पाठ10 – रामेश्वरचे दिवस
प्र 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. कलामांचा जन्म कोठे झाला?
उत्तर – कलामांचा जन्म मद्रास राज्यातील रामेश्वर येथे झाला.
2. बहाद्दूर ही पदवी कोणास मिळाली होती?
उत्तर – कलामांच्या आईंच्या पूर्वजांना बहाद्दूर ही पदवी मिळाली होती.
3. रामेश्वरच्या शिवमंदिराचे पुजारी कोण होते?
उत्तर – पं.लक्ष्मण हे रामेश्वरच्या शिवमंदिराचे पुजारी होते.
4. धनुष्कोडीला स्थानिक भाषेत काय म्हणूतात?
उत्तर – धनुष्कोडीला स्थानिक भाषेत सेतुक्करायी असे म्हणतात.
5. कलामच्या वडिलांनी कोणता व्यवसाय करण्याचे ठरविले?
उत्तर – कलामच्या वडिलांनी लाकडी नौका बांधण्याचा व्यवसाय करण्याचे ठरविले.
6. जोहराचा विवाह कोणाशी झाला?
उत्तर – रामेश्वर मधील कंत्राटदार जलालुद्दीन यांच्याशी जोहराचा विवाह झाला.
7. रामेश्वरच्या देवळात कोणता उत्सव साजरा होई?
उत्तर – रामेश्वरच्या देवळात सीताराम कल्याणम हा उत्सव साजरा होई.
8. रामेश्वर बेटावर इंग्रजी येणारा माणूस कोण होता?
उत्तर – रामेश्वर बेटावर जलालुद्दीन हा एकटाच इंग्रजी येणारा माणूस होता.
9. कलामांचे मित्र कोणकोण होते?
उत्तर – रामनाथ शास्त्री,अरविंदन आणि शिवप्रकाशन हे कलामांचे मित्र होते.
10. सर्वात लोकप्रिय तामिळ वृतपत्र कोणते?
उत्तर – दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तामिळ वृतपत्र होते.
प्र 2. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. कलाम कोणाकोणाकडून कायकाय शिकले?
उत्तर – कलामांनी वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त ,आईकडून चांगल्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती,जलालुद्दीनकडून शाळेत शिकायला न मिळणारे उपजत शहाणपण तर शमसुद्दीन कडून शरीराची,डोळ्यांची भाषा शिकले.
2. कलामांच्या वडिलांचा दिनक्रम कोणता होता ?
उत्तर – पहाटे उठून सुर्योदयापुर्वीचा नमाज पडणे,त्यानंतर घरापासून चारेक किलोमीटर वरील नारळाची वाडी येथे जाऊन डझनभर नारळ आणणे आणि मग नाश्ता करणे.असा कलामांच्या वडिलांचा दिनक्रम वयाची सत्तरी गाठेपर्यंत कधी चुकला नाही.
3. कलामांनी आईबद्दलचे प्रेम कसे व्यक्त केले आहे? I
उत्तर – कलाम आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करताना म्हणतात की, माझ्या आईचा उदार, विशाल असा दृष्टीकोन होता.तिच्या हातून रोज कितीजणांच्या पोटी अन्न जायचे हे मी सांगू शकणार नाही,पण आमच्या पंक्तीला कुटुंबातील माणसांपेक्षा बाहेरची माणसे अधिक संख्येने असायची.आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपे असे त्यांचे वर्णन केले जाई. माझ्या आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती दिली.
4. शिक्षणासाठी बाहेर जाताना कलामांना वडिलांनी काय सांगितले ?
उत्तर – शिक्षणासाठी बाहेर जाताना कलामांना वडिलांनी सांगितले की,या गावात तुझे शरीर राहत होते, आत्मा नाही. तुझ्या आत्म्याचा निवास उज्वल भविष्याच्या पोटी आहे. आम्ही कुणी तिथवर पोचू शकणार नाही. आमची स्वप्नेसुद्धा तिथवर जाऊ शकणार नाहीत. अल्लाची तुझ्यावर सदैव कृपा राहूदे.‘
5. प्रार्थनेतील शब्दाचा कोणता अर्थ वडीलांनी कलामाना सांगितला ?
उत्तर – जेंव्हा कलाम प्रश्न विचारण्याएवढे समजदार झाले तेंव्हा त्यांनी वडीलांना प्रार्थनेतील शब्दांचा अर्थ विचारला उत्तरादाखल ते म्हणाले, प्रार्थनेमध्ये,नमाज पढण्यामध्ये गुढ असे कांही नाही.एकत्र येऊन नमाज पढताना माणसा माणसातील भेदभाव नाहीसे होतात.संपत्ती, वय, जात-धर्म,वंश,शरीर सर्व काही विसरून आपण त्या अगाध दैवी विश्वशक्तीशी एकरूप होतो.
प्र3. खालील प्रश्नांची चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा.
1. संध्याकाळच्या नमाजानंतर कलामांचे वडील काय करत असत ?
उत्तर – कलामांचे वडील प्रार्थना संपवून मशिदीबाहेर आले,की अनेक धर्माचे, वेगवेगळे आर्थिक स्तरावरचे लोक त्यांची वाट पहात थांबलेले असत. त्यांच्या हातात पाण्याची छोटी छोटी भांडी असत वडील त्या पाण्यात बोटे बुडवून प्रार्थना करत ते पाणी मग लोक श्रद्धेने घरी नेत,औषधपाणी म्हणून आजाऱ्यांना देत आणि आजार बरा झाल्यावर लोक घरी येऊन वडीलांचे आभार मानत.तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी, आनंदी स्मित उमटे आणि ते म्हणत,त्या दयाळू, कृपाळू अल्लाचे आभार माना.
2. तमिळ वृत्तपत्र वाचनाचे कोणकोणते उद्देश लेखकाने सांगितले आहेत?
उत्तर – रोज सकाळच्या रेल्वेगाडीने पंबन गावाहून रामेश्वर येथे वर्तमान पात्रांचे गठ्ठे येत असत.ती वर्तमानपत्रे गावातील हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवत.स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल गाववाल्याना समजणे हे महत्वाचे कार्य त्यातून साधत असे.कुणाला भविष्य जाणून
घेण्यास,तर कुणी मद्रासच्या बाजारपेठेतले सोन्याचांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत.थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, म. गांधी आणि बॅरिस्टर जीनांबद्दल गांभिर्याने चर्चा करत.पणन सर्वजणाना पेरियार ई.व्ही रामस्वामी यांच्या हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांविरुद्ध चाललेल्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता.‘दिनमणी‘ हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. तामिळ वृत्तपत्राबद्दल लेखकाने सांगितले आहे.
3. कलामांच्या वडिलांची बोट समुद्रार्पण कशी झाली ?
उत्तर – कलाम जेंव्हा दहा वर्षांचे होते तेंव्हा त्यांच्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले.त्यासाठी ते अहमद जलालुद्दीन नावाच्या कंत्राटदारासोबत समुद्रकिनारी काम सुरु केले. बोटीला हळूहळू आकार येत होता.त्याचा लाकडी नांगर, सुकाणू वगैरे भाग हळूहळू पक्के बनवले जात होते.एक दिवस भयानक चक्रीवादळाने किनाऱ्याला झोडपून काढले. ताशी शंभराहून अधिक मैलांच्या वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांनी सेतुक्करायीची थोडीफार जमीन अन् आमची बोट समुद्रार्पण केली.त्या प्रसंगात प्रथमच समुद्राचे रौद्र व त्याची संहारक शक्ती यांचे कलामांना दर्शन झाले होते.
4. घरापासून शिक्षणासाठी दूर जाणे कलामांनी का स्वीकारले ?
उत्तर – घरापासून दूर जाणे कलामांनी हळूहळू स्वीकारले होते. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे त्यांनी मनाशी ठरवले.कारण त्यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या विशेष अपेक्षा आहेत हे त्यांना ठाऊक होते.त्यांनी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हे कलामांचे कर्तव्य होते.रामेश्वरध्ये वाटणारी सुरक्षितता,तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे त्यांना भाग होते.
5. त्यावेळी गावामध्ये वृत्तपत्र व्यवसाय कसा चालत असे ?
उत्तर – रामेश्वरमध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता.रोज सकाळच्या रेल्वेगाडीने ‘पंबन‘ गावाहून वर्तमानपत्रांची घट्ट आहेत गावातील हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागविणाऱ्या शमसुद्दीनचा तो व्यवसाय होता. ‘दिनमणी‘ हे त्यावेळचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते.
प्र4 खालील प्रश्नांची आठ ते दहा वाक्यात उत्तरे लिहा.
1. कलाम प्राथमिक शाळेत असताना कोणता प्रसंग घडला ?
उत्तर – कलाम पाचवीत असताना एक प्रसंग घडला होता. त्यावेळी कलाम रामेश्वर मधल्या प्राथमिक शाळेत शिकत होते.एक दिवस वर्गावर नवे मास्तर आले. कलाम आणि रामनाथ शास्त्री नेहमी एकमेकांशेजारी पहिल्या बाकावर बसत होते. कलामांच्या डोक्यावर नेहमी मुसलमान धर्माची निर्देशक टोपी असायची आणि त्याच्या गळ्यात जानवे लोळत असत.त्या नव्या तरुण मास्तरांना कर्मठ हिंदू ब्राह्मण मुलाने मुसलमानच्या शेजारी बसणे अस्वस्थ करू लागले.आमच्या सामाजिक पातळीनुसार त्यांनी मला शेवटच्या बाकावर बसायला फर्मावले.मला अतिशय वाईट वाटले.रामनाथच्या चेहऱ्यावरही शरमिंदेपणा उमटला मी उठून मागच्या बाकावर बसलो.तेव्हा त्याच्या चेहर्यावर उमटलेले दुःख मी वाचू शकलो.त्याचा रडवेला अश्रू भरला चेहरा माझ्या स्मृतीमध्ये कायमचा कोरून ठेवलेला आहे.
2. महंमद जलालुद्दीन व कलाम यांच्यातील मैत्रीचे वर्णन करा.
उत्तर – त्या बोटीच्या जन्मापासून तिचा विनाश होईपर्यंतच्या काळात महंमद जलालुद्दीन माझा धनिष्ट मित्र बनला होता.तसा तो माझ्याहून पंधरा एक वर्षांनी मोठा होता.मला तो आझाद म्हणायचा .संध्याकाळी आम्ही लांबवर फिरायला जात होतो.मशिदीसमोरच्या रस्त्यावरून समुद्र किनाऱ्यावरच्या मऊ मऊ वाळूकडे आपसूक आमची पावले वळायची.आम्ही अधिक तर अध्यात्मिक, आर्थिक,दैवी आत्म्याशी संबंधित अशा विषयांवर बोलत असू.रामेश्वर एक तीर्थक्षेत्र असल्याने अशा प्रकारच्या संभाषणांनी योग्य भारलेले वातावरण तिथे होते. फक्त जलालुद्दीन चे अलाशी काहीतरी विशेष नाते आहे असे मात्र वाटे.तसा तो फारसा शाळेत जाऊ शकला नाही.त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती.पण त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात कडवटपणा आला नव्हता.त्यांनी मला शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले.माझ्या शाळा-कॉलेजातील यशामुळे तो मनोमन सुखावलेला मला कळायचे.
3. शिवसुब्रमणिया अय्यर यांच्याकडे घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर – शिवसुब्रमणीया अय्यर हे ही एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबातील होते.त्यांची पत्नी जुने रितीरिवाज पाळणारी सनातनी वृत्तीची होती.विज्ञानाच्या अभ्यास केल्यामुळे असेल मास्तरांची मते पुरोगामी होती.मी त्यांचा अगदी आवडता विद्यार्थी होतो.मला ते नेहमी म्हणायचे.
कलाम मोठमोठ्या शहरातील सुशिक्षित लोकांच्या तोडीचे तू व्हायला हवेस.एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले.आपल्या सोवळ्या स्वयंपाक घरात बसून एक मुसलमान विद्यार्थी जेवणार या कल्पनेने त्यांनी पत्नी घाबरून गेली.तिने माझे ताट स्वयंपाक घरात वाढायला साफ नकार दिला.पण
माझे मास्तर शिवसुब्रमणीय अजिबात गडबडले नाही किंवा आपल्या पत्नीवर रागावलेही नाहीत.माझ्या शेजारी बसून बाहेरच्या खोलीत आपल्या हाताने त्यांनी मला वाढले अन् शेजारी बसून ते स्वतः जेवू लागले.
4. कलामानी आपल्या आईवडिलांचे वर्णन कसे केले आहे ?
उत्तर – मद्रास राज्यातील रामेश्वर या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबात माझा जन्म झाला.माझे वडील जैनुलाबदीन यांच्यापाशी ना फारशी संपत्ती होती.ना शिक्षण,पण या उणिवांवर मात करेल असे आंतरिक शहाणपण त्यांना लाभलेले होते.माझ्या आईचा उदार विशाल असा दृष्टिकोन होता. तिच्या हातून रोज किती जणांच्या पोटी अन्न जायचे हे मी सांगू शकणार नाही.पण आमच्या पंगतीला कुटुंबातील माणसापेक्षा बाहेरची माणसे अधिक संख्येने असायची. आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपे असे त्यांचे वर्णन केले जाई.वडिलांपेक्षा माझ्या आईचे कुळ अधिक उच्च मानले जात असे कारण तिच्या पूर्वजांपैकी कुणालातरी इंग्रजांकडून बहादुर ही पदवी मिळाली होती.माझे आई-वडील दोघेही उंच देखणे होते.माझे वडील साध्या राहणीचे भोक्ते होते.अशा प्रकारे कलामांनी आपल्या आई-वडिलांचे वर्णन केले आहे.
प्र5. रिकाम्या जागा भरा.
1. आमच्या वस्तीत एक जुनी मशीद होती.
2. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करण्याचे ठरविले.
3. जलालुद्दीन यानी माझ्या बहिणीशी- जोहराशी विवाह केला.
4. आमच्या गावात मणिकम नावाचे एक माजी क्रांतीकारक राष्ट्रभक्त राहत होते.
5. मी आणि रामनाथशास्त्री नेहमी एकमेकांशेजारी पहिल्या बाकावर बसत होतो.
संदर्भासह स्पष्टीकरण