उत्तर – या विभागात स्थापन केलेली
कोळशापासून विज निर्मिती करणारी दोन केंद्रे रायचूरू जिल्हयात आहे.
5) बळ्ळारी
जिल्हयातील हंपी ही कोणत्या साम्राज्याची राजधानी होती?
उत्तर – बळ्ळारी जिल्हयातील हंपी
ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.
6) ख्वाजा
बंदेनवाज दर्गा कोणत्या जिल्हयात आहे?
उत्तर – ख्वाजा बंदेनवाज दर्गा
कलबुरगी जिल्हयात आहे.